मुलांनी अभ्यासात, वाचन-लिखाणात उत्तम कामगिरी करून चांगलं नाव कमवावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. आपल्या मुलांनी चांगला अभ्यास करावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. (Parenting Tips)आपल्या मुलांनी परिक्षेत यश मिळवावा असं प्रत्येकालाच वाटतं. काही सोप्या टिप्स तुमच्या मुलांची लर्निंग एबिलिटी वाढवू शकतात आणि त्याचे स्किलसुद्धा वाढवू शकतात. (Parenting Tips In Marathi) लर्गिंगमुळे एबिलिटी आणि स्किल वाढवण्यास मदत होते. लर्निंगचा अर्थ फक्त कोर्सची पुस्तक वाचणे असा नसतो. (Parenting Tips Expert Advice Tips For Success In Studies For Students Experts Advice)
वाचणं म्हणजे फक्त भाषा सुधारणे किंवा भाषा शिकणं असे नाही. पुस्तकं मुलांना फक्त पुस्तकी ज्ञान देत नाहीत तर मुलांची कल्पनाशक्ती आणि तर्कशक्ती वाढवतात. मुलांना पुस्तकं वाचायला प्रेरणा देत राहा. ज्यामुळे त्यांची जिज्ञासा आणि उत्सुकता वाढते. छोट्या मुलांसाठी संपूर्ण जग एखाद्या क्लासरूमप्रमाणे असते. शाळेबाहेरही त्यांना शिकण्यासाठी खूप काही असते.
मुलांच्या अभ्यासाबाबत जागरूक राहा
मुलांनी अभ्यासात चांगली कामगिरी करावी यासाठी त्यांची पुस्तकं, होमवर्क, स्कूल असाईनमेंट्स याबाबत माहिती ठेवा. मुलांशी याविषयावर मनमोकळेपणाने चर्चा करा. मुलांच्या संपर्कात राहून त्यांच्या शैक्षणिक गरजांबद्दल सांगा.
कंबर-गुडघ्यांचं दुखणं फार वाढलंय? बाबा रामदेव सांगतात ५ पदार्थ खा-हाडं ठणकणंच होईल बंद
मुलांच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटवर फोकस करा
मुलं फक्त पुस्तकी किडा न राहता त्यांनी त्यांच्या पर्सनॅलिटीकडेसुद्धा लक्ष द्यायला हवं. ज्यामुळे मुलं अधिकच कॉन्फिडेंट, रिस्पॉन्सिबल राहतात. मुलांचे पालक, टिचर्स आणि आजूबाजूचे वातावरणही महत्वाचे असते.
मुलांची खासियत ओळखा
प्रत्येक मुलामध्ये काहीना काही खास गोष्ट असते. मुलांमधील वेगळेपण ओळखायला शिका. मुलांमध्ये क्रिएटीव्ह स्किल, क्रिएटिव्ह ऑर्गेनायजेशनल स्किल शिकवणं गरजेचं असतं. अभ्यासाठी योग्य वातावरण असेल तर रुटीन तयार करणं गरजेचं असतं. नियमित अभ्यासाची सवय झाल्यास मुलांमध्ये आवड निर्माण होईल. मुलांच्या रूटीनमध्ये खेळांचा समावेश करा.
मुलांच्या उत्तम वाढीसह मेंदूविकासासाठी आहारात हवे ५ पदार्थ, एकाग्रता-स्मरणशक्तीही वाढेल
मुलांचे कौतुक करणं फार गरजेचं असतं
मुलांसाठी उपलब्ध असलेल्या छोट्या छोट्या संधी त्यांच्यासाठी मोठ्या शिड्या असू शकतात. मुलांचे कौतुक करायला विसरू नका. तुम्ही प्रशंसा केल्यामुळे मुलांना प्रोत्साहन मिळते आणि ते अजून चांगले काम करण्यास प्रेरणा मिळते.