सध्याच्या धावपळीच्या जीवनात फक्त मोठी माणसचं नाही तर लहानमुलंसुद्धा ताणतणावाखाली असतात. खेळात, अभ्यासात नेहमीच पहिला क्रमांक मिळवावा अशी मुलांची इच्छा असते. सकाळी उठल्यानंतर पालकांच्या तोंडून काही चांगले शब्द किंवा चांगली वाक्य ऐकली तर दिवसभराचा ताण-तणाव कमी होण्यास मदत होते. (These 5 Best Morning Habits) काही सकारात्मक गोष्टी मुलांचा स्ट्रेस कमी करू शकतात. सकाळची वेळ मुलांसाठी महत्वाची असते. यामुळे मेंदू जास्त वेगाने काम करतो आणि मनही एकाग्र राहते. (Parenting And Motherhood These 5 Best Morning Habits Can Brighten The Future Of Child)
1) सकाळी उठल्यांनंतर मुलांना सांगा की त्याचं तुमच्यावर प्रेम आहे
मुलं सकाळी उठल्यानंतर त्यांना प्रेमाने जवळ घेऊन त्यांच्यावरील तुमचं प्रेम व्यक्त करा. तुमचे प्रेमाचे शब्द ऐकून त्यांचा पूर्ण दिवस चांगला जाईल. मुलांना सुरक्षित वाटेल आणि त्यांचा पूर्ण दिवस आनंदी जाईल.
2) मुलांना दिवसभरातील रुटीन विचारा
मुलांना सकाळी उठल्यांतर त्यांच्या दिवसभरातील रूटीनबद्दल विचारा. असं केल्यानं ते निष्क्रीय बसणार नाहीत. त्यांच्या डोक्यात सकारातमक विचार सुरू राहतील आणि दिवसभरात काय काय करायचे आहे ते त्यांच्या डोक्यात सुरू असेल आणित त्याप्रमाणे ते आपला वेळ वाया न घालवता कामं पूर्ण करतील.
3) सकारात्मक बोला
तुमचं मुल हूशार असो किंवा नसो त्यांचे कौतुक करायला विसरू नका. कारण तुमचे कौतुकाचे २ शब्द मुलांसाठी उत्तम ठरू शकतात. यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढेल आणि त्यांना नवीन गोष्टी करण्याची उर्जा मिळेल.
४) मुलांना स्मितहास्य देऊन दिवसाची सुरूवात करा
मुलांना शाळेसाठी लवकर उठवलं तर त्यांचा चेहरा उतरलेला असतो. शाळेत जाण्याची मुलांची तयारी नसते अशावेळी तुम्ही सकाळी उठल्यानंतर त्यांना स्माईल दिलं तर त्यांचा पूर्ण दिवस आनंदात जाईल आणि शाळेतही आनंदाने वावरतील.
५) शरीर हायड्रेट ठेवा
सकाळी मुलांना १ ग्लास कोमट पाणी द्या. ही सवय मुलांना लावा. सकाळी सकाळी सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यायल्याने शरीर दिवसभर हायड्रेटडेट राहते आणि सकाळी प्रसन्न वाटते.
६) मुलांच्या मॉर्निंग रूटीनमध्ये स्ट्रेचिंग असावं
मुलांच्या सकाळच्या रुटीनमध्ये स्ट्रेचिंगचा समावेश करा. यासाठी कमीत कमी २० मिनिटांचा वेळ नक्कीच काढा. व्यायामाने फक्त शारीरिक नाही तर मानसिक रूपानेही तुम्ही एक्टिव्ह आणि फ्रेश राहाल.