Lokmat Sakhi >Parenting > ‘... तर इम्पोटंट होशील!’ चुकीची माहिती करते घोळ, वयात येणाऱ्या मुलांना माहिती हव्या १० गोष्टी

‘... तर इम्पोटंट होशील!’ चुकीची माहिती करते घोळ, वयात येणाऱ्या मुलांना माहिती हव्या १० गोष्टी

Parenting Tips How Parents Should Give Sex Education to Adults : वयात येणाऱ्या मुलांना शास्त्रीय माहिती मिळत नाहीत त्यामुळे मिळेल त्या, चुकीच्या माहितीनेही ते नको त्या गोष्टी करतात, आणि घोळ होतो. तो होवू नये म्हणून..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2022 05:39 PM2022-12-09T17:39:37+5:302022-12-09T18:02:44+5:30

Parenting Tips How Parents Should Give Sex Education to Adults : वयात येणाऱ्या मुलांना शास्त्रीय माहिती मिळत नाहीत त्यामुळे मिळेल त्या, चुकीच्या माहितीनेही ते नको त्या गोष्टी करतात, आणि घोळ होतो. तो होवू नये म्हणून..

Parenting Tips How Parents Should Give Sex Education to Adults : '...then you will be impotent!' misinforms, 10 things coming of age children need to know | ‘... तर इम्पोटंट होशील!’ चुकीची माहिती करते घोळ, वयात येणाऱ्या मुलांना माहिती हव्या १० गोष्टी

‘... तर इम्पोटंट होशील!’ चुकीची माहिती करते घोळ, वयात येणाऱ्या मुलांना माहिती हव्या १० गोष्टी

Highlightsपालकांनी योग्य वेळी आपल्या मुलांना सेक्स एज्युकेशन देणं आवश्यक आहे. त्यातही त्यांना नेमकं काय सांगायला हवं याविषयी...वीर्य पतनाची भीती निर्माण करण्याचं कारण म्हणजे विद्यार्थ्यांनी अभ्यास, कला, क्रीडा यावर मन एकाग्र करावे, सेक्स च्या विचारांना थारा देऊ नये.

डॉ. लीना मोहाडीकर

जिममध्ये जाऊन व्यायाम करणाऱ्या एका तरुणाला त्याच्या इन्स्ट्रक्टरने सांगितलं की ‘हस्तमैथुन अजिबात करायचं नाही, वीर्याचा नाश होऊ द्यायचा नाही, नाहीतर मृत्युशी गाठ आहे.’ घाबरून त्याने हस्तमैथुन बंद केलं, पण झोपेत त्याचं वीर्य पतन होत राहिलं, ज्याला नाईट फॉल असंही म्हंटलं जातं. आणि त्यामुळे तो घाबरला. अशा अनेक गैरसमजूती वयात येणाऱ्या आणि तरुण मुलांच्या मनात असतात. मात्र त्याची शास्त्रीय माहिती न मिळाल्यानं त्यांच्यासह पुढे लग्नानंतर जोडीदारालाही अनेक त्रास सहन करावे लागतात (Parenting Tips How Parents Should Give Sex Education to Adults).

काय माहितीच नसतं?

१. प्रजोत्पादनासाठी पुरुषबीज म्हणजे शुक्राणू आणि स्त्री बीज यांचा संयोग व्हावा लागतो. स्त्री बीज हे बिजांड्कोशातून उत्सर्जित होऊन बिजांडवाहिन्यात येतं, तिथेच थांबतं. त्यामुळे शुक्राणूंना तीथपर्यन्त पोहोचविण्यासाठी वीर्य आवश्यक आणि वीर्य योनीमार्गात पडावं म्हणून पुरुष लिंगाची आवश्यकता असते.

(Image : Google)
(Image : Google)

२. वीर्याचा पातळ स्त्राव तयार करण्यासाठी मूत्राशयाखाली प्रोस्टेट आणि सेमिनल व्हेसिकल या दोन ग्रंथी असतात. वयात आल्यापासून या ग्रंथीमध्ये वीर्याचे पातळ स्त्राव आणि अंडकोशांमध्ये शुक्राणू तयार होत असतात. 

३. वीर्याचा आणि शुक्राणूंचा पुरुषाच्या शरीरातल्या कोणत्याच कामासाठी उपयोग नसतो. तयार झालेले वीर्य आणि शुक्राणू हे शरीराबाहेर पडण्यासाठीच असतात. त्यामुळे ‘वीर्यस्तंभन’ या संकल्पनेला काहीच अर्थ नाही. वीर्य शरीराबाहेर गेल्यामुळे शरीराचं काहीच नुकसान होत नाही. त्यामुळे वीर्यनाश ही कल्पना सुद्धा योग्य नाही.

४. पुरुष शरीरात शुक्राणू इतक्या मोठ्या संख्येने तयार होतात, एक सी.सी. विर्यात कमीत कमी 2 ते 3 कोटी शुक्राणू असतात. आणि गर्भधारणा व्हायची असेल तर स्त्रीबीजाशी फक्त एकच शुक्राणू संयोग पावू शकतो. म्हणजे तसं म्हटलं तर एव्हढे कोट्यवधी शुक्राणू मरण्यासाठीच जन्मास येतात. ते संबंधात योनीमार्गात पडले काय, आणि स्वप्नावस्थेत व हस्तमैथुनात बाहेर पडले काय, ते मरतातच.

५. स्त्रीच्या योनीमार्गात वीर्य पडण हे तिच्या शरीरात टॉनिक सारखं काम करतं. लग्नानंतर स्त्रीचं वजन थोडं वाढलं तर ते विर्यामुळे असं या लोकांना वाटत असतं. तसं अजिबात नाही. कोणत्याही व्यक्तिचं वजन वाढण हे खाण्यावर, मनाच्या स्वस्थतेवर अवलंबून असतं, शिवाय आनुवंशिकता हे कारण सुद्धा असू शकतं.

६. आयुर्वेदात सप्तधातूंचं महत्व सांगितलं जातं. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे ते सात धातु असतात. शुक्र हा सातवा धातू असल्यामुळे वरील सहा धातूंपासून तो बनतो असं मानलं गेल्यामुळे वीर्य बाहेर पडलं की रक्ताचे काही थेंब वाया गेल्या सारखे आहेत असाही गैरसमज  रूजला गेला.

(Image : Google)
(Image : Google)

७. ज्या अर्थी मूत्र, मल यांचं विसर्जन थांबवू शकत नाही, त्या अर्थी वीर्य हे पण बॉडी फ्लूएड असल्यामुळे ते थांबवू शकत नाही. मात्र वीर्यपतन होण्यासाठी लैंगिक उत्तेजना आवश्यक असतात हा फरक आहे.

८. पौगंडावस्थेतील मुलांच्या मनात वारंवार कामवासना उफाळून येऊ शकतात. त्या समाज बंधनांमुळे दाबवल्या जातात. पण झोपेत मनावरचे संयम ढिले पडलेले असतात, त्यामुळे जागेपणी दबवलेली कामवासना उफाळून येते आणि तशी शृंगाराची, संबंधाची स्वप्न पडतात. स्वप्न अस्पष्ट, विसंगत, कधी विकृत असले तरी त्याने मेंदूतील आणि पाठीच्या कण्यातील लैंगिक केंद्र उत्तेजित होऊन वास्तवातलं वीर्यपतन होतं.

९. कधी कधी काही मुलांना दिवसा सुद्धा एकदम उत्तेजना वाढल्या तर जागेपणीही आपोआप वीर्यपतन होऊ शकतं. या पाठीमागे कोणताही शारीरिक दोष नसतो. वीर्य पतनाची भीती निर्माण करण्याचं कारण म्हणजे विद्यार्थ्यांनी अभ्यास, कला, क्रीडा यावर मन एकाग्र करावे, सेक्स च्या विचारांना थारा देऊ नये.

१०. हस्त मैथुन थांबवलं तरी वीर्य निर्मिती होतच राहणार, मनात कामुक विचार येतच राहणार. म्हणून वागणुकीचा संयम तरुणांना शिकवणं जास्त महत्वाचं.

(लेखिका लैंगिकतातज्ज्ञ आहेत.)
 

Web Title: Parenting Tips How Parents Should Give Sex Education to Adults : '...then you will be impotent!' misinforms, 10 things coming of age children need to know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.