Join us  

तुमची मुलं हायपरॲक्टिव्ह, तडतडी आहेत? मुलांच्या उत्तम वाढीसाठी पाहा कारणं आणि उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2022 5:57 PM

Parenting Tips for Hyperactive child : मुलं शांत होतील, तुम्हालाही मिळेल थोडा आराम...

ठळक मुद्देमुलं स्क्रीनवर काय आणि किती वेळ पाहतात याकडे पालकांनी विशेष लक्ष द्यायला हवे. मुलं हायपर अॅक्टीव्ह असण्यामागे नेमकं काय कारण असते ते समजून घ्यायला हवे..

पालकत्व ही इतकी मोठी जबाबदारी आहे हे आपल्याला पालक व्हायच्या आधी कदाचित लक्षात येत नाही. पण मूल झाले की आपल्याला हळूहळू याची कल्पना यायला लागते. सकाळी आपले डोळे उघडण्याच्या आधीपासून ते रात्री आपले डोळे मिटायला लागले तरी मुलांचा सतत धिंगाणा किंवा काही ना काही सुरू असते. सतत अॅक्टीव्हीटी करणारी, बागडणारी आणि हसत-खेळत घर डोक्यावर घेणारी मुलं म्हणजे घराचं वैभव असतात असं म्हणतात. हे जरी खरं असलं तरी अशा हायपर अॅक्टीव्ह मुलांना सांभाळणं हा पालकांसाठी एक मोठा टास्क असतो. आता मुलं इतकी हायपर अॅक्टीव्ह असण्याची कारणे काय? सतत तडतड केल्याने त्यांना तर शांती मिळतच नाही पण घरातही शांतता राहत नाही. मुलांचा अॅक्टीव्हपणा नियंत्रणात आणण्यासाठी आणि त्यांची एनर्जी योग्य ठिकाणी खर्च व्हावी यासाठी काय करायला हवं याविषयी पालकांनी समजून घेणे गरजेचे आहे. पॅरेंटींग डायरीज विथ प्रिती या इन्स्टाग्राम पेजवर प्रिती याविषयी काही महत्त्वाच्या टिप्स सांगतात (Parenting Tips for Hyperactive child). 

(Image : Google)

१. डाएटमधील शुगर लेव्हल चेक करा

मुलांच्या डाएटमध्ये जास्त प्रमाणात शुगर असेल तर ते हायपर अॅक्टीव्ह असण्याची शक्यता असते. लहान मुलं घरात आणि बाहेरही जास्त प्रमाणात आईस्क्रीम, चॉकलेट, केक, कुकीज असे पदार्थ खातात. या पदार्थांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असल्याने हे पदार्थ जास्त खाणारी मुलं हायपर अॅक्टीव्ह असतात. त्यामुळे मुलांच्या आहारातील साखरेचे प्रमाण कमी करायला हवे. 

२. झोपेचे शेड्य़ूल 

मुलांची झोप सतत मोडत असेल किंवा अर्धवट होत असेल तर मुलांना आरोग्याच्या विविध तक्रारींना तोंड द्यावे लागते. आपली झोप अर्धवट झाली तर आपण स्लो होतो. मात्र लहान मुलांमध्ये त्यांची झोप अर्धवट झाली तर काही केमिकल्सची निर्मिती होते आणि ती आहेत त्याहून जास्त अॅक्टीव्ह होतात. त्यामुळे मुलांचे झोपेचे शेड्यूल योग्य आहे ना, त्यांची रात्रीची आणि दुपारची झोप व्यवस्थित होते ना याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. 

३. स्क्रीनवर पाहत असलेला कंटेंट 

मुलं अनेकदा आपल्यासमोर किंवा आपल्या अपरोक्ष स्क्रीनवर असतात. स्क्रीनवर ते काही जास्त अॅग्रेसिव्ह असा गेम खेळत असतील, कंटेंट पाहत असतील तर ते विनाकारण जास्त अॅक्टीव्ह होतात. तसेच झोपण्याच्या आधी मुलं स्क्रीन पाहत असतील तर फोनमधील ब्लू रेजचा मुलांवर थेट परिणाम होतो आणि मुलं अॅक्टीव्ह होतात. त्यामुळे मुलं स्क्रीनवर काय आणि किती वेळ पाहतात याकडे पालकांनी विशेष लक्ष द्यायला हवे. 

टॅग्स :पालकत्वलहान मुलं