Join us

हुशार असूनही मुलं अभ्यासाचा कंटाळा करतात? आईबाबांनी करायला हव्या ४ गोष्टी, मुलांना अभ्यास आवडेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 16:53 IST

Parenting Tips : जर मुलांना कोणताही विषय समजण्यात त्रास होत असेल किंवा व्यवस्थित वाचण्याची, लिहिण्याची पद्धत माहिती नसेल तर त्यांचा इंटरेस्ट कमी होऊ शकतो.

मुलांचं अभ्यासात मन न लागण्याची अनेक कारणं असू शकतात जसं की गायडन्सची कमतरता. त्यांना मारून किंवा ओरडून समस्या सुटत नाही तर त्रास अजूनच वाढतो. म्हणून मुलांना अभ्यासापासून दूर ठेवण्याआधी  त्यांच्यासाठी तसं वातावरण तयार करायला हवं ज्यामुळे ते अभ्यास करण्यासाठी प्रेरित होतील आणि अभ्यास करायचा म्हणून करणार नाहीत तर अभ्यासाचा आनंदही घेतील. (How To Improve Children Interest In Studies)

मुलांना नावं ठेवणं

जर तुम्ही मुलांना वारंवार असं म्हणाल की मुलं अभ्यासात जराही चांगले नाही तर हे ऐकून मुलं अभ्यास करणार नाहीत आणि वाईट वाटून घेतील आणि चांगला अभ्यास करण्याचा प्रयत्नही करणार नाहीत. म्हणून मुलांसमोर काहीही नकारात्मक बोलणं टाळा.

ओझं आणि दबाव टाकणं

जर अभ्यास करण्यामुळे किंवा सतत चांगले ग्रेड्स आणण्यामुळे मुलांवर दबाव येत असेल तर मुलांचे मन अभ्यासातून दूर भटकू लागेल आणि ते अभ्यासात मागे पडतील आणि त्यांना अभ्यासाचं ओझं वाटू लागेल. म्हणून मुलांवर कधीच अभ्यासासाठी दबाव टाकू नका.

पोट सुटलंय, पण जिभेवर ताबाच नाही? ७ दिवसांचा सोपा डाएट प्लॅन; भराभर वजन कमी होईल

योग्य मार्गदर्शनाचा अभाव

जर मुलांना कोणताही विषय समजण्यात त्रास होत असेल किंवा मुलांना व्यवस्थित वाचण्याची, लिहिण्याची पद्धत माहिती नसेल तर त्यांचा इंटरेस्ट कमी होऊ शकतो. म्हणून मुलांचा अभ्यासाची योग्य पद्धत शिकवून शिक्षकांशी बोला.

डिस्ट्रॅक्शन

जर अभ्यास करताना मोबाईल, टिव्ही, व्हिडीओ गेम्स सुरू असेल आणि मुलांना त्या गोष्टींची सवय झाली तर मुलांचं लक्ष विचलित होऊ लागेल. म्हणून सुरूवातीपासून मुलांना मैदानी खेळ किंवा पुस्तकं वाचण्याची सवय लावा. मुलांना इतर कामांमध्ये व्यस्त ठेवून तुम्ही या सवयींपासून वाचवू शकता. 

टॅग्स :पालकत्वलहान मुलं