Join us  

मुलांना नावं ठेवण्यापूर्वी आईबाबा तुम्ही करा ३ बदल; मोबाईलचा हट्ट करणारी मुले वागतील शहाण्यासारखी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 1:22 PM

Parenting Tips in Marathi : मुलांना तुम्ही मोबाईल पाहू नका असं बोललात तर त्यांना ते शिक्षेप्रमाणे वाटेल. तुम्ही त्यांना मोबाईल पाहायला अडवलं आणि स्वत: फोन पाहत बसलात तर त्यांच्यावर नकारात्मक परिणाम होईल.

आपल्या मुलांमध्ये सुधारणा व्हावी असं  प्रत्येक पालकाला वाटतं.  यासाठी घरातलं वातावरण चांगलं असणं फार महत्वचां असत. जर तुमचं मूल जास्त प्रमाणात मोबाईल पाहत असेल. सगळ्यांशी मिळून मिसळून वागत नसेल तर घरातलं वातावरण बदलण्याकडे लक्ष द्यायला हवं. खाली दिलेल्या काही गोष्टींकडे लक्ष दिल्यास तुमच्या घरातलं वातावरण चांगलं राहील आणि मोबाईल पाहणं स्वत:हून सोडून देतील. जर तुमची मुलं जास्त अभ्यास करतील नसतील आणि फक्त मोबाईल बघत असतील तर तुम्ही काही टिप्सचा वापर करून घरातील वातावरण बदलू शकता. (Parenting Before Imparting Knowledge To The Child Make 3 Change In Home Environment Child Will Study) 

मानसिक आधार

पॅरेटींग मॅटरर्सच्या रिपोर्टनुसार मुलांना सकारात्मक भावनीक सपोर्ट हवा असतो. ज्यामुळे त्यांचे संपूर्ण  मानसिक आरोग्य चांगले राहते. भावनिक आधारामुळे मुलं ताणतणावपूर्ण वातावरणात आनंदी राहायला शिकतात, भिती, राग या भावनांवरही नियंत्रण ठेवता येते. ज्यामुळे घरात आणि समाजात वावरताना मुलांमध्ये आत्मविश्वास येतो. 

अभ्यासात मन लागत नाही

मुलांचे अभ्यासात मन लागत नसेल तर अलर्ट होण्याची आवश्यकता आहे.  यासाठी सगळ्यात आधी तुम्ही मुलांची अभ्यासाला बसण्याची जागा तपासून घ्या. त्या ठिकाणी काही डिस्टर्बन्स असेल तर तो आधी दूर करायला हवा.  त्या ठिकणची खेळणी, टिव्ही, मोबाईल दूर करा. अभ्यास करण्यासाठी मुलांचे फिक्स रूटीन बनवा.  अशा ठिकाणी मुलं अभ्यासाला बसतील तर त्यांच्यात हळूहळू  गांभीर्य येईल.  मुलांना अभ्यास करताना ओरडू नका असं केल्यानं ते अभ्यासाचा कंटाळा करतील.

अधिक मोबाईल पाहणं

मुलांना तुम्ही मोबाईल पाहू नका असं बोललात तर त्यांना ते शिक्षेप्रमाणे वाटेल. तुम्ही त्यांना मोबाईल पाहायला अडवलं आणि स्वत: फोन पाहत बसलात तर त्यांच्यावर नकारात्मक परिणाम होईल. म्हणून मुलांना इतर एक्टिव्हीजमध्ये गुंतवून ठेवा आणि त्यांच्यासोबत तुम्हीही खेळा. 

मुलं २ कारणांमुळे चुकीचं वागतात. जर ते अशा वातावरणात राहत राहतील ज्या ठिकाणी लोक  एकमेकांशी चांगलं वागत नाहीत, आरडाओरडा सुरू असेल तर मुलं तेच पाहून तसंच वागू लागतात. अनेकदा अटेंशन मिळवण्यासाठी मुलं असं वागतात.  या दोन्ही गोष्टींकडे लक्ष देऊन त्यांना सुधारण्यासाठी चान्स द्या. 

टॅग्स :लहान मुलंपालकत्व