Lokmat Sakhi >Parenting > थंडीमुळे मुलांना कॉन्स्टीपेशनचा त्रास होतोय? तज्ज्ञ सांगतात ६ उपाय, पोट होईल साफ

थंडीमुळे मुलांना कॉन्स्टीपेशनचा त्रास होतोय? तज्ज्ञ सांगतात ६ उपाय, पोट होईल साफ

Parenting Tips Solutions for Constipation Problem in Kids : आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. दिक्षा भावसार लहान मुलांच्या कॉन्स्टीपेशनच्या समस्येसाठी काही महत्त्वाच्या टिप्स सांगतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2022 11:49 AM2022-11-17T11:49:00+5:302022-11-17T11:51:27+5:30

Parenting Tips Solutions for Constipation Problem in Kids : आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. दिक्षा भावसार लहान मुलांच्या कॉन्स्टीपेशनच्या समस्येसाठी काही महत्त्वाच्या टिप्स सांगतात.

Parenting Tips Solutions for Constipation Problem in Kids : Children suffering from constipation due to cold? Experts say 6 remedies, the stomach will be clean | थंडीमुळे मुलांना कॉन्स्टीपेशनचा त्रास होतोय? तज्ज्ञ सांगतात ६ उपाय, पोट होईल साफ

थंडीमुळे मुलांना कॉन्स्टीपेशनचा त्रास होतोय? तज्ज्ञ सांगतात ६ उपाय, पोट होईल साफ

Highlightsथंडीच्या दिवसांत कॉन्स्टीपेशनचा त्रास होऊ नये म्हणून मुलांसाठी घरगुती उपाय..जीवनशैलीतील लहानमोठ्या गोष्टी आरोग्याच्या विविध तक्रारींसाठी कारणीभूत असतात.

थंडीच्या दिवसांत हवेत गारठा असल्याने पाणी कमी प्यायले जाते. त्यामुळे मोठ्यांना ज्याप्रमाणे कॉन्स्टीपेशनचा त्रास होतो त्याचप्रमाणे लहान मुलांनाही कॉन्स्टीपेशनचा त्रास होतो. हवेत असणारा कोरडेपणा आणि कमी पाण्यामुळे अन्न पचनाच्या क्रियेवर होणारा परिणाम यांमुळे पोट साफ होण्यास अडचणी येतात. यामुळे लहान मुलांमध्येही गॅसेस, बद्धकोष्ठता किंवा संडासला त्रास होणे या समस्या उद्भवतात. मोठ्या माणसांना आपल्याला काय होते हे कळते आणि सांगताही येते. पण लहान मुलांना अनेकदा काय होते ते सांगता येत नाही. अशावेळी पोट साफ न झाल्याने पोटदुखी, पोटात गुबारा धरल्यासारखे होणे, अस्वस्थ होणे अशा काही ना काही समस्या उद्भवतात (Parenting Tips Solutions for Constipation Problem in Kids). 

(Image : Google)
(Image : Google)

अशावेळी नेमके काय करावे हे आईला सुचत नाही. एकीकडे घरातली कामं, ऑफीसचे ताण आणि त्यात मुलांच्या आरोग्याच्या तक्रारी. अशावेळी आपल्याला काही सोपे घरगुती उपाय माहिती असल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो. घरी सहज करण्यासारखे असल्याने या उपायांनी समस्येपासून नक्कीच लवकर आराम मिळू शकतो. प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. दिक्षा भावसार लहान मुलांच्या कॉन्स्टीपेशनच्या समस्येसाठी काही महत्त्वाच्या टिप्स सांगतात. या टिप्स फॉलो केल्या तर डॉक्टरांकडे न जाताही ही समस्या अगदी सहज दूर होऊ शकते. डॉ. दिक्षा यांनी इन्स्टाग्रामवर नुकतेच हे उपाय सांगितले असून ते कोणते आणि कसे करायचे याविषयी...

लहान मुलांमध्ये कॉन्स्टीपेशन होण्याची कारणे

१. पाणी कमी पिणे

२. जंक फूडचे सेवन 

३. रात्री उशीरा जेवणे 

४. रात्री उशीरा झोपणे

५. जेवणाच्या वेळा नियमित नसणे 

६. पोटाचे आरोग्य चांगले नसणे 

७. आहारात द्रव पदार्थांचा कमी वापर

उपाय  

१. मुलांना रोज सकाळी उठल्यावर अर्धा ग्लास कोमट पाणी द्या. 

२. मुलांना झोपेतून उठल्यावर सगळ्यात आधी रात्रभर पाण्यात भिजवलेले काळे मनुके खायला द्या. 

३. रात्री झोपताना गायीचे कोमट दूध अर्धा चमचा गायीचे तूप घालून द्यावे.

४. रात्री झोपताना पोटावर हिंग लावा, त्यामुळे गॅसेस पास होण्यास मदत होईल.

५. कच्चे सलाड किंवा कच्चे पदार्थ देण्यापेक्षआ शिजवलेले पदार्थ द्या, कच्चे पदार्थ पचण्यास जड असतात.

६. आहारात साखर, पॅकेट फूड, जंक फूडचा समावेश कमी करा. 

Web Title: Parenting Tips Solutions for Constipation Problem in Kids : Children suffering from constipation due to cold? Experts say 6 remedies, the stomach will be clean

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.