प्रत्येक व्यक्तीचे स्वतःचे वेगळे व्यक्तिमत्व असते (Personality). काही लोक खूप बोलके असतात. तर, काही जण मोजकंच बोलणारे असतात (Confidence). काही जास्त शारीरिक क्रियाशील असतात, तर काही आळशी स्वभावाचे असतात (Shy Child). जे बोलके असूनही कंटाळा करतात. पण काही जण आई वडिलांनी दिलेल्या संस्कारामुळे शांत स्वभावाचे होतात.
काही मुलं फार लाजाळू असतात. त्यांना आपले विचार इतरांसमोर मांडता येत नाही. त्यांना बोलतं करणंही तितकेच कठीणही आहे. लाजाळूपणामुळे बऱ्याचदा चारचौघात मुलांचा आत्मविश्वासही कमी होतो. त्यामुळे त्यांच्या सामाजिक जीवनावर मोठा परिणाम होऊ लागतो. जर मुलं लाजाळू न राहता, कणखर व्यक्तिमत्व बनावे असं वाटत असेल तर, पालकांनी या ४ गोष्टी लक्षात ठेवायला हवे. मुलांचा आत्मविश्वास वाढेल; होतील स्मार्ट(Parent Tips to Build Confidence in Shy Children).
अशा प्रकारे मुलांचा लाजाळूपणा करा दूर
नकारात्मक गोष्टी बोलू नका
मुलांसमोर कधीही नकारत्मक गोष्टी बोलू नका. मुलं लाजाळू असतील किंवा कमी बोलत असतील तर, त्यांना अबोल राहिल्याबद्दल टोमणे मारू नका. कारण अशा गोष्टी लहान मुलांच्या मनात राहतात. ज्यामुळे मुलं चारचौघात मिसळणं टाळतात.
मुलांनी सांगितलेल्या गोष्टींना प्राधान्य द्या
मुलं काहीही सांगत असतील तर, त्यांचं नीट ऐका, त्यांच्या बोलण्याला प्राधान्य द्या. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करा. अशा प्रकारे त्यांना त्यांचे विचार मोकळेपणाने व्यक्त करण्यात सोयीस्कर वाटेल.
वातावरण तयार करा
मुलांना बोलतं करणं खूप अवघड काम. त्यांच्या भोवती सकारात्मक वातावरण तयार करा. यामुळे मुलं न घाबरता गोष्टी शेअर करतील.
उपक्रमांमध्ये सहभाग
मुलांना खेळ, नाटक, संगीत इत्यादी विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यास प्रवृत्त करा. याद्वारे ते इतरांसोबत मिळून नवीन मित्र बनवायला शिकतील. यामुळे त्यांचा नक्कीच आत्मविश्वास वाढेल.
हातापायांच्या काड्या पण पोट मात्र खूप सुटलंय? ५ सोप्या टिप्स, शरीर सुडौल -पोट होईल कमी
एक आदर्श बना
मुले त्यांच्या पालकांकडून आणि कुटुंबाकडून खूप काही शिकतात. मुलांमध्ये सकारात्मक बदल घडावा असं वाटत असेल तर, मुलांसोबत मनमोकळेपणाने बोला. चारचौघात मिसळायला शिकवा.