Lokmat Sakhi >Parenting > अंबानींच्या लग्नात ईशा आणि श्लोका अंबानींच्या कडेवर लेकरं, व्हीआयपी गर्दीतही त्यांनी मुलांचा हात सोडला नाही...

अंबानींच्या लग्नात ईशा आणि श्लोका अंबानींच्या कडेवर लेकरं, व्हीआयपी गर्दीतही त्यांनी मुलांचा हात सोडला नाही...

Parenting tips and lessons to borrow from Ambani family : मूल आपली जबाबदारी असते आणि मायेची गोष्टही, मुलांना सांभाळण्याची खास चर्चा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2024 04:25 PM2024-07-22T16:25:35+5:302024-07-22T16:29:15+5:30

Parenting tips and lessons to borrow from Ambani family : मूल आपली जबाबदारी असते आणि मायेची गोष्टही, मुलांना सांभाळण्याची खास चर्चा...

Parenting tips and lessons to borrow from Ambani family | अंबानींच्या लग्नात ईशा आणि श्लोका अंबानींच्या कडेवर लेकरं, व्हीआयपी गर्दीतही त्यांनी मुलांचा हात सोडला नाही...

अंबानींच्या लग्नात ईशा आणि श्लोका अंबानींच्या कडेवर लेकरं, व्हीआयपी गर्दीतही त्यांनी मुलांचा हात सोडला नाही...

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह सोहळ्याची चर्चा अजून होतेच आहे. त्यात आता एक नवीन मुद्दा चर्चेत आला आहे की एवढे श्रीमंत असूनही अंबानींच्या घरातली (Parenting tips) लहानमुलं कुणी आया सांभाळत नव्हती तर त्यांचे आईबाबा, आजीआजोबाच मुलांकडे एवढ्या व्हीआयपी गर्दीतही पाहत होते. अंबानींची लेक ईशा (Isha Ambani) आणि मोठी सून श्लोकाच्या कडेवर सतत त्यांची बाळं दिसली. त्यावरुन बरीच चर्चा रंगली आहे की नव्या काळात मुलं सांभाळायला अनेकजण मोलानं माणसं ठेवतात, अंबानी इतके श्रीमंत असूनही त्यांनी तसं केलं नाही...

आपण अनेकदा पाहतो की सेलिब्रिटी विमानतळावरून बाहेर पडत असोत किंवा घरातून, त्यांची मुलं केअरटेकर किंवा आया यांच्याकडेच सोपवलेली दिसतात. पण अंबानी कुटुंबियांच्या या लग्न सोहळ्यात असा कोणी केअरटेकर किंवा आया दिसली नाही. आपल्याकडे सर्वसाधारण कुटुंबातही हल्ली अनेकजण मूल सांभाळायला मदतनीस ठेवतात(Parenting tips and lessons to borrow from Ambani family).

रातील काही लग्नकार्य, सण - समारंभ, शॉपिंगला जाताना अनेकदा मदतनीसच मुलं सांभाळताना दिसते.  काहीवेळा तर फंक्शनमध्ये खूप भारी कपडे घातले की त्याची इस्त्री मोडू नये, ते खराब होऊ नये, मेकअप खराब होऊ नये म्हणून कित्येक पालक मुलांना उचलून घेणे देखील टाळतात. त्याचवेळी, अंबानी कुटुंबातील ईशा असो किंवा श्लोका यांनी एकाच वेळी दोन - दोन मुले आपल्या कडेवर उचलून घेतल्याचे दिसले. या लग्नात मुकेश अंबानीही आपली नातवंडं सांभाळताना दिसले. 

'मामेरू' सोहळ्यादरम्यान ईशा अंबानी आणि तिचा पती आनंद पिरामल आपल्या जुळ्या मुलांना सांभाळताना आणि त्यांच्यासोबत मस्ती करताना दिसले. प्रत्येक लग्न समारंभात अंबानी कुटुंबातील ही मुलं आजी-आजोबा, आई-वडील यांच्या कुशीत बसून खेळताना दिसत होती. 

या आलिशान लग्न सोहळ्यातून आपण पॅरेंटिंगचा हा एक महत्वाचा गुण घेण्यासारखा आहे. मुलांना सांभाळायला मदतनीस असणं किंवा मूल पाळणाघरात ठेवणं वाईट नाही. पण आपलं मूल ही आपण स्वत:हून स्वीकारलेली जबाबदारी असते. त्याहून महत्वाचं म्हणजे पालक म्हणून सजग असणं की आपल्या मुलांना काय हवं काय नको हे पाहणं. गर्दीतही आपलं मूल आपली प्रायॉरिटी आहे हे स्वीकारणं महत्त्वाचं.
अर्थात केवळ आईवरच सारा भार असू नये, आईसह बाबानेही मुलांची काळजी घेणं उत्तमच. अंबानींच्या लग्नात ते दिसलं, त्याची चर्चा तर होणारच.

Web Title: Parenting tips and lessons to borrow from Ambani family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.