Lokmat Sakhi >Parenting > मुलं हट्टी झाली- उद्धटपणा करतात? गौर गोपाल दास यांचा खास सल्ला, आईबाबांचं चुकतं कुठं पाहा..

मुलं हट्टी झाली- उद्धटपणा करतात? गौर गोपाल दास यांचा खास सल्ला, आईबाबांचं चुकतं कुठं पाहा..

How To Handle Child When He Is Not Listening You Advice : मुलांचे हट्ट समजून संयमाने वागत त्यांना वळण कसं लावाल?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 01:43 PM2024-08-28T13:43:44+5:302024-08-28T23:13:47+5:30

How To Handle Child When He Is Not Listening You Advice : मुलांचे हट्ट समजून संयमाने वागत त्यांना वळण कसं लावाल?

Parenting Tips Gaur Gopal Das Tells How To Handle Child When He Is Not Listening You Advice | मुलं हट्टी झाली- उद्धटपणा करतात? गौर गोपाल दास यांचा खास सल्ला, आईबाबांचं चुकतं कुठं पाहा..

मुलं हट्टी झाली- उद्धटपणा करतात? गौर गोपाल दास यांचा खास सल्ला, आईबाबांचं चुकतं कुठं पाहा..

पालकत्व (Parenting Tips) काही सोपं नसतं. आई वडिलांचा छोट्यात छोटा निष्काळजीपणा मुलांना महागात पडू शकतो.  अनेक पालक मुलांचे म्हणणं ऐकण्यास तयार नसतात. मोटिव्हेशनल स्पिकर गुरू गौर गोपाल दास यांनी उत्तम पालक बनण्यासाठी खास सल्ला दिला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार आई वडीलांनी हे समजून घ्यायला हवं की मुलं त्यांचे का ऐकत नाहीत. याचं कारण समजून घेतल्यानंतर समस्येचे समाधान मिळवता येते.

मुलांचे वागणं बोलणं त्यांच्या सवयींशी निगडीत असते. (Gaur Gopal Das Advice On Parenting) गौर गोपाल दास यांनी काही पेरेंटींग टिप्स सांगितल्या आहेत ज्यामुळे मुलं आई वडीलांनी सांगितलेलं ऐकतील. (Parenting Tips Gaur Gopal Das Tells How To Handle Child When He Is Not Listening You Advice)

वयानुसार बोलणं-चालणं असायला हवं

मुलांशी बोलताना त्यांच्या वयाचा विचार करायला हवा. छोट्या मुलांशी सरळ वाक्यात बोला. ज्यामुळे मुलांवर  गंभीर परिणाम होतो. मुलांची खोली साफ ठेवायला हवी, त्यांना आपली खेळणी जागच्याजागी ठेवायला सांगा. कारण वेळीच खेळणी जागच्याजागी ठेवली तर पुन्हा शोधावी लागत नाहीत. मुलांना विनम्रतेनं आपलं म्हणणं समजावून सांगा.

आय कॉन्टॅक्ट ठेवा

मुलांशी बोलताना नेहमी आय कॉन्टॅक्ट ठेवा. ज्यामुळे मुलांना तुमच्या बोलण्यातील गांभिर्य कळेल. याशिवाय त्यांच्यात डोळ्यात बघून बोलण्याची सवय विकसित होईल. ज्यामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास वाढेल.  ते आपण म्हणणं व्यक्त करायला घाबरणार नाही. 

खाण्यापिण्याबात WHO नं दिल्या गाईडलाईन्स; तब्येत चांगली ठेवायची तर काय खायचं, काय टाळायचं- पाहा

लिमिट निश्चित करा

क्लिवलँण्ड क्लिनिकच्या रिपोर्टनुसार मुलांना आपल्या बाऊंड्रीज माहित असायला हव्यात. मुलांसाठी त्यांच्या मर्यादा सेट करून द्या.  मुलांच्या  वागण्याबोलण्यासंबंधित  मर्यादा निश्चित करा. त्यांना प्रेमाने समजावून सांगा. त्यांना सांगा की मोठ्यांशी ओरडून बोलू नये. आपल्या लिमिट्सचं पालन तुम्ही केलं तर मुलंही करतील. जर मुलं आपल्या लिमिट्सच्या बाहेर गेले तर त्यांचं नुकसान होईल हे त्यांना कळायला हवं. 

पोट सुटलं-फिगर बिघडली, कंबर जाड दिसतं? जेवणानंतर २ पदार्थ खा; झटपट स्लिम होईल पोट

शांती आणि धैर्य

मुलांच्या बोलण्यातून अनेकदा तुमच्या धैर्याची परिक्षा होते. नम्रतेने बोललण्याने शांती आणि धैर्य टिकून राहण्यास मदत होते. राग दाखवणं  किंवा ओरडून बोलल्यानं मुलंही तसंच करतात. म्हणून प्रत्येकाशी प्रेमानं बोलायला हवं.  तेव्हाच मुलं शांतपणे बोलायला शिकतील.

Web Title: Parenting Tips Gaur Gopal Das Tells How To Handle Child When He Is Not Listening You Advice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.