लहान मुलांनी चुका करणं आणि त्यांच्या पालकांनी त्यांना ओरडणं, रागावणं हे चित्र तर घरोघरी दिसतं. त्यात काहीच वावगं नाही. मुलांनी चुका, खोड्या, धिंगाणा करायचाच असतो आणि मुलांना शिस्त लागण्यासाठी पालकांना त्यांना रागवावंच लागतं. मुलांनी चूक केली तर तुम्ही नक्कीच त्यांना रागवा पण दिवसभरातल्या २ अशा वेळा आहेत, जेव्हा पालकांनी मुलांना कधीच रागावू नये (parenting tips). कारण त्याचा मुलांच्या मनावर खूप खोल परिणाम होत जातो आणि असं वारंवार होत गेलं तर त्याचे वाईट परिणाम मुलांच्या व्यक्तिमत्त्वावर दिसून येतात.(don't scold your child in these 2 situations)
मुलांना कधी रागावू नये?
मुलांना कधी रागावू नये याविषयी माहिती सांगणारा एक व्हिडिओ चिल्ड्रन आणि पॅरेंटिंग एक्सपर्टने maonduty या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. बघा त्या २ वेळा नेमक्या कोणत्या-
केस एवढे वाढतील- दाट होतील की विंचरण्याचाही कंटाळा येईल! रोज 'हा' ज्यूस प्या- तब्येतही सुधरेल
१. रात्री झोपण्याच्या १ तास आधी
रात्री झोपण्याच्या साधारण १ तास आधी मुलांना अजिबात रागावू नये. किंवा त्यांना काहीही नकारात्मक बोलू नये. कारण तुम्ही जे काही बोलाल त्याचाच विचार करत मुलं झोपी जातात.
उरलेल्या पोळ्यांचे करा खुसखुशीत कटलेट्स, बघा भरपूर भाज्या घालून केलेली चवदार रेसिपी
ही गोष्ट त्यांच्या सबकॉन्शियस माईंडमध्ये रेकॉर्ड होत जाते. सकाळी तोच विचार घेऊन ते उठतात आणि शाळेत जातात. या गोष्टी त्यांच्या मनातून सहजासहजी निघून जात नाहीत. असं वारंवार होत गेलं तर मुलं आतल्याआत कुढतात आणि स्वत:लाच दोष देऊ लागतात.
२. सकाळी झोपेतून उठल्यानंतर
ही गोष्ट बहुतांश आईंसाठी खूप कठीण आहे. कारण सकाळी खूप गडबड, धावपळ असते आणि त्यात मुलांना वेळेवर शाळेत पोहोचविण्याचं टेन्शन असतं.
तुम्हीही पाश्चराईज दूध उकळल्यानंतरच मुलांना प्यायला देता? तज्ज्ञ सांगतात हे अतिशय चुकीचं, कारण....
शिवाय मुलांचा डबा, नाश्ता, घरातल्या इतर जबाबदाऱ्या असं सगळं पाहावं लागतं. यामुळे मग आईची ओढाताण होते आणि त्यात मुलांनी पटापट आवरलं नाही तर मग त्यांच्यावर चिडचिड होते. पण तरीही स्वत:वर संयम ठेवा आणि सकाळच्यावेळी मुलांना रागावणं सोडा. कारण त्याच विचारात ते शाळेत जातात. अभ्यासाकडे किंवा इतर शाळेतल्या इतर ॲक्टिव्हीटींकडे त्यांचं दुर्लक्ष होतं. याचा परिणाम त्यांच्या अभ्यासावरही होतोच.