Join us  

१०० टक्के भारतीय पालक करतात ३ चुका, नंतर रडून काय फायदा-मुले वाया जाऊ नयेत यासाठी संदिप माहेश्वरी सांगतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2023 11:29 AM

Parenting Mistakes Everyone Should Avoid : जरी तिच्या अभ्यासावर २० ते ३० लाख खर्च झाले तरी हरकत नाही उद्या ती असं तरी म्हणणार नाही की पालकांनी स्वप्न पूर्ण करण्याची संधीच दिली नाही. 

मुलांचे पालनपोषण करण्यासाठी प्रत्येक आई वडिलांना मेहनत करावी लागते. तर कधी मुलांचे हट्टीपणाच्या वागण्याचे त्रास सहन करावे लागतात. त्यांचे लाड पुरवावे लागतात. (Parenting tips in marathi) मुलांचे पालन पोषण  कसे करावे याबाबत अनेक मोटीव्हेशनल स्पीकर सल्ला सुद्धा देतात. मुलांना संस्कार देण्याबाबत आणि पालन पोषण करण्याबाबत मोटिव्हेशनल स्पीकर संदिप माहेश्वरी यांनी मोलाचा सल्ला दिला आहे. (Parenting Mistakes Everyone Should Avoid) जर तुम्ही सुद्धा एक पालक असाल तर संदीप यांनी सांगितलेल्या काही गोष्टी फायदेशीर ठरू शकतात. (Parenting Tips By Sandeep Maheshwari)

सामान्यत: आई वडीलांना सल्ला दिला तो की  त्यांना मुलांना जे जे हवं ते सगळं करू द्यावे. जसं की मुलांना करिअरमध्ये काय करायचं आहे,  त्यांना काय बनायचं आहे.  या सगळ्या गोष्टींबाबत आईवडील दडपणात असतात. मुलांना स्वत:चे निर्णय स्वत: घेण्याचे स्वातंत्र्यही देतात. पण संदिप माहेश्वरी असं म्हणत नाहीत. (Sandeep Maheshwari Talk About The Biggest Parenting Mistakes)

कंबर-पाठ खूप दुखते? रामदेव बाबा सांगतात १ ग्लास दूधाचा खास फॉर्म्यूला; भरपूर कॅल्शियम मिळेल-ताकद येईल

मुलांना नाही म्हणायला शिका

या शोव्हमध्ये आलेल्या बऱ्याच लोकांचे म्हणणे असे होते  की मुलांच्या आवडी-निवडींना पालकांनी कधीच नाकारू नये. मुलांच्या निवडीचा स्वीकार करावा  हे बरोबर असले तरी संदीप यांच्या मते आई वडीलांनी असे करणं चुकीचं ठरू शकते. कारण आई वडीलांनी मुलांना नेहमी मोठी पण मुलं साध्य करू शकतील अशी स्वप्न पाहायला शिकवावी. मुलांना स्वप्न पाहण्यसाठी मोटिव्हेशन द्यायला हवं. 

संदीप यांनी एक किस्सा सांगितला की एक मुलगी अनेक वर्षांपासून कोचिंग आणि परिक्षा देत होती. पण ती पास होऊ शकत नव्हती. तिने सांगितले की पुन्हा पुन्हा परिक्षा देत राहील.  संदिप यांनी तिला सल्ला दिला की तू असं काही करू नकोस, तू हे करू शकणार नाही. वेळे आणि पैसे आणि दोन्ही वाया जातील. पण मुलीच्या वडीलांनी सांगितले की तिला हवं ते करू द्या. तिला डिमोटीव्हेट करू नका. जरी तिच्या अभ्यासावर २० ते ३० लाख खर्च झाले तरी हरकत नाही उद्या ती असं तरी म्हणणार नाही की पालकांनी स्वप्न पूर्ण करण्याची संधीच दिली नाही. 

संदीप यांनी या घटनेबद्दल सांगितले की  ती मुलगी ६ वेळा परीक्षा दिल्यानंतरही युपीएससी पास झाली नाही आणि डिप्रेशनमध्ये गेली. संदीप यांच्यामते आई वडील मुलांच्या आयुष्यात कमीत कमी इन्वॉल्व्ह होऊ पाहतात. हीच चूक अनेकांकडून होते. याऊलट मुलांना नेहमी योग्य निर्मण घेण्यासाठी मार्गदर्शन करायला हवं.

१० वर्षांचे होण्यापूर्वीच पालकांनी मुलांना शिकवायला हव्या ७ गोष्टी, मुलं गुणीच नाही तर स्वावलंबीही होतील

आजकाल आई-वडील स्वत:च्या कामांमध्ये बरेच बिझी झाले आहेत ते स्वत:च्या मुलांना नीट वेळही देऊ शकत नाहीत.  ही कमतरता पैश्यांनी भरून काढण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्यांच्या म्हणण्यानुसार पालक मुलांच्या संगोपनात इन्वॉलव्ह होऊ शकत नाहीत. 

टॅग्स :पालकत्व