लहान मुलांना चांगलं वळण लावणं काही खायचं काम नाही. मुलं वयात येत असताना जर पालकांकडून दुर्लक्ष झाले त्यांचे वर्तन बदलते मुलांवर चुकीचे संस्कार होतात आणि आयुष्यभर याचा परिणाम दिसून येतो. (Parenting Tips in Marathi) आपल्या मुलांचे पालन पोषण व्यवस्थित व्हावे असं अनेकांना वाटते. (Sudha Murthy Shares Timeless Parenting Tips Are Too Relevant to Ignore)
समाजसेविका सुधा मूर्ती (Sudha Murti) यांनी हाऊ आय टॉट माय ग्रँडमदर टू रीड एंड अदर्स स्टोरीज या पुस्तकात आपल्या जीवनाशी निगडीत एक्सपिरिएंस शेअर केला आहे. आपल्या मुलांच्या चांगल्या पालन पोषणासाठी त्यांनी काही पॅरेंटींगचे सल्ले दिले आहेत. (6 Unique Ideas On Parenting By Sudha Murthy)
१) मुलांसाठी उदाहरण बना
लहान मुलं नेहमी इतरांचे अनुकरण करतात आणि मोठ्यांच्या वागण्याच्या पद्धतीप्रमाणेच तेसुद्धा वागू लागतात. दयाळूपणा, मान-सन्मान, इमानदारी ही मुल्य समजून घेऊन वागा. मुलांसाठी सकारात्मक रोल मॉडेल बना.
२) मुलांना वाचन-लिखाण करण्यासाठी प्रोत्साहन द्या
मुलांच्या चांगल्या विकासासाठी त्यांना बालपणीपासूनच पुस्तकांचे आणि वाचनाचे महत्व समजावून सांगा. बौध्दीक चर्चांमध्ये सहभाग घ्यायला सांगा. ज्यामुळे प्रेम वाढवण्यास मदत होईल.
३) सहानुभूती आणि करूणा
आपल्या मुलांना इतरांच्याप्रती स्नेह, सहानुभूती आणि करूणा भाव शिकवा. त्यांना स्वेच्छा, समाज कार्य या मुद्यावर चर्चा करून वॉलेंटिअरिंगसाठी मोटिव्हेट करा. इतरांची मदत करण्यास त्यांना प्रोत्साहन द्या.
४) साधेपणा आणि नम्रता
मुल उलट उत्तर देतात अशी अनेक पालकांची तक्रार असते मुलं हट्टी होऊ नयेत यासाठी त्यांच्याशी लहानपणापासूनच नम्रतेने वागा जेणेकरून त्यांच्या वागण्याबोलण्यात नम्रता येईल.
५) जबाबदारीने वागायला शिकवा
मुलांना स्वत:चे अंथरूण उचलण्यापासून ते ताट स्वच्छ करण्यापर्यंत अनेक लहान लहान गोष्टींच्या माध्यमातून चांगल्या सवयी लावा. त्यांना निर्णय घेण्यासाठी प्रोत्साहन द्या. त्याचा सेल्फ कॉन्फिडेंट्स वाढेल आणि मुलं कोणावरही अवलंबून राहणार नाहीत.
मुले हट्टी - उद्धट होऊ नयेत म्हणून सद्गुरु सांगतात ५ गोष्टी, पालकांसाठी खास मंत्र
६) मुलांचे कौतुक करा
अनेक पालक आपल्या मुलांची तुलना इतर मुलांशी करतात. यापेक्षा मुलांना शांतपणे कसं वागायचे ते समजावून सांगा. ज्यामुळे त्यांच्यात सकारात्मक दृष्टीकोन आणि विनम्रता विकसित होण्यास मदत होईल. मुलं चांगलं वागत असतील तर त्यांचे न विसरता त्यांचे कौतुक करा.