Join us  

शाळेतून आल्यानंतर मुलांना ५ प्रश्न विचारा; मन लावून अभ्यास करतील-बोलतील मनातलं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2024 10:08 PM

Parenting Tips : मुलांना शाळेतून घरी आल्यानंतर  काही प्रश्न विचारायला हवेत.

मुलांना शाळेत पाठवण्यापासून ते परत येईपर्यंत पालकांना त्यांची फार चिंता असते. मुलं शाळेतून घरी आल्यानंतर त्यांना खाऊ घालण्यात बरेच पालक बिझी असतात. (Parenting Tips) पण मुलं शाळेतून घरी आल्यानंतर  १ रूटीन सेट करायला हवं. मुलांना शाळेतून घरी आल्यानंतर  काही प्रश्न विचारायला हवेत. ज्यामुळे त्यांच्या अडचणी तुम्हाला कळतील, शाळेचं रुटीन कळेल, मुलांना शाळेत जाण्याची ओढ आहे की नाही ते सुद्धा समजेल. (5 Questions You Need To Ask Your Child After Coming Back Home From School)

मुलांना टिफिनशी निगडीत प्रश्न विचारा

मुलं घरी आल्यानंतर त्यांना सगळ्यात आधी विचारा त्यांना टिफिन कसा वाटला. शाळेतील इतर मुलं टिफिनमध्ये काय घेऊन आले होते ते विचारा. यामुळे तुम्हाला मुलांच्या खाण्याच्या आवडीनिवडी व्यवस्थित कळतील.  मुलांचे मित्र मैत्रिणी  डब्यात काय घेऊन आले आहेत  ते कळल्यानंतर मुलांचा टिफिन तयार करणं सोपं होईल.

मित्रमैत्रिणींबद्दल विचारा

पालकांच्या नात्याने तुम्हाला मुलांचा मित्र परिवार कसा आहे. त्यांचे उठणं-बसणं कोणामध्ये आहे, त्या मुलांचे पालक काय करतात आणि मुलं कुठे राहतात याची माहिती असायला हवी. यामुळे तुम्हाला मुलांची संगत सोबत कोणाशी आहे हे समजण्यास मदत होईल.

चांगले क्षण कोणते वाटले ते विचारा

प्रत्येक मुलांना आपलं शाळेत झालेलं कौतुक, शाब्बासकी मिळाली हे  पालकांना सांगायला फार आवडते. पण मुलांचे ऐकण्याआधी तुम्ही कपडे बदलण्यात किंवा खाण्यापिण्यात बिझी ठेवलं तर मुलं तुम्हाला काही गोष्टी सांगायला विसरतील आणि हळूहळू मुलं तुम्हाला काही गोष्टी सांगणं टाळतील. म्हणूनच मुलांना त्यांच्या प्राऊड मोमेंट बद्दल विचारून त्यांचे कौतुक करा.

होमवर्कबद्दल विचारायला विसरू नका

मुलांना शाळेत काय शिकवलं, ते त्यांना व्यवस्थित कळलंय का, इतर प्रश्न व्यवस्थित विचारा. मुलांना होमवर्कबाबत काही अडचणी असतील त्या शिक्षकांशी बोलून सोडवून घ्या.

शाळेतून आल्यानंतर मुलांना मिठी मारा

शाळेतून आल्यानंतर मुलांना मिठी मारल्याने त्यांना आपलेपणा वाटेल आणि मुलं खूश होतील. असं केल्याने मुलांना आनंदही होईल. मुलं त्यांच्यावर खूप प्रेम करतील. मुलांना वाटेल की ते पालकांवर भरपूर प्रेम करत आहेत.

टॅग्स :पालकत्व