Lokmat Sakhi >Parenting > मुलं खूपच टीव्ही पाहतात, ऐकतच नाहीत? ४ उपाय, टीव्ही बघणं होईल कमी..

मुलं खूपच टीव्ही पाहतात, ऐकतच नाहीत? ४ उपाय, टीव्ही बघणं होईल कमी..

How To Reduce TV Addiction in Child: लहान मुलांच्या सतत टीव्हीवर खिळलेल्या नजरा, हा अनेक पालकांसाठी आता डोकेदुखीचा विषय झाला आहे. त्यासाठी बघा यातलं काही करता आलं तर.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2022 04:50 PM2022-10-11T16:50:09+5:302022-10-11T16:50:47+5:30

How To Reduce TV Addiction in Child: लहान मुलांच्या सतत टीव्हीवर खिळलेल्या नजरा, हा अनेक पालकांसाठी आता डोकेदुखीचा विषय झाला आहे. त्यासाठी बघा यातलं काही करता आलं तर.

Parenting Tips: How to control child from watching TV? 4 Tips that helps to reduce TV addiction in child | मुलं खूपच टीव्ही पाहतात, ऐकतच नाहीत? ४ उपाय, टीव्ही बघणं होईल कमी..

मुलं खूपच टीव्ही पाहतात, ऐकतच नाहीत? ४ उपाय, टीव्ही बघणं होईल कमी..

Highlightsकाही नव्या गोष्टी, कला शिकवून मुलांचं मन त्यात रमवलं तरी त्यांच टीव्ही बघणं कमी होऊ शकतं.

३ वर्षांच्या आसपास मुल झालं की त्याला टीव्हीवरचे जवळपास सगळे कार्टून चॅनल, वेगवेगळ्या कार्टून्सची नावं, त्या कार्टून्सच्या वेळा असं सगळं माहिती झालेलं असतं. बेडवर किंवा सोफ्यावर आडवी झालेली मुलं, त्यांच्याच हातात टिव्हीचा रिमोट आणि टीव्हीवर खिळलेल्या त्यांच्या नजरा, हे चित्र आता ज्या घरांमध्ये लहान मुलं (TV Addiction in Children) आहेत, त्या जवळपास प्रत्येकच घरात दिसून येतं. जेवण पण टीव्हीसमोरच होतं. मुलांचा टीव्ही पाहणं कसं कमी करावं, हा अनेक पालकांपुढचा प्रश्न. म्हणूनच हे काही उपाय बघा. यामुळे कदाचित मुलांचं टीव्ही पाहणं कमी होऊ शकतं.

 

मुलांनी टीव्ही कमी बघावा यासाठी....
१. मुलांना वेळ द्या

मुलं टीव्हीच्या आहारी जातात, याचं सगळ्यात मोठं कारण हेच असतं की पालकांजवळ मुलांना द्यायला वेळ नसतो. त्यामुळे मुलांना कंटाळा येतो आणि मग मन रमविण्यासाठी ते टीव्ही बघतात.

 

 

आलिया भट- करिना कपूरची फिटनेस ट्रेनर अनुष्का परवानीचा खास सल्ला, ५ व्यायाम, योगा कधीही-कुठेही.. कारण

काही पालकांना वेळ असतो, पण तो मुलांसोबत कसा घालवायचा हे समजत नाही. पालकांनी मुलांसोबत योग्य वेळ घालविला तर तेवढ्या वेळेपुरते तरी मुलं टीव्हीपासून दूर जाऊ शकतात.

 

२. मित्र जोडण्यास मदत करा
हल्ली खेळायलाच कुणी नाही, हा अनेक मुलांसमोरचा प्रश्न असतो. पण काही मुलांच्या बाबतीत असंही होतं की आजूबाजूला मुलं तर खूप असतात, पण पालकांनाच आपलं मुल इतरांच्या घरी पाठवणं किंवा इतरांच्या मुलांना आपल्या मुलांसोबत घरी खेळायला बोलावणं आवडत नाही. पण मुलांना त्यांच्याच वयाची कंपनी द्या. ते बरोबर खेळण्यात वेळ घालवतील.

 

३. गोष्टी सांगा
मुलांची एकाग्रता वाढविण्यासाठी, त्यांना एका जागी बसण्याची सवय लावण्यासाठी गोष्टी खूप उपयुक्त ठरतात. त्यामुळे मुलांना आवर्जून गोष्टी सांगा. येत नसतील, तर पुस्तकातून वाचून दाखवा. मुलं मोठी असतील, तर त्यांना वाचनाची सवय लावा. 

हरबऱ्याच्या डाळीचं पारंपरिक धिरडं खाण्याचे ५ फायदे, खमंग धिरडं चवीलाही उत्तम आणि पोटभरीचं

४. नवं काही शिकवा  
काही नव्या गोष्टी, कला शिकवून मुलांचं मन त्यात रमवलं तरी त्यांच टीव्ही बघणं कमी होऊ शकतं. तुमच्या कामातही तुम्ही मुलांना सहभागी करून घेऊ शकता. स्वयंपाक घरातली किंवा इतर काही कामं मोठ्यांच्या बरोबरीने करायला, मुलांना बऱ्याचदा खूप आवडतं. 

 

Web Title: Parenting Tips: How to control child from watching TV? 4 Tips that helps to reduce TV addiction in child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.