Join us  

मोठ्यांनी मुलांसमोर कधीच बोलू नयेत ५ गोष्टी; घरच्या भांडणामुळे मुलंही करतात मारामाऱ्या कारण....

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 2:50 PM

Parenting Tips : कुटूंबातील किंवा बाहेरील कोणत्याही सदस्याचे वागणे आवडत नसेल किंवा कोणाही बद्दल बोलायचे असेल तर ते मुलांसमोर बोलणं टाळा.

मुलं ज्या कुटूंबात वाढतात त्यांना जी सोबत संगत असते. त्यांच्या आयुष्यावर परिणाम होतो.  (Parenting  Tips) पण असे काही विषय आहेत जे लहान मुलांसमोर न बोल्लेलच बरेच. मुलांसाठी सुरक्षित वातावरण तयार करणं महत्वाचे आहे. कारण आई-वडीलांच्या लहानात लहान चुका मुलांच्या नुकसानास कारणीभूत ठरतात. मुलांना तुम्ही घडवाल तसेच ते वागतील, लहानपणापासून मुलं ज्या गोष्टी पाहतात त्यांचा मनावर परिणाम होतो. संपूर्ण आयुष्य कसे जाईल हे त्यावरच अवलंबून असते. (These 5 Family Issues That Should Not Be Discussed In Front Of Kids)

१) आर्थिक अडचणी

पैसा ही अशी गोष्ट आहे  ज्यामुळे ताण-तणाव येणं, कुटुंबात मतभेद होणं अशा गोष्टी होऊ शकतात.  लहान मुलांसमोर तुम्ही या गोष्टींवर बोललात तर त्यांना तुमचे प्रोब्लेम्स तर कळणार नाहीत पण उगाचच चिंता वाटेल आणि विचार करतील म्हणून मुलांसमोर पैश्यांच्या गोष्टी बोलू नका. त्यांना पैसा किती महत्त्वाचा आहे, सांभाळून वापरावेत याबद्दल शिकवा.

कॅन्सरचं कारण ठरतोय रोजच्या जेवणातील हा पांढरा पदार्थ; ICMR ने सांगितलं किती प्रमाणात खावं

२) वैवाहीक मतभेत

लग्नानंतर प्रत्येक नवरा बायकोमध्ये मदभेत होत राहतात. पार्टनर आणि तुमच्यात कोणतेही वाद झाले असतील तर ते आपसांत सोडवा.  मुलांसमोर याबाबत काहीही डिस्कस करू नका. तुमच्या मनात पार्टनरबद्दल कितीही राग असेल तरी मुलांना त्यांच्याबद्दल वाईट किंवा  चुकीच्या गोष्टी सांगू नका. अन्यथा मुलंही आपल्या पालकांचा मान-सन्मान न ठेवता बोलतील.

शिळं नको म्हणून उरलेली चपाती फेकता? शिळी चपाती खाण्याचे ५ फायदे; ताजं सोडून शिळं आधी खाल

३) आरोग्याच्या समस्या

तुम्हाला कोणताही मोठा किंवा साधारण आजार असेल तरी मुलांसमोर त्याबद्दल बोलू नका. कारण कुटुंबाचा एक भाग असल्यामुळे मुलांच्या मनावर याचा परिणाम होईल आणि ते या आजाराबाबत जास्त विचार करत बसतील.

४) मुलांसमोर गॉसिप करू नका

कुटूंबातील किंवा बाहेरील कोणत्याही सदस्याचे वागणे आवडत नसेल किंवा कोणाही बद्दल बोलायचे असेल तर ते मुलांसमोर बोलणं टाळा. कारण तुम्हाला गॉसिप करताना पाहिल्यानंतर मुलंसुद्धा इतरांबद्दल बोलू लागतील आणि त्यांना तीच सवय लागेल. कोणाबद्दलही मागे बोलण्याची सवय मुलांसाठी चुकीची ठरू शकते.  

५) कामाचा ताण

ऑफिसच्या आणि घरातल्या कामाचा ताण येत असेल तर तो मुलांशी डिस्कस करू नका. तुम्ही वर्क लोडबद्दल आपल्या पार्टनरशी मनमोकळेपणाने बोलू शकता. त्यातून मार्ग काढू शकता पण मुलांसमोर बोलू नका.  कारण लहान मुलांना तुमचा ताण फारसा कळणार नाही पण ते सतत याचाच विचार करतील.

टॅग्स :पालकत्व