Lokmat Sakhi >Parenting > मुलं सकाळी उठायला नाटक करतात? १ ट्रिक-रोज सकाळी न आवाज देता उठतील मुलं

मुलं सकाळी उठायला नाटक करतात? १ ट्रिक-रोज सकाळी न आवाज देता उठतील मुलं

Parenting Tips : मुलांना कोणतंही काही काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले तर मुलं ते काम आवडीनं करतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 03:29 PM2024-07-24T15:29:42+5:302024-07-25T15:22:07+5:30

Parenting Tips : मुलांना कोणतंही काही काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले तर मुलं ते काम आवडीनं करतात.

Parenting Tips : Easy Ways To Wake Up Kids Early In The Morning | मुलं सकाळी उठायला नाटक करतात? १ ट्रिक-रोज सकाळी न आवाज देता उठतील मुलं

मुलं सकाळी उठायला नाटक करतात? १ ट्रिक-रोज सकाळी न आवाज देता उठतील मुलं

मुलांना  सकाळी झोपेतून उठवणं हे पालकांसमोर मोठं चॅलेन्ज असतं. (Parenting Tips) शाळा असो किंवा इतर कोणतंही काम मुलांना वेळेवर उठवणं गरजेचं असतं. (Health Tips)  मुलं गाढ झोपेत असतात तेव्हा उठायला नाटक करतात.  फक्त तुमच्यासोबतच नाही तर जगभरातील पालकांना या स्थितीचा सामना करावा लागतो.

मुलं सकाळी उठायला वेळ लावतात किंवा पालकांचे २ शब्द ऐकतात. याचा परिणाम त्यांच्या पूर्ण दिवसभराच्या रुटीनवर पडतो. जर तुमचे मुलही सकाळी उठायला नाटक करत असेल तर त्याला लवकर उठण्याची सवय लावण्यासाठी सोप्या ट्रिक्स तुम्ही वापरायला हव्यात. (Easy Ways To Wake Up Kids Early In The Morning)

1) रुटीन सेट करा

मुलांना रुटीननुसार वागायला आवडतं. जर तुम्ही त्यांना रोज एकाच वेळी झोपवलं आणि उठवलं तर त्यांच्या शरीराचे बायलॉजिकल क्लॉक स्वत: सेट होईल आणि मुलं काहीही त्रास न देता लवकर उठतील.

2) सकारात्मक वातावरण

सकाळीच्यावेळी ताण-तणावमुक्त आणि आनंदी वातावरण असायला हवं. मुलांना प्रेमाने उठवा. तुम्ही सकाळी उठल्यानंतर मुलांची आवडती गाणी लावू शकता. 

3) हळू-हळू उठवा

मुलांना अचानक उठवण्याऐवजी त्यांना  हळूहळू उठवा. त्यांना हळूवार हात लावून उठायला सांगा, बेटा, सकाळ झाली उठा, असं बोलल्यानंतर हळूहळू मुलांची झोप उघडेल.

4) प्रोत्साहन द्या

मुलांना कोणतंही काही काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले तर मुलं ते काम आवडीनं करतात. त्यांना सांगा की ते वेळेवर उठले तर त्यांना आवडीचा नाश्ता मिळेल आणि मित्रांसोबत खेळायला जाता येईल.

जेवल्यानंतर पोट डब्ब होतं-गॅस निघतो? किचनमधला हा पदार्थ खा, गॅस २ मिनिटांत दूर-पोटही साफ होईल

5) अलार्म क्लॉकचा योग्य वापर

अलार्म क्लॉकचा योग्य वापर करा. मुलांचे आवडते गाणं किंवा म्युझिक सेट करा. अलार्म वाजताच मुलं खूश होतील आणि लगेच उठतील.

6) हायड्रेशन

रात्रीच्यावेळी मुलांचे शरीर हायड्रेट राहणं ठेवणं गरेजंच असतं. झोपण्याच्या आधी १ ग्लास पाणी प्या. सकाळी उठल्यानंतर पाणी द्या. ज्यामुळे त्यांना एनर्जी येईल.

हवं ते दिलं नाही की मुलं घर डोक्यावर घेतात? ५ गोष्टी करा, आपोआप शिस्त लागेल-शांत राहतील मुलं

7) सकाळी नाश्ता तयार ठेवा

सकाळी नाश्ता करणं फार गरजेचं आहे. मुलांच्या आवडीचा नाश्ता बनवा. ज्यामुळे ते लवकर उठतील.

8) वेळेवर झोपवा

मुलं वेळेवर झोपली तर वेळेवर उठतील. म्हणून त्यांनी योग्य प्रमाणात झोप घेणं गरजेचं आहे. मुलांच्या झोपण्याची आणि उठण्याची वेळ निश्चित ठेवा. 

Web Title: Parenting Tips : Easy Ways To Wake Up Kids Early In The Morning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.