Join us  

ट्यूशनला न जाता वर्गात पहिला येईल तुमचं मूल; ३ गोष्टी करा, रोज स्वत:हून अभ्यासाला बसतील मुलं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2024 9:06 PM

Tips To develop Child's Interest In Study : मुलांच्या अभ्यासाचे एक ठराविक टाईमटेबल असावं. मुलं जर ब्रेक न घेता सतत वाचत असतील तर याचा काहीही फायदा होणार नाही

मुलांकडून परिक्षेची तयारी करून घेणं कोणत्याही पालकासाठी आव्हानापेक्षा कमी नाही. आई वडील दोन्ही वर्किंग असल्यामुळे ही समस्या अधिकच वाढते.  अशा स्थितीत ट्यूशन (Tuition)क्लासेसची हेल्प घेण्याव्यतिरिक्त कोणताही मार्ग उरत नाही (Child's Interested In Studies). ट्यूशन क्लासेस फायदेशीर ठरतात पण काही मुलं अशी असतात जी कोणत्याही  कोचिंग क्लासेस किंवा घरगुती ट्यूशनची मदत न घेता उत्तम कामगिरी करतात. काही पेरेंटींग टिप्स तुमचं काम सोपं करतील (Parenting Tips). ज्याच्या मदतीनं मुलं ट्यूशनला न जाता चांगला अभ्यास करतील. (Parenting Tips To develop Child's Interest In Study)

टाईम टेबल तयार करा

मुलांच्या अभ्यासाचे एक ठराविक टाईमटेबल असावं. मुलं जर ब्रेक न घेता सतत वाचत असतील तर याचा काहीही फायदा होणार नाही. मुलांनी एक विशिष्ट टाईमटेबल बनवायला हवं. याशिवाय खेळांमध्ये सहभाग घ्यायला हवा. ज्यामुळे मुलं जास्त मन लावून अभ्यास करतील.

पोट सुटलं, मांड्या थुलथुलीत दिसतात? वापरा 5:2 चा वेट लॉस फॉर्म्यूला, वाढलेलं वजन चटकन उतरेल

मुलांना अभ्यास करायला आवडेल असं वातावरण

मुलांचे अभ्यासात मन लागण्यासाठी घरातलं वातावरण चांगलं असणं गरजेचं असतं. जर तुम्ही तुमच्या मुलाला अभ्यासाला बसवलं असेल तर त्यावेळी टिव्ही किंवा मोबाईल बघणं टाळा. त्यावेळी तुम्ही कोणतंही पुस्तक वाचत बसा. मुलांसमोर टिव्ही किंवा मोबाईल पाहिल्यानं त्याचं मन अभ्यासातून दूर जातं.

मुलांचे कौतुक करायला विसरू नका

मुलांचा अभ्यासातील रस वाढण्यासाठी त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करायला विसरू नका म्हणजे मुलांनी कोणतीही गोष्ट लक्षात ठेवल्यानंतर त्यांना अप्रिसिएट करा की त्यांनी आधीपेक्षा जास्त  चांगलं लक्षात ठेवलं आहे. मुलांचे कौतुक केले तर ते मोटिव्हेट होतात. याशिवाय मुलांसोबत काहीवेळ स्पेंड  करा त्यामुळे त्यांचे डाऊट्स क्लिअर होतील आणि क्लासला न जाता चांगले रिजल्ट्स समोर येतील.

दूध-दह्यापेक्षा जास्त कॅल्शियम देतात ७ पदार्थ; रोज खा-मिळेल भरपूर ताकद-कंबरदुखी टळेल

मुलांवर अभ्यासाचे प्रेशर देऊ नका

जर मुलांवर अभ्यासाचा जास्त ताण येत असेल तर तुम्ही त्यांना थोडावेळ मोकळा ठेवायला सांगा. कारण मुलांनी जर सतत अभ्यास केला तर त्यांना ताण येईल. खेळण्यासाठी, टिव्ही पाहण्यासाठी वेळ मोकळा ठेवा नेहमी नेहमी अभ्यासाबद्दल बोलणं टाळा. 

टॅग्स :पालकत्वलहान मुलं