हल्ली बहुतांश पालकांची हीच तक्रार असते की मुलं काही केल्या ऐकतच नाहीत. मुलांनी कोणत्यातरी गोष्टीचा हट्ट धरलेला असतो आणि ती गोष्ट मिळेपर्यंत ते नुसता आकांडतांडव करतात. बरं अशावेळी मुलांना रागवून पण जमत नाही. कारण पालक त्यांच्यावर ओरडले की ते आणखी मोठा आवाज करून पालकांना उलट उत्तर देतात (What to do if kids are shouting or yelling at parents?). अशावेळी काय करावं ते समजत नाही. अशा आरडाओरडा करणाऱ्या मुलांना शांत करणं आणि त्यांना आपलं म्हणणं ऐकायला लावणं हा पालकांसमोरचा मोठा प्रश्न असतो (Parenting tips if kids are not listening). हे काम अगदी शांतपणे मुलांना न रागावता कसं करायचं ते आता आपण पाहूया... (What to do when your child answers back?)
याविषयीचा एक खूप छानसा व्हिडिओ momharshasays या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ अगदी छोटासा आहे. पण तरीही पालकांसाठी भरपूर उपयोगी ठरणारा आहे.
प्लास्टिकच्या खुर्च्या काळपट झाल्या- डाग पडले? करा २ सोपे उपाय- खुर्च्या होतील नव्यासारख्या चकाचक
या व्हिडिओमध्ये असं सांगितलं आहे की मुलं चिडल्यावर ते जेवढ्या जोरात आरडाओरडा करतील, तेवढ्याच शांतपणे त्यांना उत्तर द्या. मुलांचा आवाज कितीही वाढला तरी तुमचा आवाज वाढू देऊ नका आणि तुम्ही चिडला आहात, हे मुलांना आवाजातून जाणवू देऊ नका. तुमच्या आवाजातला हळूवारपणा आपोआप मुलांना शांत करेल. उपाय सोपा आहे त्यामुळे करून पाहायला हरकत नाही.
हे देखील तपासून पाहा...
बऱ्याचदा जी मुलं आरडाओरडा करतात, त्यांनी त्यांच्या घरात किंवा सभोवताली असं वातावरण पाहिलेलं असतं.
त्या मुलांचे पालक, आजी- आजोबा किंवा मग मोठी भावंडं, मित्र- मैत्रिणी अशा भाषेत त्यांच्याशी बोलत असतात. त्यामुळे मग मुलांवर परिणाम होतो आणि ते ही तसंच बोलतात. असं काही तुम्हाला आढळून आलं तर मुलांसमोर शक्यतो चिडू नका, एकमेकांशी ओरडून बोलू नका. त्यामुळेही मुलांच्या बोलण्यात फरक आढळून येईल.