Lokmat Sakhi >Parenting > ४ गोष्टी सांगतात पालक म्हणून तुम्ही कुठं चुकता; तज्ज्ञ म्हणतात ही लक्षणे वेळीच ओळखा...

४ गोष्टी सांगतात पालक म्हणून तुम्ही कुठं चुकता; तज्ज्ञ म्हणतात ही लक्षणे वेळीच ओळखा...

Parenting Tips Signs of Emotionally Immature Parents : अशी कोणती लक्षणं आहेत, ज्यावेळी पालक म्हणून आपण अपरिपक्व आहोत हे लक्षात येते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2022 04:56 PM2022-08-02T16:56:42+5:302022-08-02T17:38:23+5:30

Parenting Tips Signs of Emotionally Immature Parents : अशी कोणती लक्षणं आहेत, ज्यावेळी पालक म्हणून आपण अपरिपक्व आहोत हे लक्षात येते.

Parenting Tips Signs of Emotionally Immature Parents : 4 Things That Tell You're Not A Mature Parent, According To Experts, Spot These Signs Early… | ४ गोष्टी सांगतात पालक म्हणून तुम्ही कुठं चुकता; तज्ज्ञ म्हणतात ही लक्षणे वेळीच ओळखा...

४ गोष्टी सांगतात पालक म्हणून तुम्ही कुठं चुकता; तज्ज्ञ म्हणतात ही लक्षणे वेळीच ओळखा...

Highlightsआपण आपल्या पालकांना बदलू शकत नाही, अशावेळी नको त्या ठिकाणी आपली एनर्जी खर्च करण्यापेक्षा आपण शक्य असेल तर स्वत:मध्ये बदल करावा.अनेकदा आपले पालक घडत असलेल्या सगळ्या परिस्थितीचा त्यांच्यावर काय, कसा परीणाम होत आहे हेच सांगत बसतात

पालकत्त्व ही आपल्याला वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. ही एक महत्त्वाची जबाबदारी असून ती जबाबदारी आपण वेळच्या वेळी योग्य पद्धतीने पार पाडणे आवश्यक आहे. पालक झाल्यावर आपण मोठे असल्याने आपणच मुलांना सगळ्या गोष्टी शिकवत असतो असं नाही तर पालकत्त्वाच्या भूमिकेत आपणही नव्याने असंख्य गोष्टी शिकत असतो. मात्र प्रत्येक टप्प्यावर आपल्याला अतिशय सजग राहून मुलांची मानसिकता ओळखून त्यानुसार वागावे लागते. इतके दिवस लहान म्हणून वावरणारे आपण पालक झालो की अचानक मोठे होतो. स्वत:मध्ये हा बदल करणे तितके सोपे नसले तरी काही गोष्टींचे भान मात्र आपल्याला आई-वडील म्हणून यायलाच हवे (Parenting Tips). काही वेळा पालक म्हणून भूमिका निभावताना आपणही चुकतो, अडखळतो पण काही गोष्टींची माहिती घेत, कधी धडपडत आपण हे आव्हान पेलतो. आता अशी कोणती लक्षणं आहेत, ज्यावेळी पालक म्हणून आपण अपरिपक्व आहोत हे लक्षात येते (Signs of Emotionally Immature Parents). 

(Image : Google)
(Image : Google)

 
काहीवेळा आपण एखाद्या अवघड परिस्थितीतून जात असतो. या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी आपण आपल्या पालकांशी बोलतो. आपल्याला या परिस्थितीत काय वाटले, आपल्या भावना काय होत्या हे आपण पालकांशी मोकळेपणाने बोलतो. मात्र बरेचदा आपण सांगत असलेल्या गोष्टी समजून घेण्यात आणि त्यांना योग्य पद्धतीने हाताळण्यात आपले पालक पुरेसे पडत नाहीत. प्रसिद्ध सायकॉलॉजिस्ट निकोल ले पेरा यांनी हीच गोष्ट लक्षात घेऊन पालकांची भावनिक अपरिपक्वता याविषयी अनेक महत्त्वाचे मुद्दे आपल्या इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून मांडले. असे पालक आपल्याला मिळणे हे गिफ्ट मिळण्यासारखे आहे, कारण त्यामुळे तुमचे पालक काय आहेत हे समजणे सोपे होते आणि ते आपल्याशी कसे वागणार याचा आपल्याला अंदाज असतो. आता हे मुद्दे कोणते आणि आपणही आपल्या मुलांना वाढवताना काही गोष्टींमध्ये कमी पडतो का ते पाहूया...

१. आपण आपली एखादी अडचण घेऊन आपल्या पालकांकडे जातो तेव्हा ते काहीसे बचावात्मक भूमिकेत असतात. काही वेळा तर ते आपण सांगत असलेल्या गोष्टीवर चर्चा करण्यासच तयार नसतात. असे वागणे हे भावनिक इममॅच्युरीटी असल्याचे लक्षण आहे. 

२. काही वेळा आपले पालक भावनिकदृष्ट्या असुरक्षित वाटेल असे संभाषण करु शकत नाहीत. अशावेळी ते आपल्याला आहे त्या परिस्थितीत पुढे ढकलत राहतात. अशावेळी ते परिपक्व नाहीत हे आपण ओळखून घ्यायला हवे. 

(Image : Google)
(Image : Google)

३. आपण एखाद्या महत्त्वाच्या विषयावर पालकांशी चर्चा करत असू तेव्हा ते हा विषय बदलतात किंवा सोयीस्करपणे बाजूला टाकतात आणि संवादाचे सगळे सूर स्वत:कडे वळवून घेतात. घडत असलेल्या सगळ्या परिस्थितीचा त्यांच्यावर काय, कसा परीणाम होत आहे हेच सांगत बसल्याने आपला मूळ प्रश्न दूर राहतो आणि आपल्यााला त्यावरील उपाय मिळत नाही ते वेगळेच.

४. अपरिपक्व असलेल्या पालकांशी डील करण्यासाठी त्यांचा आहेत तसा स्वीकार करणे हा एकमेव मार्ग आहे. याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे, आपले पालक हे एक दोषपूर्ण व्यक्ती आहेत याचा एकदा स्वीकार केला की आपल्याला आपल्या मूळ मुद्द्यांकडे, अडचणींकडे लक्ष देता येते. निकोल म्हणतात, आपण आपल्या पालकांना बदलू शकत नाही, अशावेळी नको त्या ठिकाणी आपली एनर्जी खर्च करण्यापेक्षा आपण शक्य असेल तर स्वत:मध्ये बदल करावा. 

Web Title: Parenting Tips Signs of Emotionally Immature Parents : 4 Things That Tell You're Not A Mature Parent, According To Experts, Spot These Signs Early…

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.