Lokmat Sakhi >Parenting > लहानपणीच ३ सवयी लावल्या तर मुलांची तब्येत आयुष्यभर नीट; पण पालकांनाच त्या सवयी नसतील तर? तज्ज्ञ सांगतात..

लहानपणीच ३ सवयी लावल्या तर मुलांची तब्येत आयुष्यभर नीट; पण पालकांनाच त्या सवयी नसतील तर? तज्ज्ञ सांगतात..

Parenting Tips 3 Daily Habits to Build in our Kids : लहानपणी लावली गेलेली सवय पुढे दिर्घकाळ टिकते आणि त्याचा त्यांच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक वाढीवर परीणाम होतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2023 10:08 AM2023-01-13T10:08:02+5:302023-01-13T11:38:07+5:30

Parenting Tips 3 Daily Habits to Build in our Kids : लहानपणी लावली गेलेली सवय पुढे दिर्घकाळ टिकते आणि त्याचा त्यांच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक वाढीवर परीणाम होतो.

Parenting Tips 3 Daily Habits to Build in our Kids : 'These' 3 habits should be inculcated in children from childhood, experts say, to maintain good health... | लहानपणीच ३ सवयी लावल्या तर मुलांची तब्येत आयुष्यभर नीट; पण पालकांनाच त्या सवयी नसतील तर? तज्ज्ञ सांगतात..

लहानपणीच ३ सवयी लावल्या तर मुलांची तब्येत आयुष्यभर नीट; पण पालकांनाच त्या सवयी नसतील तर? तज्ज्ञ सांगतात..

Highlightsलहानपणीच चांगल्या सवयी लागल्या तर त्या कायम राहतात उत्तम आरोग्यासाठी सुरुवातीपासूनच काही सवयी असणे आवश्यक असते

लहान मुलं ही एखाद्या स्पंजसारखी असतात आपल्या आजुबाजूला जे पाहतात, ऐकतात ते अगदी पटकन शिकतात. पहिली ५ ते ७ वर्षे तर त्यांच्या वाढीसाठी अतिशय महत्त्वाची असतात. या काळात त्यांना जितक्या चांगल्या सवयी लावू तितक्या कमी असते. कारण लहानपणी लावली गेलेली सवय पुढे दिर्घकाळ टिकते आणि त्याचा त्यांच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक वाढीवर परीणाम होतो. म्हणून लहान मुलांना जास्तीत जास्त चांगल्या सवयी लावायला हव्यात असे आपण कायम ऐकतो. लहान मुलं आपण सांगू ते लगेच ऐकतातच असं नाही. पण काहीवेळा त्यांच्या भल्यासाठी आपल्याला त्यांच्याकडून कधी प्रेमाने तर कधी ओरडून काही गोष्टी करुन घ्याव्या लागतात (Parenting Tips 3 Daily Habits to Build in our Kids). 

प्रसिद्ध समुपदेशक प्रिती या आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या माध्यमातून कायम काही ना काही उपयुक्त माहिती शेअर करत असतात. नुकताच त्यांनी असाच पॅरेंटींग विषयातला एक व्हिडिओ पॅरेंटींग डायरीज विथ प्रिती या अकाऊंटवर अपलोड केला आहे. यामध्ये त्यांनी मुलांना लहान वयात आवर्जून लावायला हव्यात अशा ३ सवयींबद्दल सांगितले आहे. भविष्यात मुलांचे आरोग्य चांगले राहावे असे वाटत असेल तर आतापासूनच पालकांनी थोडे कष्ट घेऊन मुलांना या सवयी लावायला हव्यात. आता या ३ सवयी कोणत्या ते पाहूया...

१. दिवसातून २ वेळा दात घासणे

मुलांना दात घासण्याची ओळख करुन देता तेव्हापासून त्यांना दिवसातून २ वेळा दात घासण्याचे महत्त्व समजावून सांगा. एकदा मुलं मोठी झाली की ती दात न घासण्यासाठी असंख्य कारणं शोधतात त्यामुळे लहान वयातच ही सवय लावलेली केव्हाही चांगली. 

२. भरपूर पाणी पिणे 

मुलांना लहानपणीच भरपूर पाणी पिण्याची सवय लावावी. पाणी पिणे आरोग्यासाठी अतिशय चांगले असते. त्यामुळे झोपेतून उठल्यावर, खाल्ल्यावर, बाहेरुन आल्यावर अवश्य पाणी प्यायला हवे. ही सवय लहानपणीच लावली तर त्याचा चांगला फायदा होतो. 

३. रात्री लवकर झोपणे आणि सकाळी लवकर उठणे 

रात्री लवकर झोपणे आणि सकाळी लवकर उठणे ही चांगल्या आरोग्यासाठी आणि मेंदूची वाढ चांगली व्हावी यासाठी अतिशय चांगली गोष्ट असते. मुलांना लहानपणीच जागरण करण्याची आणि सकाळी उशीरा उठण्याची सवय लागली तर ती कायम राहते. म्हणूनच लहानपणापासूनच मुलांना रात्री लवकर झोपायची सवय लावावी.   

 

Web Title: Parenting Tips 3 Daily Habits to Build in our Kids : 'These' 3 habits should be inculcated in children from childhood, experts say, to maintain good health...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.