Lokmat Sakhi >Parenting > मुलांशी नेमकं कसं बोलावं? बी. के शिवानी सांगतात आई बाबांनी कराव्यात ५ गोष्टी

मुलांशी नेमकं कसं बोलावं? बी. के शिवानी सांगतात आई बाबांनी कराव्यात ५ गोष्टी

Parenting Tips by B.K Shivani : आईबाबांनी मुलांशी काय बोलायला हवं.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 02:12 PM2024-10-08T14:12:28+5:302024-10-08T19:35:20+5:30

Parenting Tips by B.K Shivani : आईबाबांनी मुलांशी काय बोलायला हवं.

Parenting Tips by B.K Shivani : BK Shivani Said Parents Should Use Positive Words For Kids | मुलांशी नेमकं कसं बोलावं? बी. के शिवानी सांगतात आई बाबांनी कराव्यात ५ गोष्टी

मुलांशी नेमकं कसं बोलावं? बी. के शिवानी सांगतात आई बाबांनी कराव्यात ५ गोष्टी

प्रत्येक मुल वेगळं असते. प्रत्येकात काही ना काही गुण असतात. काही मुलं निडर असतात. तर काही मुलांना खूपच जास्त भिती वाटते. आध्यात्मिक गुरू बी. के शिवानी यांनी एका प्रवचनात सांगितले की  मुलांच्या आई वडीलांनी त्यांना सांगायला हवं की तुम्ही निडर आहात. (BK Shivani Said Parents Should Use Positive Words For Kids)

बी. के शिवानी यांनी सांगितले की मुलांना सांगावं की ते सगळं काही करू शकता. जेव्हा आई वडील  मुलांना असं सांगतात तेव्हा एक ना एक दिवस मुलांची भिती नष्ट होते. मुलांच्या आतील आत्मविश्वासही वाढतो. (Parenting Tips by B.K Shivani)

 आशीर्वादात खूप शक्ती असते

बी. के शिवानी सांगतात की आईवडिलांच्या प्रार्थना आणि आशिर्वादात खूप ताकद असते.  जेव्हा ते सतत मुलांसाठी सकारात्मक शब्द वापरतात तेव्हा नक्कीच हे शब्द पूर्ण होतात. म्हणूनच पालकांनी मुलांशी पॉझिटिव्ह शब्दात बोलायला हवं. 

निगेटिव्ह शब्द वापरू नयेत

तुझ्याकडून हे काम होणार नाही असं पालकांनी कधीच म्हणू नये.  मुलं इतकी घाबरट नसतात जितके आपण त्यांना समजतो. सगळी शक्ती तुमचे विचार आणि शब्दांमध्ये असते म्हणूनच  सकारात्मक शब्द वापरायला हवेत. मुलांसाठी नेहमी सकारात्मक शब्द वापरावेत.

स्मिता श्रीवास्तव यांच्या ७ फुट ९ इंचाच्या केसाचं खास सिक्रेट; केसांना लावतात किचनमधले 'हे' पदार्थ

मुलांचे कौतुक करा

मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासठी त्यांना  स्मार्ट आहात असं सांगा. जेव्हा पालक आपल्या मुलांच्या  बौध्दीक समस्या सोडवण्याची क्षमता ओळखतात तेव्हा मुलांमधला शिकण्याचा विश्वास  वाढतो. ज्यामुळे मुलांचा स्वत:वरचा विश्वास वाढतो आणि त्यांना लक्षात येतं की ते काहीही करू शकतात.

 

जेव्हा मूल आपल्या कंफर्ट झोनमधून बाहेर येऊन काही करते तेव्हा  त्यांना प्रोत्साहन द्यायला हवं. सतत नवनवीन गोष्टी करत राहिल्यानं मुलं साहसी होतात. यामुळे मुलांना शिकायला मिळेल आणि ते प्रयत्न करत राहतील.

सतत स्ट्रेस घेत असता? घरात 'ही' ५ झाडं ठेवा, पॉझिटिव्हीटी राहील-अजिबात ताण येणार नाही

दयाळू असल्याची जाणीव करून घ्या

प्रत्येक पालकानं मुलांमध्ये दया आणि सहानुभूतीची भावना विकसित करायला हवी.  आपल्या मुलाला सांगा की त्यांचा स्वभाव खूपच दयाळू आहे. यामुळे मुलांमध्ये हेल्दी नाती आणि सहानुभूतीचे महत्व वाढवण्यास मदत होईल.

Web Title: Parenting Tips by B.K Shivani : BK Shivani Said Parents Should Use Positive Words For Kids

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.