Join us  

'पुन्हा असं करशील तर याद राख', असं म्हणत तुम्हीही मुलांना दम देता? तज्ज्ञ सांगतात.....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2024 2:01 PM

Parenting Tips: 'पुन्हा असं केलंस ना तर बघ मग मी काय करेन तुला', असं म्हणत मुलांना धमकवण्याची सवय तुम्हालाही असेल तर हे एकदा वाचाच...(don't threatened your child again and again)

ठळक मुद्दे त्यांना अशी तुमची भीती वाटत गेली, तर भविष्यात ते तुमच्यासोबत काहीही शेअर करणार नाहीत. तुमच्यापासून गोष्टी लपवून ठेवतील.

काही लहान मुलं अतिशय खोडकर असतात. ० ते ५ वर्षे या वयोगटातल्या मुलांना सांभाळणं खरोखरच त्यांच्या आईसाठी मोठ्या कौशल्याचं काम आहे. या वयोगटातल्या मुलांना सांभाळताना आईच्या सहनशक्तीची खरोखरच बऱ्याचदा जणू परीक्षाच घेतली जाते. कधी कधी आईचा किंवा पालकांचा संयम सुटतो आणि मग ते मुलांवर ओरडतात (Parenting Tips). बरेच पालक जेव्हा चिडतात, तेव्हा ते मुलांना दम देतात की यापुढे जर असं केलं तर मी तुला कोंडून ठेवीन किंवा मारेन किंवा अशीच काहीतरी एखादी धमकी देतात. या धमकीचे मुलांच्या मनावर खूप खोलपर्यंत परिणाम होऊ शकतात. (kids mental health )

 

० ते ५ वर्षे या वयोगटातल्या मुलांना जर त्यांचे आई- बाबा कायम धमकावत असतील, त्यांना कायम दम देत असतील तर मुलांच्या मनावर काय परिणाम होऊ शकतो, याविषयी माहिती सांगणारा एक व्हिडिओ बालरोगतज्ञांनी holisticpediatrician या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.

४ पदार्थ एकत्र करून चेहऱ्यावर लावा! काळवंडलेली त्वचा स्वच्छ होऊन ब्लीच केल्याप्रमाणे चमकेल..

यामध्ये त्या सांगत आहेत की मुलांना धमकवण्याच्या सवयीमुळे त्यांच्या मनात भीती निर्माण होते. ते घाबरतात. आपल्याला असं वाटतं की ० ते २ वर्षे या वयोगटातल्या मुलांना आपलं ओरडणं, रागावणं कळत नसेल. पण आपल्या चेहऱ्याचे बदललेले हावभाव मुलांचा मेंदू लगेच टिपून घेतो आणि त्यांच्या मनात भीती बसू लागते. त्यांना अशी तुमची भीती वाटत गेली, तर भविष्यात ते तुमच्यासोबत काहीही शेअर करणार नाहीत. तुमच्यापासून गोष्टी लपवून ठेवतील.

 

त्यामुळे मुलांना कधीही जोरात ओरडून बोलू नका. धमकावू नका. त्यांना दमदाटी करू नका. ते तुमचं ऐकत नसतील, खूप रडत असतील, रडून गोंधळ घालत असतील तर आधी त्यांना पूर्णपणे शांत होऊ द्या.

गौरी- गणपतीत गोडधोड खाऊन गॅसेस- ॲसिडीटी वाढली, पोट फुगलं? १ सोपा उपाय- लगेच मिळेल आराम

त्यानंतर त्यांना ते करत असणारी गोष्ट कशी चुकीची आहे, ते सांगा. मुलं जर २ वर्षांपेक्षाही लहान असतील तर त्यांना ओरडण्यापेक्षा, रागावण्यापेक्षा त्यांचं मन दुसरीकडे गुंतविण्याचा प्रयत्न करा. स्वतःवर थोडं नियंत्रण ठेवा आणि मुलांना धमकविण्याची, दमदाटी करण्याची सवय सोडा, असं तज्ज्ञ सांगत आहेत.

 

टॅग्स :पालकत्वलहान मुलं