Lokmat Sakhi >Parenting > मुलांचे उच्चार स्पष्ट व्हावेत, त्यांना उत्तम बोलता यावे, त्यांच्या भाषा विकासासाठी पालकांनी कराव्या ५ गोष्टी..

मुलांचे उच्चार स्पष्ट व्हावेत, त्यांना उत्तम बोलता यावे, त्यांच्या भाषा विकासासाठी पालकांनी कराव्या ५ गोष्टी..

Parenting tips for Language Development In Children : पालकांनी बाकीच्या मुलांशी स्पर्धा न करता स्वतःच्या मुलांशी स्पर्धा केली तर मुलाची प्रगती पाहून पालकांना समाधान वाटेल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2022 02:09 PM2022-09-29T14:09:06+5:302022-09-29T14:21:04+5:30

Parenting tips for Language Development In Children : पालकांनी बाकीच्या मुलांशी स्पर्धा न करता स्वतःच्या मुलांशी स्पर्धा केली तर मुलाची प्रगती पाहून पालकांना समाधान वाटेल.

Parenting tips for Language Development In Children : 5 things parents should do to improve children's speech and language development | मुलांचे उच्चार स्पष्ट व्हावेत, त्यांना उत्तम बोलता यावे, त्यांच्या भाषा विकासासाठी पालकांनी कराव्या ५ गोष्टी..

मुलांचे उच्चार स्पष्ट व्हावेत, त्यांना उत्तम बोलता यावे, त्यांच्या भाषा विकासासाठी पालकांनी कराव्या ५ गोष्टी..

Highlightsरात्री एकत्र जेवताना गप्पा मारत असाल, तर मुलांना ऐकण्याची आणि बोलण्याची सवय लागते. विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं देणं, शाळेमध्ये काय घडलं हे अचूक सांगणं अश्या सवयी मुलांना लागतील.मुलांची आकलनाची भाषा ( receptive language)आणि बोलण्याची भाषा ( expressive language)सारखी असेल तर मुलं भाषा लवकर शिकू शकतात. 

ऋता भिडे 

मुलांचा भाषा विकास होण्यासाठी पालकांनी योग्य त्या वेळी योग्य त्या गोष्टी करणं अतिशय महत्त्वाचं असतं. मुलांशी काही खेळ खेळणं , इतर मुलांबरोबर खेळ खेळायला देणं, बाहेरच्या वातावरणाची ओळख करून देणं , घरी सकारात्मक वातावरण ठेवणं गरजेचं आहे. म्हणजेच तुमच्या मुलाच्या मेंदू विकासाला योग्य ते सिग्नल मिळतात आणि योग्य वयात त्यांचा चांगल्या पद्धतीने विकास होतो. पालकांचा मोबाईलशी संवाद कमी आणि मुलांशी संवाद जास्त झाला तर त्यांचा भाषा विकास लवकर आणि खूप चांगला होईल. सगळ्यात महत्त्वाचे मुलं तुम्हाला काही सांगत असतील तर त्यांच्याकडे लक्ष द्या. तुमच्या मोबाइलपेक्षा मुलांचे बोल जास्त महत्वाचे आहेत कारण, ते बोल अमूल्य आहेत (Parenting tips for Language Development In Children).  

(Image : Google)
(Image : Google)

हे सगळं करत असताना मुलांच्या थेरपिस्ट बरोबर  डॉक्टरांबरोबर संवाद साधणं गरजेचं आहे. प्रत्येक मुलाची प्रगती वेगवेगळी असते. त्यामुळे पालकांनी बाकीच्या मुलांशी स्पर्धा न करता स्वतःच्या मुलांशी स्पर्धा केली तर मुलाची प्रगती पाहून पालकांना समाधान वाटेल मुलांचा भाषेचा विकास हा जास्त करून ते कोणती भाषा ऐकत आहेत ह्यावर होतो. खूपदा परदेशात राहणारी मुलं तिकडची भाषा जास्त लवकर शिकतात असं दिसून येतं, ह्याच कारण म्हणजे, ती मुलं त्या देशाची भाषा जास्त ऐकतात. मुलांच्या वयानुसार त्यांच्या भाषेचा विकास होतो आहे का नाही हे पालकांनी पाहणं जरुरीचं आहे. ह्यामध्ये मुलांची आकलनाची भाषा ( receptive language)आणि बोलण्याची भाषा ( expressive language)सारखी असेल तर मुलं भाषा लवकर शिकू शकतात. 

आता पालक नेहमी एक प्रश्न विचारतात, तो म्हणजे, “ शाळेमध्ये मुलाला इंग्रजी असतं आणि आम्ही घरामध्ये मराठी बोलतो, मग मुलगा भाषेच्या गोंधळात नाही का पडणार?”आणि काही पालक असा विचार करून, अचानक मुलं २ वर्षाची झाल्यावरती त्याच्याशी इंग्रजी मध्ये संवाद साधायला लागतात. अशावेळी तुम्ही पालक म्हणून अचानक वेगळ्या भाषेमध्ये तुम्ही फक्त तुमच्या मुलाशी बोलायला लागलात, आणि घरामध्ये इतरांशी वेगळ्या भाषेमध्ये बोलत असाल तर मुलाला व्यक्त व्हायला परत शब्दांची जुळवाजुळव करावी लागेल,यामुळे मुलांचे कन्फ्युजन वाढते. त्यापेक्षा सगळ्यांशी एकाच भाषेत बोला. 

(Image : Google)
(Image : Google)

भाषा विकासासाठी काय कराल? 

१. Pretend Play किंवा नक्कल करणं - ह्यामध्ये मुलांना सांगितलेली गोष्ट, माहिती असलेलं एखादं पात्र  (character) मुलांना करायला सांगू शकता. यामध्ये भाषेच्या विकासाबरोबरच त्यांच्या कल्पनाशक्तीलाही चालना मिळेल. 

२. गोष्ट सांगणे - लहान मुलांना तुम्ही वेगवेळ्या गोष्टी सांगितल्या तर त्यांचा शब्दसंग्रह तर वाढेलच पण त्यांना नवीन विषय, व्यक्तींची ओळख अशाप्रकारच्या अनेक गोष्टी समजतील. 

३. शब्दकोडी - मुलांना एखादं अक्षर देऊन त्याच्यावरचे शब्द सांगायला देणे, कोडी घालणे, नावाच्या भेंड्या खेळणे असे खेळ तुम्ही खेळू शकता. 

४. नवीन जागेचा अनुभव - अनुभवातून मुलं खूप लवकर शिकतात. तुम्ही मुलांना घेऊन बाहेर गेलात, तर तिथल्या जागेविषयी, माणसांविषयी आधीच थोडी माहिती द्या. तुम्ही मुलांना निसर्गामध्ये, संग्रहालयांमध्ये, मित्रमैत्रिणींच्या घरी, वेगवेगळ्या प्रकारच्या दुकानांमध्ये, बँकेत, पोस्टऑफिस मध्ये असं कुठेही घेऊन जाऊन हा अनुभव देऊ शकता. 

५. गप्पा- रात्री एकत्र जेवताना गप्पा मारत असाल, तर मुलांना ऐकण्याची आणि बोलण्याची सवय लागते. विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं देणं, शाळेमध्ये काय घडलं हे अचूक सांगणं अश्या सवयी मुलांना लागतील. पालकांनी सुद्धा ह्या वेळेस त्यांच्या दिवसभरातले अनुभव सांगणं गरजेचं आहे. 

(लेखिका समुपदेशक आणि मेंदू व भाषाविकासतज्ज्ञ आहे.)

rhutajbhide@gmail.com


 

Web Title: Parenting tips for Language Development In Children : 5 things parents should do to improve children's speech and language development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.