मुलं ऐकत नाहीत, अभ्यास करत नाहीत, सतत खोड्या करतात, त्यामुळे बरेच पालक मुलांना नेहमी ओरडतात. तसं करायलाच पाहिजे. त्यात काहीच गैर नाही. कारण मुलांना चांगल्या गोष्टी शिकवायच्या, त्यांना चांगलं वळण लावायचं तर पालकांना काही ठिकाणी कठोर भुमिका घेणं गरजेचंच आहे. पण असं जर सतत होत असेल किंवा २४ तास तुम्ही पालकांच्याच भुमिकेत राहून मुलांना शिस्त लागावी म्हणून धाकात ठेवत असाल, तर हे मात्र चुकीचं आहे. यामुळे मुलांवर सकारात्मक परिणाम होण्याऐवजी नकारात्मक परिणाम होऊ शकतात. त्यामुळे शिस्त, धाक कधी आणि कुठे दाखवावा, याचा विचार पालकांनी एकदा जरूर करावा (How Over Strictness Destroy Your Kids?)...
मुलांना सतत धाकात ठेवत असाल तर....
१. काही पालक मुलांना कोणती गोष्ट कशी करावी, कुठे करावी, कधी करावी याची सगळी नियमावलीच देऊन टाकतात आणि मुलांनी काटेकोरपणे ती पाळावी, असा त्यांचा धाक असतो.
मांगटिका एकाजागी राहत नाही, सारखा सरकतो? १ खास सोपी ट्रिक- न हलता मांगटिका बसेल परफेक्ट
अशी मुलं याच शिस्तीत राहून राहून सांगकाम्या होऊन जातात. स्वत:चं डोकं चालवणं, स्वत:चा स्वत: निर्णय घेणं या त्यांच्यातल्या गोष्टी कमी होत जातात आणि बऱ्याचदा ते त्यांचा आत्मविश्वास हरवून बसतात. प्रत्येक गोष्ट पालकांना किंवा इतर कुणाला विचारल्याशिवाय त्यांना जमत नाही.
२. काही मुलं वर सांगितल्याप्रमाणे वागतात, तर काही मुलं मात्र त्याच्या अगदी विरुद्ध होतात. लहान असतात तोपर्यंत ते पालकांचं ऐकतात. पण त्यानंतर मात्र वयाचा एक ठराविक टप्पा ओलांडला की ते पालकांच्या विरुद्ध बंड पुकारतात.
जेटलॅगचा त्रास कमी करण्यासाठी प्रिटी झिंटाने शोधून काढला भन्नाट उपाय- पाहा व्हायरल व्हिडिओ
पालक जे सांगतील त्याच्या अगदी विरुद्ध वागतात. पालक त्यांना त्यांचे शत्रू वाटू लागतात. मग अशी मुलं बाहेरचा आश्रय शोधायला पाहतात. सुदैवाने मित्रमैत्रिण चांगले मिळाले तर ठीक. नाहीतर मग वाईट संगत मिळाली तर त्यांना बिघडायला वेळ लागत नाही. त्यामुळे मुलांना धाक लावा, पण त्यांचा आणि तुमचा संवादच खुंटेल अशी शिस्त मात्र मुळीच नको.
याविषयी सांगणारा हा एक व्हिडिओ पाहा