लहान मुलं ही खूप कोमल मनाची असतात. (Parenting Hacks) तुम्ही त्यांना कोणत्याही गोष्टीसाठी जास्त ओरडलात तर त्यांच्या मनावर परिणाम होतो आणि तुम्हाला घाबरू लागतात याऊलट जर तुम्ही जर अजिबात ओरडलात नाही तर त्यांच्या मनात तुमच्याबद्दल धाकच नाही. एका स्पीच शोव्ह दरम्यान पालकत्वाबद्दल बोलताना विकास दिव्यकिर्ती यांनी सांगितले की आपल्या मुलांवर अन्कंडीशनल प्रेम करा. ( Parenting Tips Vikas Divyakirti Shared His View On How Mother Or Father Should Love Their Child) मुलांनी तुम्ही ठरवल्याप्रमाणे काम केलं तरच त्यांना तुमचं प्रेम मिळेल अन्यथा मिळणार नाही असं असू नये. (Parenting Tips In Marathi)
विकास सांगतात की मुलांसाठी आईचं प्रेम असं असायला हवं की काहीही झालं तरी आईनं मुलांसोबत राहायला हवं. एकीकडे अन्कंडीशनल तर दुसरीकडे कंडिशनल प्रेम करायला हवं आणि दुसऱ्या पालकांनी कंडीशनल प्रेम करायला हवं. काहीही झालं तरी आईनं सपोर्टमध्ये असायला हवं. विकास दिव्यकिर्ती काही इतर टिप्सही सांगितल्या आहेत.
जर आई खूप प्रेमळ असेल तर वडीलांनी थोडं स्ट्रिक्ट असायला हवं जेणेकरून मुलांना पुढे जाण्यासाठी मोटिव्हेशन मिळेल आणि मुलांसोबत आई-वडीलांच्या प्रेमाचे संतुलन बनलेले राहील. ज्यामुळे कुटुंबाला सपोर्ट आणि प्रोत्साहनही मिळते. विकास दिव्यकिर्ती यांनी या लेखात काही पॅरेंटीग टिप्स सांगितल्या आहेत.
प्रोटीन हवंय बदाम परवडत नाही? 'या' ५ डाळी खा, साइड इफेक्ट्सही होणार नाहीत
मुलं जेव्हाही चांगली वागतील तेव्हा त्यांना प्रोत्साहन द्या. त्यांना सकारात्मक गोष्टी शिकवा. भविष्यात त्यांना चांगलं वागण्यासाठी प्रेरणा मिळेल आणि त्याप्रमाणे चांगलं वागतील. मुलांना सुरक्षित वाटण्यासाठी बाऊंड्रीज असणं फार महत्वाचे आहे. मुलांनी सीमांचे उल्लंघन करू नये याबाबत सकारात्मक विचार करा.
कंबर-पोट सुटलंय, शरीर बेढब दिसतं; जीरं, ओवा अन् मेथीचा 3 इन १ फॉम्यूला; झरझर घटेल वजन
मुलांना त्यांची चूक झाल्यानंतर न ओरडल्याने किंवा जास्त लाड केल्याने मुलं बिघडतात. मुलं लहान असतात तोपर्यंत ठीक आहे पण जेव्हा मुलं मोठी होतात तेव्हा त्यांच्या वागण्यावरून आईवडीलांना बोललं जातं. वेळीच त्यांना मुलं ती चूक पुन्हा करत नाहीत. मुलांशी मोकळेपणाने बोला. त्यांचं म्हणणं लक्षपूर्वक ऐका. जेणेकरून त्यांच्यातील आत्मविश्वास वाढेल आणि इतर कार्यांमध्ये मुलं सहभागी होतील. मुलांना जबाबदारीची भावना शिकवून सक्षम राहायला सांगा.