Join us  

मुलं उलटं बोलतात-वाट्टेल तसं वागतात? बी. के शिवानी सांगतात ४ टिप्स, गुणी-हूशार होतील मुलं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2024 1:23 PM

Parenting Tips By B.K Shivani : मुलांवर कधी रागवू नका. तुम्हाला कसलाही राग आला असेल तर प्रेमाने समजावून सांगा.

आपल्या मुलांना चांगली शिस्त लागावी, त्यांनी मन लावून अभ्यास करावा, मोठं  होऊन चांगलं नाव कमवावं अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. त्यासाठी  लहानपणापासूनच मुलांना चांगलं वळणं लावणं गरजेचं असतं. (Parenting Tips By B.K Shivani) प्रसिद्ध मोटिव्हेशनल स्पिकर बी. के शिवानी मुलांच्या चांगल्या पालनपोषणासाठी नेहमीच पालकांना टिप्स देत असतात. बी. के शिवानी यांनी सांगितलेल्या टिप्स वापरून मुलं यशस्वी आणि संस्कारी होऊ शकतात. (Parenting Tips Given By B.K Shivani Childs Bright Future)

1) मुलांची तुलना करू नका

बी के शिवानी सांगतात की कधीच मुलांची तुलना करू नका.  आई वडीलांनी तर  कधीच मुलांची तुलना इतर मुलांशी किंवा भावंडाशी करू नये. कारण असं केल्याने मुलांमध्ये आत्मविश्वास कमी होतो. प्रत्येक मूल हे त्याचं नशिब घेऊन जन्माला आलेले असते.  त्याचे स्वत:चे कर्म आणि वेगळी ओळख असते. ज्याकडे आई वडीलांनी कधीच दुर्लक्ष करू नये. आपल्या मुलांमध्ये काय कौशल्य आहे याचा शोध घेऊन प्रोत्साहन द्या. मुलांना आपल्या व्यक्तीमत्वाप्रमाणे पालन-पोषण करा.

2) मुलांना प्रोत्साहन द्या

मुलांमध्ये जे काही हिडन टॅलेंट असेल ते पूर्ण करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्या. मुलांना नेहमी एक उत्तम माणूस बनण्याासाठी प्रोत्साहन द्या. दुसऱ्या मुलांसमोर आपल्या मुलांची तक्रार करू नका. यामुळे मुलं डिमोटिव्हेट होऊ शकतात. मुलांना नेहमीच चांगले वागण्यासाठी प्रोत्साहन द्या. त्यांच्या चुका त्यांना एकट्यात समजावून सांगा. 

किचनमध्ये सतत मुंग्यांच्या रांगा लागतात? घरात ५ गोष्टी ठेवा, २ मिनिटांत गायब होतील मुंग्या

3) मुलांसमोर कधीच नकारात्मक स्टेटमेंट देऊ नका

मुलांसमोर कधीच नकारात्मक स्टेटमेंद देऊ नका. बी के शिवानी यांच्यामते मुलांसमोर कधीच नकारात्मक स्टेटमेंट देऊ नका. आपल्या मुलांकडून आई वडील जशी अपेक्षा करतात तसंच ते वागतात. आई वडीलांचे पाहून मुलं शिकतात. म्हणून त्यांना वेळीच शिस्त लावा.

गुडघे-पाठीचं दुखणं वाढलंय? सकाळी फक्त १ लाडू खा, हाडांना येईल बळकटी-पोलादी शरीर होईल

4) मुलांवर कधी रागवू नका

मुलांवर कधी रागवू नका. तुम्हाला कसलाही राग आला असेल तर प्रेमाने समजावून सांगा. राग केल्याने किंवा मारल्याने मुलं आतून पूर्णपणे  तुटून जातात. म्हणून मुलांवर कधीच रागवू नका. राग दाखवण्याापेक्षा मुलांना वेगळ्या पद्धतीने शिक्षा द्या ज्यातून त्यांना शिकायला मिळेल.

टॅग्स :पालकत्व