Join us

आईबाबा सोशल मीडियावर- कुटुंबाचं मात्र होतय वाटोळं, नासतंय मुलांचं आयुष्य! ४ ट्रिक्स-पाहा काय करायचं..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2025 17:26 IST

Cyberbullying prevention for kids: Parenting tips to protect kids online: How to keep children safe from cyberbullying: Social media safety for children: Guide to preventing cyberbullying in children: How to protect kids on social media: Monitor kids’ social media activity: Educating children about cyberbullying: आपल्या मुलांनी देखील या विळख्यात अडकू नये असे वाटत असेल तर काय करायला हवे?

वाढत्या कामामुळे मुलांकडे पालकांना योग्य प्रकारे लक्ष देता येत नाही.(Cyberbullying prevention for kids) त्यामुळे बहुतेक वेळा मुले मोबाईल किंवा लॅपटॉपवर काहीबाही पाहात बसतात.(Parenting tips to protect kids online) इंटरनेटचे जग खूप मोठे असल्यामुळे त्यांना या सगळ्यात वेळ घालवण्यात अधिक रस असतो. (How to keep children safe from cyberbullying) सतत रिल्स, युट्यूब बघत ते आपला वेळ घालवतात. इतकेच नाही तर लहान मुले हातात मोबाईल असेल तरच ते जेवतात, त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. जेव्हा मुले सोशल मीडियाचा अधिक वापर करु लागतात तेव्हा ते सायबर गुन्ह्याच्या क्षेत्रात अडकण्याची शक्यता अधिक असते. (How to protect kids on social media) आपल्या मुलांनी देखील या विळख्यात अडकू नये असे वाटत असेल तर काय करायला हवे? कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या, जाणून घेऊया. 

गारेगार मस्त सोलकढीला गुलाबी रंग येण्यासाठी ३ टिप्स, 'अशी ' करा सोलकढी, उन्हाळ्यात घरबसल्या गोव्याचा आनंद

1. संवाद साधा

आपल्या मुलांना सोशल मीडिया आणि चुकीच्या गोष्टींपासून दूर ठेवायचे असेल तर त्यांच्याशी मोकळेपणाने संवाद साधा. त्यांच्याशी इंटरनेटच्या वापराबाबत बोला. त्यामागील धोके त्यांना समजावून सांगा. आपल्या मुलांना सायबर फसवणूकीबद्दल समज द्या. आपली वैयक्तिक माहिती सोशल मीडियावर शेअर केल्याने काय होऊ शकते याविषयी समजावून सांगा. 

2. पॅरेटिंग कंट्रोल

आपली मुले सोशल मीडियावर जास्त वेळ घालवत असतील तर आपण पॅरेटिंग कंट्रोलची मदत घेऊ शकता. सध्या सगळ्या सोशल मीडिया प्लाटफॉर्मवर हा पर्याय उपलब्ध आहे. यामध्ये स्क्रीन टाइमची मर्यादा सेट करता येते. तसेच मुलांना कोणत्याही गैर साईट्स पाहू नये यावरही निर्बंध लावता येतो. 

उपाशी पोटी प्या 'हे' खास ड्रिंक! महिनाभरात पोट-मांड्यांवरची चरबी होईल कमी, त्वचाही होईल सुंदर

3. पासवर्ड आणि ऑनलाइन अंकाऊट्स 

बरेचदा मुले विचार न करता ॲप्स किंवा वेबसाइट्सवर अकाउंट तयार करतात. अशावेळी त्यांना स्ट्राँग किंवा युनिक पासवर्ड कसा तयार करायचा हे सांगा. तसेच मुले कोणते ॲप्स वापरत आहेत त्यावर देखील लक्ष ठेवा. तसेच हा पासवर्ड तुमच्याशिवाय इतर कोणासोबतही शेअर करायला सांगू नका. मुले कोणत्या वेबसाइट्स पाहात आहेत आणि त्यावर ते काय अपलोड करत आहेत यावर लक्ष ठेवा. 

4. सायबर गुन्हा 

मुलांसोबत इंटरनेटवर काही चूक झाल्यास किंवा त्यांची फसवणूक झाल्यास तक्रार कुठे करायची हे सांगा. मुले सायबर गुन्हेगाराचे शिकार झाल्यास त्यांना भीती न बाळगता सायबर क्राइम हेल्पाइनवर संपर्क साधण्यास सांगा. तसेच आपण अधिकृत वेबसाइट्सला देखील तक्रार करु शकतो.  

 

 

टॅग्स :पालकत्व