Join us  

कितीही ओरडा-रागवा मुलं ऐकतच नाहीत? त्याची कारणं ४, मुलांवर खेकसण्यापूर्वी हे वाचाच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2023 1:59 PM

Parenting Tips about Shouting on Child : मुलं ऐकत नाहीत म्हणून आपण ओरडतो आणि आपण ओरडतो म्हणून ते आणखी ऐकेनासे होतात

ठळक मुद्देअसे कर तसे कर सांगितले तर त्यांना तुमच्या सूचनांचा कंटाळा येईल आणि ते तुमचे म्हणणे ऐकेनासे होतील.मुलांनी आपलं ऐकावं असं वाटत असेल तर ओरडून उपयोग नाही...

मुलांना शिस्त लागावी, त्यांनी भरपूर अभ्यास करावा, आपण सांगत असलेल्या सगळ्या गोष्टी ऐकाव्यात अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते. त्यादृष्टीने आपण मुलांना सतत सूचना देत राहतो. मुलं आपलं ऐकणारं असतील आपणही ती गोष्ट योग्य पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहोचवत असू तर सगळं ठिक असतं. पण काही मुलं अजिबात ऐकत नाहीत म्हणून हैराण झालेले पालक आपण आजुबाजूला पाहतो (Parenting Tips about Shouting on Child). 

मुलं ऐकत नाहीत म्हणून काही वेळा आपण त्यांच्यावर ओरडतो. प्रसंगी हातही उचलतो. रागाच्या भरात ओरडताना नकळतच आपला आवाज वाढतो. काही जणांच्या बाबतीत सातत्याने असे होते आणि आईवडील सतत मुलांना ओरडत असतात आणि तरीही मुलं काही केल्या ऐकत नसतात हे आपण पाहतो. अशावेळी नेमकं काय होतं हे समजून घेऊया...

मुलांवर सतत ओरडल्याने होतं काय? 

प्रसिद्ध पॅरेंटींग एक्सपर्ट इशिना सदाना सांगतात, मुलं ऐकत नाहीत म्हणून आपण ओरडतो आणि आपण ओरडतो म्हणून ते आणखी ऐकेनासे होतात हे एक दुष्टचक्र आहे. आपण जेव्हा मोठ्या आवाजात ओरडतो तेव्हा मुलांना आपला आवाज ऐकू येतो मात्र त्यामागे असलेले शब्द समजत नाहीत.  

१. आपण सतत ओरडल्याने काय होते तर ते आपलं ऐकण आणखी कमी करतात. 

२. मग आपणही प्रत्येक गोष्टीसाठी त्यांच्यावर मोठ्या आवाजात ओरडत राहतो. 

३. अशावेळी त्यांना आपल्या ओरडण्याची इतकी सवय होते की आपण हळू आवाजात बोललेलंही ते ऐकेनासे होतात. 

४. मग एखादी गोष्ट करण्यासाठी ते आपण ओरडण्याची वाट पाहतात. 

त्यांनी आपलं ऐकावं असं वाटत असेल तर...    

१. आपल्या वागण्यावर, आवाजावर नियंत्रण ठेवा आणि आपल्या म्हणण्यावर शेवटपर्यंत ठाम राहा. 

 

२. तुम्ही मुलांना योग्य पद्धतीने आदर देत द्या. तुमचे त्यांच्यासोबत चांगले बॉंडींग असेल, त्यांचे म्हणणे तुम्ही ऐकून घेत असाल तर ते स्वाभाविकच तुम्ही म्हटलेलं ऐकतील. यामुळे तुम्हाला त्यांच्यावर ओरडण्याची वेळ येणार नाही. 

३. त्यांना सतत चुका दाखवल्या आणि असे कर तसे कर सांगितले तर त्यांना तुमच्या सूचनांचा कंटाळा येईल आणि ते तुमचे म्हणणे ऐकेनासे होतील. त्यामुळे सतत त्यांना सारख्या सुचना देऊ नका. 

टॅग्स :पालकत्वलहान मुलं