मुलांबाबत लोकांच्या मनात वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात. जेव्हा मुलं लहान असतात तेव्हा खूप गोष्टींची काळजी घ्यावी लागते. (Health Tips) सगळ्यात जास्त पालकांच्या मनात येणार प्रश्न म्हणजे मुलांना खाऊ घालण्याचं, शाळेत पाठवण्याचं योग्य वय कोणतं असतं. याबाबत मुलं खूपच कन्फ्यूज असतात. मुलांना प्ले ग्रुपमध्ये पाठवण्याचं योग्य वय कोणतं यासाठी काही गोष्टी फॉलो करायला हव्यात. (Parenting Tips Right Age To Send Your Child t0 Play School)
मुलांना प्ले ग्रुपमध्ये पाठवण्याचं योग्य वय कोणतं?
आपल्या मुलांनी कमी वयातच सर्व काही शिकावे या संभ्रमात लोक असतात. याच कारणामुळे मुलांना प्ले ग्रुपमध्ये पाठवलं जातं. असं करणं महागात सुद्धा पडू शकतं मुलांना योग्य वयातच प्ले स्कूलमध्ये टाकायला हवं. मुलं जोपर्यंत स्वत:हून बोलायला, चालायला शिकत नाही तोपर्यंत त्यांना प्ले ग्रुपमध्ये टाकू नये. मुलांना प्ले ग्रुपमध्ये अशावेळी पाठवायचं जेव्हा ते स्वत: चालायला लागतील किंवा बोलू लागतील. ५ वर्ष पूर्ण होण्याआधी तुम्ही मुलांना प्ले ग्रुपमध्ये पाठवू शकता. कारण ३ ते ४ वर्षांच्या वयात मुलं वेगाने काही गोष्टी शिकतात आणि तिसऱ्या चौथ्या वर्षी मुलं प्ले स्कूलमध्ये जाऊ शकतात.
प्ले स्कूलमध्ये मुलांना अशावेळी पाठवा जेव्हा मुलं कुटूंबासोबत किंवा मित्रमैत्रिणींसोबत बोलू-चालू लागतील. यामुळे त्यांना शाळेत इतर समस्या जाणवणार नाहीत. याशिवाय मुलांचा सामाजिक विकाससुद्धा होईल. याशिवाय मुलं एकमेकांशी चांगले वागतील. मुलांना प्ले स्कूलमध्ये पाठवण्याचे बरेच फायदे आहेत. ज्यात मुलांचा भावनात्मक आणि शारीरिक विकासही होतो. प्ले स्कूलमध्ये मुलांना खेळताना बऱ्याच गोष्टी शिकवल्या जातात. अशा स्थितीत मुलांचा शारीरिक, मानसिक विकास व्यवस्थित होतो. याव्यतिरिक्त योग्य वयात मुलांना प्ले स्कूलला पाठवल्यास त्यांच्या एक्टिव्हीजवर व्यवस्थित लक्ष ठेवता येते.
लांबचं दिसत नाही आणि चष्मा लावणं नको वाटतं? रोज खा ५ पदार्थ; नजर होईल तेज
प्ले ग्रुपला मुलांना पाठवण्याचे फायदे
प्ले स्कूलला पाठवल्याने मुलांची भाषा आणि शब्दांमध्ये सुधारणा होते याशिवाय मुलं घरी जितकं चागंल शिकतात त्यापेक्षा जास्त प्ले स्कूलमध्ये बोलायला आणि शब्द ओळखायला शिकतात. याव्यतिरिक्त इतर मुलांशी सामंजस्य आणि शेअरींगची सवय त्यांच्यात विकसित होते.
शिकण्याची क्षमता विकसित होते
लहान मुलांमध्ये शिकण्याची आणि समजून घेण्याची जिज्ञासू वाढते. कोणत्याही वस्तूला स्पर्श करणं, खेळण्याची इच्छा वाढते. मुलं प्ले स्कूलमध्ये वेगवेगळे खेळ आणि एक्टिव्हीज करतात. त्यामुळे त्यांच्यात शिकण्याची क्षमता वाढते. मुलं प्ले स्लूमध्ये वेगवेगळ्या एक्टिव्हीजमध्ये भाग घेतात. स्लाईड उतरणं चढणं, या सामान्य गोष्टी करण्याचा उत्साह येतो.