Lokmat Sakhi >Parenting > मुलांना शिस्त लावायची म्हणून तुम्ही सतत ओरडता, धाक दाखवता? तज्ज्ञ सांगतात, मुलांवर होणारे ५ परिणाम

मुलांना शिस्त लावायची म्हणून तुम्ही सतत ओरडता, धाक दाखवता? तज्ज्ञ सांगतात, मुलांवर होणारे ५ परिणाम

Parenting Tips How Strict Parenting Can Lead Depression : आपल्या शिस्त लावण्याचा आणि धाकाचा मुलांच्या मानसिकतेवर काही परीणाम होणार नाही ना याचा विचार पालकांनी जरुर करायला हवा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2022 10:34 AM2022-11-08T10:34:52+5:302022-11-08T10:35:02+5:30

Parenting Tips How Strict Parenting Can Lead Depression : आपल्या शिस्त लावण्याचा आणि धाकाचा मुलांच्या मानसिकतेवर काही परीणाम होणार नाही ना याचा विचार पालकांनी जरुर करायला हवा.

Parenting Tips How Strict Parenting Can Lead Depression : Do you constantly shout and threaten children to discipline them? Experts say, 5 effects on children | मुलांना शिस्त लावायची म्हणून तुम्ही सतत ओरडता, धाक दाखवता? तज्ज्ञ सांगतात, मुलांवर होणारे ५ परिणाम

मुलांना शिस्त लावायची म्हणून तुम्ही सतत ओरडता, धाक दाखवता? तज्ज्ञ सांगतात, मुलांवर होणारे ५ परिणाम

Highlightsतुम्हीही आपल्या मुलांना प्रमाणाबाहेर शिस्त लावत नाही आणि धाकात ठेवत नाही ना याचा एकदा आवर्जून विचार करा. या संशोधनात १२ ते १६ वर्षे वयोगटातील मुलांचा अभ्यास करण्यात आला.

मुलांना शिस्त लावणे हे एक मोठे जिकरीचे काम असते. मुलांनी आयुष्यात चांगला माणूस घडावे, त्यांना चांगल्या सवयी लागाव्यात यासाठी पालक म्हणून आपण झगडत असतो. लहान वयात ते चांगल्या गोष्टी शिकले तर पुढे त्यांना त्याचा फायदा होईल यासाठी आपण त्यांना सतत शिस्त लावतो. मुलांनी आपल्या म्हणण्याप्रमाणे चांगले आणि शिस्तीतच वागावे यासाठी अनेकदा पालकांचा अट्टाहास सुरू असल्याचे दिसून येते. मुलांना शिस्त लावताना अनेकदा आपण त्यांना ओरडतो, कधी काही गोष्टींचा धाक दाखवतो. असे करणे मुलांच्या फायद्यासाठी असले तरी त्याचा मुलांच्या मानसिक आरोग्यावर कितपत परिणाम होतो हे लक्षात घ्यायला हवे (Parenting Tips How Strict Parenting Can Lead Depression). 

तर ल्यूवेन विद्यापीठात करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार, जे पालक आपल्या मुलांवर जास्त प्रमाणात हक्क गाजवतात त्या मुलांमध्ये किशोरवयात नैराश्य आणि इतर मानसिक तक्रारी उद्भवतात. म्हणून मुलांना धाक लावताना पालकांनी योग्य ती काळजी घ्यायला हवी. आपल्या शिस्त लावण्याचा आणि धाकाचा त्यांच्या मानसिकतेवर काही परीणाम होणार नाही ना याचा विचार पालकांनी जरुर करायला हवा. या संशोधनात १२ ते १६ वर्षे वयोगटातील मुलांचा अभ्यास करण्यात आला. त्यातील ज्या मुलांचे पालक त्यांच्याशी खूप कठोर वागत होते त्यांना डिप्रेशन म्हणजेच नैराश्याचा सामना करावा लागत असल्याचे दिसले. म्हणूनच जे पालक खूप जास्त प्रमाणात शिस्त लावतात त्या मुलांमध्ये खालील परिणाम दिसून येतात. हे परीणाम मुलांच्या भविष्यासाठी अनेकदा घातक असू शकतात. त्यामुळे तुम्हीही आपल्या मुलांना प्रमाणाबाहेर शिस्त लावत नाही आणि धाकात ठेवत नाही ना याचा एकदा आवर्जून विचार करा. 

(Image : Google)
(Image : Google)

१. आत्मसन्मानाची कमतरता असणे.

२. सामाजिक क्षमता कमी असल्याने समाजात वावरण्याबाबत संकोच असणे 

३. घराच्या बाहेर आक्रमक वागणूक

४. अपयश स्वीकारण्यात अडचणी येणे

५. सतत निराशा वाटणे 
 

Web Title: Parenting Tips How Strict Parenting Can Lead Depression : Do you constantly shout and threaten children to discipline them? Experts say, 5 effects on children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.