Lokmat Sakhi >Parenting > तुमच्या मुलाला शिकवा ३ गोष्टी! मोठं होताना चुकीचं वागणार नाही, नक्की तुमचं नाव काढेल..

तुमच्या मुलाला शिकवा ३ गोष्टी! मोठं होताना चुकीचं वागणार नाही, नक्की तुमचं नाव काढेल..

Parenting Tips: तुम्ही जर मुलाचे पालक असाल तर त्याला कोणत्या गोष्टी शिकवायलाच पाहिजेत ते पाहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2024 03:53 PM2024-11-28T15:53:59+5:302024-11-28T18:16:00+5:30

Parenting Tips: तुम्ही जर मुलाचे पालक असाल तर त्याला कोणत्या गोष्टी शिकवायलाच पाहिजेत ते पाहा

Parenting tips, every parents should teach 3 things to their son for getting better life and become successful | तुमच्या मुलाला शिकवा ३ गोष्टी! मोठं होताना चुकीचं वागणार नाही, नक्की तुमचं नाव काढेल..

तुमच्या मुलाला शिकवा ३ गोष्टी! मोठं होताना चुकीचं वागणार नाही, नक्की तुमचं नाव काढेल..

Highlightsआपल्या मुलाला पालकांनी कोणत्या गोष्टी शिकवणं खूप गरजेचं आहे, याविषयी .....

हल्ली मुलांचं संगोपन करणं, त्यांना वाढवणं, आयुष्याची योग्य दिशा मिळवून देण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करणं या सगळ्या गोष्टी खूप अवघड झाल्या आहेत. कारण काही वर्षांपूर्वी जसं सामाजिक, कौटुंबिक वातावरण होतं तसं आता राहिलेलं नाही. म्हणूनच मुलांच्या बाबतीत पालकांनी अधिक जागरूक होणं गरजेचं झालं आहे. तुमच्या मुलाने आयुष्यात छोट्या छोट्या नकारात्मक गोष्टींमुळे हातपाय गाळून बसू नये, जीवनाकडे नेहमीच नव्या सकारात्मक दृष्टीने पाहावं, यासाठी त्याला काही गोष्टी शिकवणं गरजेचं आहे. त्या ३ गोष्टी नेमक्या कोणत्या ते पाहा..(every parents should teach 3 things to their son for getting better life and become successful)

 

पालकांनी मुलाला शिकवाव्या अशा ३ गोष्टी 

आपल्या मुलाला पालकांनी कोणत्या गोष्टी शिकवणं खूप गरजेचं आहे, याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ vishruti_joyes_parenting या इन्स्टाग्राम पेजवर पॅरेंटिंग एक्सपर्टने शेअर केला आहे. 

लग्नसराईसाठी दागिने- कपडे कसे घ्यावे? करिना कपूरकडून घ्या फॅशन टिप्स- सगळ्यांपेक्षा सुंदर दिसाल

१. त्यात सांगण्यात आलेली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या मुलाला हे आवर्जून शिकवा की कुटुंबातले सगळेचजण समसमान आहेत. कुटुंबातला जो व्यक्ती पैसा कमावून आणतो, त्याच्या एवढेच महत्त्व घरातल्या इतर गोष्टी सांभाळून घराचं घरपण, आनंद टिकवून ठेवणाऱ्या इतर सदस्यांनाही आहे. त्यामुळे घरातल्या प्रत्येकाचाच सन्मान करा. 

 

२. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या मुलाला जर कधी रडावेसे वाटले, तो कधी इमोशनल झाला तर त्याला त्याच्या भावना मोकळ्या करू द्या. तु मुलगा आहेस, रडू नको, असं म्हणून त्याला थांबवू नका. त्याला रडू द्या, ओरडू द्या आणि व्यक्त होऊ द्या. आपल्या भावना नेहमीच व्यक्त करण्याची सवय त्यांना लावा. 

नर्सरीतून रोपं आणताना कोणत्या गोष्टी तपासून घ्याव्या? ४ टिप्स- हिवाळ्यातली फुलझाडांची खरेदी होईल परफेक्ट

३. तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्या मुलाला नाही म्हणायला शिकवा. एखादी गोष्ट पटत नसेल तर ती त्याला स्पष्टपणे सांगता यायला हवी. बऱ्याचदा मनातलं मनमोकळेपणाने न बोलता आल्यामुळे मुलांची खूप घुसमट होते. त्यांना प्रत्येकवेळी मन मारून, दबून जगावं लागतं. असं तुमच्या मुलांच्या बाबतीत व्हायला नको.


 

Web Title: Parenting tips, every parents should teach 3 things to their son for getting better life and become successful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.