सध्या मुलांच्या उन्हाळी सुट्ट्या चालू आहेत. त्यामुळे घरोघरी सध्या दिवसभर मुलांचा धुडगूस चालू आहे. मुलांचं सतत काही ना काही मागणं, हट्ट करणंही आहेच. त्यामुळे बरेच पालक सध्या मुलांच्या चिडचिड करण्याचा, मनासारखं न झाल्यास लगेच रडून थयथयाट करण्याचा अनुभव घेत आहेत. अशा हट्टी, चिडचिड्या मुलांना शांत कसं करावं असा प्रश्न बऱ्याच पालकांना पडतो. कारण मुलं असं वागणं जेव्हा वाढतं आणि ते दुसऱ्यांसमोर असं वागू लागतात, तेव्हा पालक खरंच वैतागून जातात. तुम्हीही तुमच्या मुलांच्या अशा पद्धतीच्या वागण्यामुळे त्रस्त झालेले असाल तर हे काही उपाय करून पाहा. यामुळे मुलांचा चिडचिडा स्वभाव, हट्टीपणा थोडा कमी होईल आणि ते शांत, समजूतदार होण्यास मदत होईल. (how to handle demanding child?)
मुलांचा चिडचिडा स्वभाव, हट्टीपणा कमी करण्यासाठी उपाय
१. बऱ्याचदा असं होतं की आई- बाबांची मुलांना समजून सांगण्याची पद्धत चुकते. किंवा आई- बाबा अशा पद्धतीने मुलांच्या मागण्यांना नकार देतात, ज्यावरून मुलांना त्यांचे आई- बाबा त्यांचे शत्रू वाटू लागतात.
जेवण झाल्यानंतर करा फक्त २ गोष्टी, वजन वाढणार नाही-पोटही सुटणार नाही, आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात...
आपलीही पद्धत चुकतेय का हे एकदा तपासून पाहा. मुलांना हट्ट केलेली अमूक एक गोष्ट त्यांच्यासाठी कशी चुकीची आहे, त्यामुळे मुलांचं कसं नुकसान होऊ शकतं, हे त्यांना समजून सांगा.
२. मुलं दिवसभर सतत वेगवेगळ्या गोष्टींसाठी हट्ट करतात. त्यामुळे मुलांना दिवसाच्या सुरुवातीलाच एक गोष्ट स्पष्ट सांगून टाका की त्यांच्या दिवसभरातून फक्त १ किंवा २ गोष्टीच ऐकल्या जातील.
पोळी, पराठ्यांना तूप लावून भाजताना 'ही' चूक करणं आरोग्यासाठी घातक! बघा तुमचंही चुकतंय का
त्यांच्या मागण्यांपैकी कोणती गोष्ट त्यांच्यासाठी जास्त महत्त्वाची आहे, हे त्यांचं त्यांना ठरवू द्या. यामुळे आपोआपच त्यांचं हट्ट करणं कमी होईल.
३. बऱ्याचदा असं होतं की मुलं जेव्हा चिडलेले असतात, तेव्हाच आई- वडील त्यांना एखादी गोष्ट समजावून सांगतात. त्यावेळी मुलं अजिबात ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतात.
पोटातून सारखा गुडगुड आवाज येतो? तज्ज्ञ सांगतात त्यामागची कारणं, आवाजाकडे दुर्लक्ष नकोच कारण....
त्यामुळे मुलं जेव्हा चांगल्या मूडमध्ये असतील, तेव्हा त्यांच्याशी गप्पा मारा. आणि गप्पांमधून हळूच त्यांच्या हट्टीपणाबद्दल, चिडचिडेपणाबद्दल समजून सांगता. ते ऐकून आणि समजून घेतील.