Lokmat Sakhi >Parenting > मुलं चारचौघात उलटून बोलतात, पालकांचा अपमान करतात? मुलांचं हे वागणं सुधारण्याची १ सोपी-शांत युक्ती

मुलं चारचौघात उलटून बोलतात, पालकांचा अपमान करतात? मुलांचं हे वागणं सुधारण्याची १ सोपी-शांत युक्ती

Parenting Tips 1 thing we should Never Allow child to do : मुलं पालकांशी उद्धटपणे का बोलतात, का चारचौघात अपमानास्पद वागतात हे समूजन त्यावर उपाय करायला हवा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2023 10:44 AM2023-09-11T10:44:26+5:302023-09-11T13:26:09+5:30

Parenting Tips 1 thing we should Never Allow child to do : मुलं पालकांशी उद्धटपणे का बोलतात, का चारचौघात अपमानास्पद वागतात हे समूजन त्यावर उपाय करायला हवा.

Parenting Tips 1 thing we should Never Allow child to do : Children talk backwards, insult parents? 1 easy-quiet trick to improve this behavior in children | मुलं चारचौघात उलटून बोलतात, पालकांचा अपमान करतात? मुलांचं हे वागणं सुधारण्याची १ सोपी-शांत युक्ती

मुलं चारचौघात उलटून बोलतात, पालकांचा अपमान करतात? मुलांचं हे वागणं सुधारण्याची १ सोपी-शांत युक्ती

मुलं बरेचदा घरात नीट वागतात पण कोणी पाहुणे आले, बाहेर कुणाकडे गेल्यावर अचानक वेगळेच वागायला लागतात. लोकांसमोर हट्ट करणे, आई-वडीलांच्या मागे सतत भूणभूण करणे असे काही ना काही करुन वैताग आणतात. मुलांनी जास्तच त्रास दिला आणि काहीच ऐकत नसतील तर पालक अक्षरश: हैराण होतात. काहीवेळा तर मुलं अजिबात न घाबरता पालकांचा सगळ्यांसमोर अपमान करतात, उलटून काहीबाही बोलतात. उद्धटासारखं उलटून मुलं बोलत असतील तर ते चूकच. मुलांना समज द्यायलाच हवी. पण मुलं असं का करतात, ते वागणं कसं बदलता येईल?(Parenting Tips 1 thing we should Never Allow child to do).

मुलांचे कोणते वागणे आपल्याला अनादर करणारे वाटते याची प्रत्येकाची व्याख्या वेगवेगळी असू शकते. मात्र मुलांनी उलटे बोलणे आणि अनादर होईल असे वागणे अजिबात खपवून घेता कामा नये. मग मुलांनी पालकांना अपशब्द बोलले, त्यांच्यावर हात उगारला, मोठ्या आवाजात बोलले किंवा उलटे बोलले तर पालकांनी नेमके काय करायचे असा प्रश्न साहजिकच आपल्याला पडतो. असे सगळे केल्यावर आपण एकतर मुलांना ओरडतो नाहीतर प्रसंगी मारतो किंवा शिक्षा करतो. पण एका मर्यादेनंतर त्याचाही उपयोग होणे बंद होते. मग नेमके काय करायचे याबाबत समुपदेशक प्रिती वैष्णवी काही महत्त्वाच्या टिप्स देतात. 

१. मुलं आरडाओरडा करत असतील, चुकीचे बोलत असतील किंवा काही फेकाफेकी करत असतील तर अशावेळी सगळ्यात आधी पालकांनी पूर्णपणे शांत बसावे. त्यांच्याशी कोणतीच गोष्ट त्यावेळी बोलू नये. हे करणे काहीसे अवघड असते मात्र आपल्याला त्यांना मूळापासून बदलायचे असेल तर असे करणे आवश्यक असते. आपणही ओरडलो तर आपणही त्यांचा अपमान करतो अशी परिस्थिती निर्माण होईल.

२. मूल जेव्हा शांत होईल तेव्हा त्याला त्याचे हे वागणे पूर्णपणे चुकीचे होते हे शांतपणे समजावून सांगा. त्यानंतर काहीतरी मास्टर स्टेटमेंट देण्याची आवश्यकता आहे हे लक्षात घ्या. हे मास्टर स्टेटमेंट परिस्थिती, मुलाचा स्वभाव आणि एकूण आपले रिलेशन यानुसार वेगवेगळे असू शकते. 

३. यामध्ये साधारण तू आईला किंवा बाबांना असे करताना कधी पाहिले आहेस का? आपल्या घरात असे कोणीच वागत नाही, त्यामुळे तूही असं वागणं चांगलं नाही असं मुलांना अतिशय शांतपणे त्यांच्या पद्धतीने समजावून सांगायला हवे. तुम्ही अशाप्रकारे मास्टर स्टेटमेंट देऊ शकत असाल तर तुमचे मूल पुन्हा अशी गोष्ट करणार नाही हे नक्की समजा.

Web Title: Parenting Tips 1 thing we should Never Allow child to do : Children talk backwards, insult parents? 1 easy-quiet trick to improve this behavior in children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.