Join us  

मुलांना गणित अजिबात आवडत नाही, कारण पालक करतात १ महत्त्वाची चूक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2024 12:03 PM

Why children's don't like math's mathematics as a subject parenting tips : अंकांची ओळख करुन देताना पालकांनी लक्षात घ्यायला हवी १ महत्त्वाची गोष्ट...

गणित हा शाळेच्या अभ्यासक्रमातील एक महत्त्वाचा विषय. वेळ समजणे, संख्या मोजणे, पैसे मोजणे अशा प्रत्येक कामासाठी आपल्याला कायम आकडे लागतात. त्यामुळेच मुलं अगदी बालवाडीत गेल्यापासून त्यांना १ ते १० या आकड्यांची ओळख करुन दिली जाते. हे आकडे मोजायला, लिहायला, ओळखायला त्यांना शिकवले जाते. १० आकड्यापर्यंत सगळे ठिक असते. पण खरी कसोटी असते ती त्याच्या पुढचे आकडे शिकवणे (Why children's don't like math's mathematics as a subject parenting tips ). 

(Image : Google)

त्यात काय १ ते १० शिकवले तसेच ११ च्या पुढचे आकडे शिकवायचे असे पालकांना वाटते. पण इथेच चूक होते आणि मग मुलांचा बेस कच्चा राहतो. प्रसिद्ध पॅरेंटींग कोच प्रिती वैष्णवी यांनी ही अतिशय लहान पण महत्त्वाची गोष्ट आपल्या इन्स्टाग्रामच्या पोस्टमधून पालकांच्या लक्षात आणून दिली असून ती मुलांचा अभ्यास घेताना पालकांसाठी खूप महत्त्वाची आहे.  

मग नेमके चुकते कुठे? 

११ हा आकडा शिकवताना आपण एक आणि एक ११, तसेच १ आणि २ म्हणजे १२ असे मुलांना सांगतो. पण तसे नसून दहा आणि १ म्हणजे ११, १० आणि २ म्हणजे १२ असं सांगायला हवं. कारण त्यावेळी हे शिकवायला सोप्पं वाटत असलं तरी मुलं मोठी होत जातात आणि त्यांना शाळेत बेरीज, वजाबाकी सुरू होते. मग शाळेत १ आणि १ म्हणजे २ असं शिकवतात. 

(Image : Google)

प्रिती वैष्णवी सांगतात...

इथंच मुलांच्या कन्फ्युजनला सुरुवात होते आणि मग मुलांना गणित हा विषय पहिल्यापासूनच आवडेनासा होतो. गणित किंवा आकडे शिकवण्याच्या एका बेसिक चुकीमुळे सुरुवातीपासूनच मुलांच्या मनात गणिताविषयी प्रश्न निर्माण होतात. म्हणूनच पालकांनी आकड्यांची ओळख करुन देताना योग्य ती काळजी घ्यायला हवी. जेणेकरुन भविष्यात मुलं गणित विषय आल्यावर नाक मुरडणार नाहीत किंवा गणिताच्या विषयाचा कंटाळा करणार नाहीत. 

टॅग्स :पालकत्वविद्यार्थीशाळा