Lokmat Sakhi >Parenting > मुलं खूप हट्ट करतात? मुलांना न ओरडता समजवण्याची सोपी ट्रिक-शांत, समजदार होतील मुलं

मुलं खूप हट्ट करतात? मुलांना न ओरडता समजवण्याची सोपी ट्रिक-शांत, समजदार होतील मुलं

Parenting Tips : ओरडणे किंवा मारणे हा त्यावरचा उपाय नाही. तुम्ही काही सोपे उपाय करूनही मुलांना शिस्त लावू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 08:52 PM2024-01-23T20:52:37+5:302024-01-23T21:03:38+5:30

Parenting Tips : ओरडणे किंवा मारणे हा त्यावरचा उपाय नाही. तुम्ही काही सोपे उपाय करूनही मुलांना शिस्त लावू शकता.

Parenting Tips : How To Control Stubborn And Angry Kids How to Deal With a Stubborn Child | मुलं खूप हट्ट करतात? मुलांना न ओरडता समजवण्याची सोपी ट्रिक-शांत, समजदार होतील मुलं

मुलं खूप हट्ट करतात? मुलांना न ओरडता समजवण्याची सोपी ट्रिक-शांत, समजदार होतील मुलं

मुलं हट्टी असतात, सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा हट्ट करत असतात. मुलांचा हट्ट पूर्ण केला नाही तर आई वडीलांना त्रास देतात, रडारड करतात. (Parenting Tips) या नकारात्मक गोष्टींचा परिणामांचा भविष्यावर होऊ शकतात. आई वडीलांनी मुलांना शिस्त लावण्यासाठी आधीपासूनच  प्रयत्न करायला हवेत. (How To Control Stubborn And Angry Kids) पण ओरडणे किंवा मारणे हा त्यावरचा उपाय नाही. तुम्ही काही सोपे उपाय करूनही मुलांना शिस्त लावू शकता. (Best Parenting Tips in Marathi) जेणेकरून मुलांना शिस्त लागेल आणि त्याचे मनही दुखावले जाणार नाही.

१) मुलांवर ओरडू नका

लहान मुलांनी मस्ती केली तर त्यांच्यावर ओरडू नका. त्यांना प्रेमाने समजवून सांगा. शांत राहण्यासाठी फोर्स करू नका. त्यांना चूक बरोबर यातील फरक समजावून सांगा.  त्यांचे म्हणणे ऐकून घ्या. 

२) भांडण करू नका

जर तुमची मुलं जास्त ह्ट्ट करत असतील तर त्यांच्याशी भांडू नका. त्यांना भांडण करण्याचा जास्त चान्स देऊ नका. जेव्हा तुम्ही मुलांना ओरडतात तेव्हा त्यांना तेव्हा ते जास्त भांडतात. मुलांचे म्हणणं ऐकून घ्या.  त्यांना त्याच्या आवडीच्या गोष्टी करण्याचे स्वातंत्र्य द्या पण त्याचे नियम ठरवून द्या. 

३) मुलांच्या मनातलं ओळखा

मुलांच्या मनात काय चालले आहे ते ओळखण्याचा प्रयत्न करा. मुलं आई वडिलांचे लक्ष स्वत:कडे वेधून घेण्याासाठी   रडतात तर कधी मोठ्या बोलतात.  अशावेळी आई वडीलांनी मुलांना पुरेपूर समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा. 

४) नियम बनवा

मुलांसाठी काही नियम बनवायला हवे. नियम तोडल्यानंतर मुलांना नुकसान होऊ शकते. मुलं जर नियम आणि  शिस्तीत असतील तर त्यांचा जिद्दीपणा काही प्रमाणात कमी होऊ शकतो.  या गोष्टीची काळजी घ्या. 

५) मुलांना बोलण्याचा चान्स द्या

मुलांवर आपलं म्हणणं थोपवू नका. त्यांनाही बोलण्याची संधी द्या. जर तुम्ही त्यांना बोलण्याचा चान्स दिला नाही तर ते ऐकण्याचा प्रयत्न करणार नाहीत. म्हणून आपल्या मनातल्या गोष्टी त्यांच्याशी शेअर करा. ज्यामुळे हेल्दी रिलेशन टिकून राहील.

Web Title: Parenting Tips : How To Control Stubborn And Angry Kids How to Deal With a Stubborn Child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.