Lokmat Sakhi >Parenting > मुलांचं मन मोडणारी 'ही' गोष्ट तुम्ही करत नाही ना? पालक म्हणून एकदा तपासून पाहा

मुलांचं मन मोडणारी 'ही' गोष्ट तुम्ही करत नाही ना? पालक म्हणून एकदा तपासून पाहा

Parenting Tips: बहुतांश पालक नकळतपणे तर काही पालक जाणून बुजून मुलांसोबत अशी काही गोष्ट करतात की त्यामुळे मुलं मनातून खूप दुखावले जातात. ( one parenting mistakes that can lose confidence of your kids)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2024 04:12 PM2024-10-01T16:12:00+5:302024-10-01T16:12:42+5:30

Parenting Tips: बहुतांश पालक नकळतपणे तर काही पालक जाणून बुजून मुलांसोबत अशी काही गोष्ट करतात की त्यामुळे मुलं मनातून खूप दुखावले जातात. ( one parenting mistakes that can lose confidence of your kids)

one parenting mistake that can lose confidence of your kids  | मुलांचं मन मोडणारी 'ही' गोष्ट तुम्ही करत नाही ना? पालक म्हणून एकदा तपासून पाहा

मुलांचं मन मोडणारी 'ही' गोष्ट तुम्ही करत नाही ना? पालक म्हणून एकदा तपासून पाहा

Highlightsयामुळे एकतर मुलांचा आत्मविश्वास जाऊन ते मनातून नाराज होऊ शकतात, स्वत:ला कमी लेखू लागतात. किंवा मग कधीकधी तुमच्या या बोलण्याचा गैरफायदाही घेऊ शकतात.

काही वर्षांपूर्वीचं पॅरेंटिंग आणि आताचे पॅरेंटिंग यामध्ये खूप फरक पडला आहे. साधारण २५ ते ३० वर्षांपुर्वी पालक आपल्या मुलांना जसं वाढवत होते, तशाच पद्धतीने या काळातही मुलांचं पॅरंटिंग होऊ शकत नाही, कारण काळानुसार अनेक गोष्टी बदलल्या आहेत, त्यामुळे दोन पिढ्यांच्या पॅरेंटिंगची तुलना होऊ शकत नाही. हल्लीच्या पालकांना मुलांना वाढविताना खूप काळजीपूर्वक पावले टाकावी लागतात (Parenting Tips).. पण तरीही पालकांकडून कधी नकळतपणे तर कधी जाणून बुजून अशी एखादी गोष्ट होते जी मुलांचं मन दुखावून त्यांचा आत्मविश्वास घालविणारी, कमी करणारी ठरू शकते. बघा तुमच्याही मुलांच्या बाबतीत असं होत नाही ना?( one parenting mistakes that can lose confidence of your kids)

 

मुलांना मनातून नाराज करते पालकांची 'ही' गोष्ट

vishruti_joyes_parenting या instagram पेजवर पॅरेंटिंग एक्सपर्ट्सनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्या सांगत आहेत की बहुतांश पालक मुलांना टॅग लावतात. म्हणजेच 'तू वेडाच किंवा वेडीच आहेस', 'तू हट्टीच आहेस', 'तुला काही कळतच नाही', 'तू खूपच स्लो आहेस' असं ते मुलांना सतत म्हणतात.

दांडिया- गरबा खेळण्यासाठी ओढणी पिनअप करण्याच्या ३ सुंदर स्टाईल, दिसाल मस्त- खेळा बिंधास्त

यामुळे मुलांच्या मनावर ती गोष्ट बिंबवली जाते आणि मुलं स्वतःला तसंच समजू लागतात. पालक नकळतपणे ही गोष्ट बोलून जातात पण त्याचा मुलांच्या मनावर आणि त्यांच्या विकासावर खूप मोठा परिणाम होऊ शकतो, असं एक्सपर्ट सांगतात.

 

यामुळे एकतर मुलांचा आत्मविश्वास जाऊन ते मनातून नाराज होऊ शकतात, स्वत:ला कमी लेखू लागतात. किंवा मग कधीकधी तुमच्या या बोलण्याचा गैरफायदाही घेऊ शकतात.

कोणतीही मेहनत न घेता चांदीचा, पितळाचा, तांब्याचा कलश १० मिनिटांत होईल चकाचक, पाहा उपाय

म्हणजेच 'तुला माहिती आहे ना मी हट्टी आहे, मी कुणाचं ऐकत नाही; मग पुरव माझा हट्ट' किंवा 'तुला माहितीये ना मी स्लो आहे; म्हणून मी पटापट अभ्यास नाही करू शकत' असं ते उलट पालकांनाही ऐकवू शकतात. या दोन्ही प्रकारांमध्ये मुलांचं नुकसानच आहे. त्यामुळे पालकांनी मुलांना टॅग लावणं बंद केलं पाहिजे. तू असा नाहीस किंवा तू अशी नाहीस, पण तू आता असं करते आहेस, ते करू नको... अशा शब्दांत पालक मुलांना समजावून सांगू शकतात. एकदा असाही प्रयोग करून पाहा...


 

Web Title: one parenting mistake that can lose confidence of your kids 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.