Lokmat Sakhi >Parenting > आईबाबा तुम्ही मुलांचे पालक की मालक? मुलांचं भलं करण्याच्या नादात मुलं तुमच्यापासून तुटली तर..

आईबाबा तुम्ही मुलांचे पालक की मालक? मुलांचं भलं करण्याच्या नादात मुलं तुमच्यापासून तुटली तर..

Parenting Tips : मुलांवर निरातिशय प्रेम करणारे पालकही कधीकधी टोकाची भूमिका घेतात, मुलं मात्र त्यामुळे दुरावतात, नेमकं काय चुकतं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2023 09:48 AM2023-12-28T09:48:45+5:302023-12-28T09:50:02+5:30

Parenting Tips : मुलांवर निरातिशय प्रेम करणारे पालकही कधीकधी टोकाची भूमिका घेतात, मुलं मात्र त्यामुळे दुरावतात, नेमकं काय चुकतं?

Parenting Tips : Parents, are you the parent or owner of the children? If children break away from you in the name of doing good for children.. | आईबाबा तुम्ही मुलांचे पालक की मालक? मुलांचं भलं करण्याच्या नादात मुलं तुमच्यापासून तुटली तर..

आईबाबा तुम्ही मुलांचे पालक की मालक? मुलांचं भलं करण्याच्या नादात मुलं तुमच्यापासून तुटली तर..

आपण जन्माला घातलेली असल्याने मुलं आपल्या मालकीची आहेत, आणि त्यांनी आपलं सगळं ऐकलंच पाहिजे असं पालकांना वाटतं.आपण त्यांना जन्म दिला असला तरीही ते एक वेगळी आयडेंटीटी घेऊन या जगात आले आहेत. पालक म्हणून आपला मुलांवर मायेचा हक्क असला आणि मुलांचं सगळं चांगलंच व्हावं असं आपल्याला वाटत असलं तरी पालक म्हणून आपण कधी टोकाची भूमिका घेतो हे आईबाबांच्या लक्षात येत नाही. ते मुलांना मनाविरुद्ध गोष्टी करायला भाग पाडतात. आणि वाढत्या वयातली मुलं मग बंडखोर होत जातात (Parenting Tips).

आपण मुलांच्या भल्याचा विचार करुन काही गोष्टी त्यांना शिकवत असलो तरीही ते सांगण्याची, शिकवण्याची पद्धत ही मालकी हक्क असल्यासारखी होत नाही ना, मुलांचे स्वत्व त्यामध्ये जपले जाते ना याचा बारकाईने विचार व्हायला हवा. काहीवेळा महिला मुलांना आपलं हृदय किंवा आपला एखादा अवयव असल्याची उपमा अगदी सहज देऊन जातात. भावनिकदृष्ट्या असे म्हणणे योग्य असले तरी प्रत्यक्षात मुलं ही वेगळी आयडेंटीटी असतात हे लक्षात घ्यायला हवे. समुपदेशक प्रिती वैष्णवी मुलं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहेत आणि प्रेमाच्या नावाखाली त्यांच्यावर अधिकार गाजवणे योग्य नाही ही अतिशय महत्त्वाची गोष्ट त्या आपल्या लक्षात आणून देतात. पालक म्हणून त्याचा आपण गांभिर्याने विचार करायला हवा.

पालकत्त्वामध्ये अशाप्रकारच्या काही गोष्टी नक्की आड येतात आणि त्यामुळे मुलांचा योग्य पद्धतीने विकास होण्यात अडथळे निर्माण होतात हे पालकांनी वेळीच लक्षात घ्यायला हवे. मुलांच्या आजुबाजूला पोषक, प्रेमळ असे वातावरण निर्माण करणे ही पालक म्हणून आपली जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांचे आयुष्य नक्कीच आनंदी आणि सुकर होणार आहे हे लक्षात घ्यायला हवे. 


 

Web Title: Parenting Tips : Parents, are you the parent or owner of the children? If children break away from you in the name of doing good for children..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.