पालकांची आपल्या मुलांच्या अभ्यासावर खास लक्ष द्यायला हवे (Parenting Tips). जर त्यांनी मुलांच्या वागण्यावर फोकस केला नाही तर मुलं बिघडू शकतात. मुलं शाळेत कसा अभ्यास करतात, त्यांची वागणूक कशी आहे. हे पालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तसंच नवीन उपक्रमांबद्दल माहिती देण्यासाठी पालकसभा घेतल्या जातात. (Parenting Tips What Questions You Should Ask In PTM)
पालकसभेला गांभीर्यानं घेत प्रत्येक पालकानं शाळेत उपस्थित राहायला हवं. जेणेकरून पालकांना मुलांचा अभ्यास आणि खोडकरपणा या दोन्हींबद्दल व्यवस्थित कळेल. अनेकदा पालक शिक्षक जे सांगतात ते ऐकून निघून जातात पण पालकांनी मुलांबाबत काही प्रश्न शिक्षकांना विचारायला हवेत.
पालकांनी पालक सभेत शिक्षकांना कोणते प्रश्न विचारावेत?
१) मुलं शाळेत कोणत्याही उपक्रमात सक्रिय सहभाग घेतो का, वर्गात शिकवण्याकडे लक्ष असते का?
२) मुलं कोणत्या विषयात स्ट्राँग आहेत आणि कोणत्या विषयावर जास्त मेहनत करावी लागते?
३) मुलाचे शाळेतील वागणे-बोलणे कसे आहे, इतर मुलांमध्ये मिसळतो का?
४) मुलांना एक्स्ट्रा करिक्युलर एक्टिव्हीजमध्ये इंटरेस्ट असतो का?
५) शाळेत तो आपल्या वस्तूंची काळजी घेतो की कुठेही पडलेल्या असतात?
६) मूल अभ्यासात वीक असतील तर क्लासेस लावण्याची गरज आहे का?
७) मुलं क्लासमध्ये असं काही करत असतील ज्याची आपल्याला माहिती नसेल तर ते समजून घेण्याचा प्रयत्न करा?
८) मुलांच्या चांगल्या वाढीसाठी तुम्ही नेहमी शिक्षकांची मदत घेऊ शकता?