Lokmat Sakhi >Parenting > 'या' सवयी असणारी मुलं मोठेपणी अतिशय बुद्धिमान होतात- बघा कशी ओळखायची हुशार मुलं

'या' सवयी असणारी मुलं मोठेपणी अतिशय बुद्धिमान होतात- बघा कशी ओळखायची हुशार मुलं

3 Habits Of Intelligent Kids: मुलांमध्ये काही सवयी लहानपणीच अशा दिसून येतात, ज्यातून मुलांची बुद्धीमत्ता दिसून येते..(how to identify intelligence in kids?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2024 09:01 AM2024-07-21T09:01:52+5:302024-07-21T09:05:01+5:30

3 Habits Of Intelligent Kids: मुलांमध्ये काही सवयी लहानपणीच अशा दिसून येतात, ज्यातून मुलांची बुद्धीमत्ता दिसून येते..(how to identify intelligence in kids?)

parenting tips, 3 habits of intelligent kids, how to identify intelligence in kids | 'या' सवयी असणारी मुलं मोठेपणी अतिशय बुद्धिमान होतात- बघा कशी ओळखायची हुशार मुलं

'या' सवयी असणारी मुलं मोठेपणी अतिशय बुद्धिमान होतात- बघा कशी ओळखायची हुशार मुलं

Highlightsकाही अभ्यासकांच्या मते बुद्धिमान मुलांच्या खेळण्याच्या, वागण्याच्या सवयी इतर मुलांपेक्षा बऱ्याच वेगळ्या असतात.

बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, ही म्हण आपल्याकडे खूप प्रचलित आहेत. सगळ्या म्हणी अनुभवांतून आलेल्या आहेत. त्यामुळे या म्हणीमध्येही खूप मोठा अर्थ दडला आहे. आपल्या मुलांमधल्या सुप्त कलांगुणांची, त्यांच्या बुद्धीमत्तेची झलक आपल्याला कधी ना कधी दिसत असतेच. पण बऱ्याचदा आपला त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन चुकतो (3 habits of intelligent kids). किंवा मग आपण ते गुण ओळखण्यात थोडे कमी पडतो. त्यामुळे मग मुलांना योग्य दिशा देताना आपली गल्लत होते. (how to identify intelligence in kids?)

 

काही अभ्यासकांच्या मते बुद्धिमान मुलांच्या खेळण्याच्या, वागण्याच्या सवयी इतर मुलांपेक्षा बऱ्याच वेगळ्या असतात. त्यामुळे बुद्धिमान मुलं लगेच ओळखता येतात. मुलांची चाणाक्ष बुद्धिमत्ता हेरणाऱ्या या सवयी नेमक्या कोणत्या ते पाहा आणि तुमच्या मुलांमध्येही अशा सवयी दिसून येतात का ते तपासा.. 

तुम्हीही पावसाळ्यात हिरव्या पालेभाज्या खाता का? आहारतज्ज्ञ सांगतात २ गोष्टींची काळजी घ्या, नाहीतर...

बुद्धिमान मुलांच्या सवयी कोणत्या याविषयी डॉ. देवमिता दत्ता यांनी सांगितलेली माहिती न्यूज एटीनने प्रकाशित केली आहे. त्यानुसार बुद्धिमान मुलांच्या अशा अनेक सवयी असतात, ज्यामुळे खरंतर पालक वैतागून जातात. त्या सवयी नेमक्या कोणत्या ते पाहा..

१. कितीदा सांगूनही मुलं एका जागी स्वस्थ बसत नसतील, प्रत्येक गोष्टीला हात लावून बघण्याची तसेच कधी कधी तर एखादी वस्तू फोडून तिच्या आत काय आहे हे बघण्याची कुतूहलता असणे.

 

२. एखाद्या खेळण्यात मुलं एवढी दंग होऊन जातात की तुम्ही कितीदा आवाज देऊनही त्यांचं तुमच्याकडे लक्ष नसतं. अशावेळी पालकांना मुलं आपलं ऐकत नाहीत, आपल्याकडे दुर्लक्ष करतात असं वाटतं आणि ते त्यांना रागवतात. यातून मुलांची एकाग्रता दिसून येते.

मांडीवर, पोटावर लॅपटॉप ठेवून काम करणाऱ्यांना होत आहेत २ आजार; तुम्हीही असंच करता का?

३. मुलं तुम्हाला वारंवार प्रश्न विचारत असतील, तुम्ही एखादी गोष्ट सांगितल्यावर का, कुठे, केव्हा असे प्रश्न विचारत असतील तर यावरून त्यांची एखाद्या गोष्टीबद्दल ज्ञान घेण्याची उत्सूकता दिसून येते. त्यांना प्रश्न पडतात, हे त्यांच्या बुद्धीमत्तेचं लक्षण आहे.

 

Web Title: parenting tips, 3 habits of intelligent kids, how to identify intelligence in kids

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.