Lokmat Sakhi >Parenting > आईबाबांनी ‘या’ ४ गोष्टी केल्या तर मुली होतात खंबीर, जन्मभर राहतील आनंदात

आईबाबांनी ‘या’ ४ गोष्टी केल्या तर मुली होतात खंबीर, जन्मभर राहतील आनंदात

Parenting Tips : मुलींच्या आईबाबांसाठी काही खास टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 05:01 PM2024-10-07T17:01:55+5:302024-10-07T18:18:21+5:30

Parenting Tips : मुलींच्या आईबाबांसाठी काही खास टिप्स

Parenting Tips : Confident Daughter Care Tips Parenting Tips For Daughter Parents | आईबाबांनी ‘या’ ४ गोष्टी केल्या तर मुली होतात खंबीर, जन्मभर राहतील आनंदात

आईबाबांनी ‘या’ ४ गोष्टी केल्या तर मुली होतात खंबीर, जन्मभर राहतील आनंदात

मुलींचा आत्मविश्वास वाढवणं त्याच्या भविष्यासाठी फार महत्वाचे आहे. आत्मविश्वास (Confidence) एक असा घटक आहे जो मुलींना आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यात फायदेशीर ठरू शकतो. म्हणून बदलत्या समाजाकडे पाहता मुलींनी आत्मविश्वास वाढवणं गरजेचं आहे (Parenting Tips). ज्यामुळे  त्यांना त्यांच्या जीवनात येणाऱ्या अडचणींचा सहज सामना करता येईल.  मुलींच्या आई वडिलांनी काही खास टिप्स फॉलो केल्या तर त्यांचे चांगले पालन पोषण होण्यास मदत होईल. (Confident Daughter Care Tips Parenting Tips For Daughter Parents)

स्वत:वर विश्वास ठेवायला शिकवा

तुम्ही आपल्या लेकीला स्वत:वर विश्वास ठेवायला शिकवू शकता. आपण हे  करू शकत नाही असा दृष्टीकोन कधीच ठेवू नये. कोणतीही नवीन गोष्ट करण्याची तयारी ठेवावी. इतर मुलींच्या तुलनेत कमी लेखू नका. तुम्ही आपल्या मुलीला तू मुलगी आहेस त्यामुळे हे करू शकत नाही असं कधीच सांगू नका.  नेहमी नवीन गोष्टी शिकण्यासाठी प्रोत्साहन द्या. तुम्ही नेहमी तिला हवं ते करण्याचं स्वातंत्र्य द्या. 

केळी आणल्यानंतर एका दिवसात नरम- काळी पडतात? ३ ट्रिक्स, आठवडाभर ताजी राहतील केळी

कंफर्ट कम्फर्ट झोनच्या बाहेर 

 सतत काही ना काही शिकण्यासाठी प्रेरणा देत राहा. नवीन आव्हानं द्या जेणेकरून तुम्ही आपल्या मुलीला समाजाच्या प्रत्येक पैलूबाबत समजावून सांगू शकाल. याशिवाय मुलींचे कौतुक करायला विसरू नका. 


सांगा, आपण सुंदरच आहोत.

तुमच्या लेकीला  शिकवा की ती जशी आहे तशी खूपच सुंदर आहे. आपल्या मुलीची इतरांशी तुलना करू  नका. आपल्या लेकीचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी तिला ती किती सुंदर आहे ते समजावून सांगा. यामुळे तुमची लेक तुमच्याशी बोलताना लाजणार नाही. 

भाज्या चिरायला 'चॉपिंग बोर्ड' वापरता? डॉक्टर सांगतात त्यावर टॉयलेटपेक्षा घातक बॅक्टेरिया, असा स्वच्छ करा...

मुलींच्या निर्णयांना महत्व द्या

जर मुली कोणताही निर्णय घेत असतील तर त्याच्या निर्णयाचा सन्मान करा आणि त्याची बाजू समजून घ्या. ज्यामुळे मुलींचा स्वत:वरचा विश्वास मजबूत होईल. असं केल्यानं मुलांच्या वागण्याबोल्यात बदल होईल.

पायावर उभं राहणं महत्त्वाचं

याव्यतिरिक्त तुम्ही आपल्या लेकीला सोशल आणि इकोनॉमिकल्स जबाबदाऱ्या समजावून सांगा. मुलांना त्यांची समज आणि बाहेरचं वातावरणामुळे मदत होईल. ज्यामुळे मुलींचा आत्मविश्वास वाढेल.

Web Title: Parenting Tips : Confident Daughter Care Tips Parenting Tips For Daughter Parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.