Lokmat Sakhi >Parenting > मुलं हट्टी झाली-आईबाबांचं अजिबात ऐकत नाही? पाहा ‘हे’ सोपे उपाय, मुलांशी संवाद वाढेल

मुलं हट्टी झाली-आईबाबांचं अजिबात ऐकत नाही? पाहा ‘हे’ सोपे उपाय, मुलांशी संवाद वाढेल

Parenting Tips : वेळीच काही बेसिक पॅरेंटींग टिप्स लक्षात घेतल्या तर त्रास टाळता येऊ शकतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 03:19 PM2024-07-15T15:19:02+5:302024-07-15T17:37:07+5:30

Parenting Tips : वेळीच काही बेसिक पॅरेंटींग टिप्स लक्षात घेतल्या तर त्रास टाळता येऊ शकतो.

Parenting Tips : How To Handle Stubborn And Aggressive Child How To Handle Kids | मुलं हट्टी झाली-आईबाबांचं अजिबात ऐकत नाही? पाहा ‘हे’ सोपे उपाय, मुलांशी संवाद वाढेल

मुलं हट्टी झाली-आईबाबांचं अजिबात ऐकत नाही? पाहा ‘हे’ सोपे उपाय, मुलांशी संवाद वाढेल

५ वर्षांपासून ११ व्या  वर्षापर्यंत मुलं पालकांना खूप सतावतात. प्रत्येक आई-वडीलांना असं वाटतं की आपलं म्हणणं मुलांनी समजून घ्यायला हवं.  (Parenting Tips In Marathi) आपल्या आई वडीलांकडे मुलं हवं ते मिळवण्यासाठी हट्ट करतात  यासाठी सगळ्यात जास्त मोबाईल आणि टेक गॅजेट्स जबाबदार आहेत. अशावेळी मुलाना शिकवणं आणि समजावणं खूपच कठीण होतं. (How To Be A Good Parent)

वेळीच काही बेसिक पॅरेंटींग टिप्स लक्षात घेतल्या तर त्रास टाळता येऊ शकतो. जर तुमचं मुल जास्त हट्ट करत (Bad Habits) असेल तर त्याकडे जास्त लक्ष देऊ नका. अनेकदा मुलं फक्त अटेंशन मिळवण्यासाठी एखाद्या गोष्टीसाठी हट्ट करतात. जर वेळीच याकडे लक्ष दिले नाही तर ते हट्ट करणं सोडतील. (How To Handle Stubborn And Aggressive Child How To Handle Kids)

1) हट्टी मुलांना  चुकूनही एग्रेशन  दाखवू नका. ज्यामुळे गोष्ट आणखी बिघडू शकते. नेहमी आपल्या मुलांचे म्हणणं ऐकून घ्या आणि चांगल्या शब्दात उत्तर द्या. 

2) पालकांनी आपल्या मुलांशी कधीच जबरदस्तीने बोलू नये. तुम्ही मुलांवर जबरदस्ती केली तर तेसुद्धा हेच शिकतील. यापेक्षा मुलांना प्रेमाने समजावून सांगा.

3) हट्टी मुलांशी आदेश दिल्यासारखं कधीच नका. त्यांना समजदारीने कोणतीही गोष्टी समजावून सांगा. कोणताही चांगला पर्याय सजेस्ट करा. काही  दिवसांच मुलांची हट्ट करण्याची सवय निघून जाईल.

शाळेतून आल्यानंतर मुलांना ५ प्रश्न विचारा; मन लावून अभ्यास करतील-बोलतील मनातलं

4) इतरांसमोर कधीच मुलांची तक्रार करू नका. यामुळे त्यांच्या मनावर नकारात्मक परिणाम होतो. कमी वयात अस होणं त्यांच्या भविष्यावर परिणाम करू शकते.

5) जर तुम्ही आपल्या मुलांच्या भावनांचा आदर करणार नाही तर त्यांच्या मनावर याचा चुकीचा परिणाम होईल. कमी वयात त्यांच्या  मनावरही चुकीचा परिणाम होतो. म्हणूनच  इतरांसमोर मुलांशी प्रेमाने, आदरपूर्वक बोला.

व्हिटामीनचा सुपर डोस आहेत १० रुपयांच्या शेवग्यांच्या शेंगा; 'या' पद्धतीने खा-प्रोटीन-कॅल्शियमही मिळेल

६) मुलांची चूक झाल्यानंतर त्यांना पाढे म्हणण्याची, काहीवेळ एकटं  ठेवण्याची, स्वयंपाकघरातलं काम करण्याची शिक्षा द्या, जेणेकरून त्यांना कोणत्याही त्रास न देता चूक समजावून सांगता येईल.
 

Web Title: Parenting Tips : How To Handle Stubborn And Aggressive Child How To Handle Kids

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.