Lokmat Sakhi >Parenting > मुलांना चांगल्या सवयी लावण्याच्या ४ सोप्या टिप्स; उलट बोलू नये, चारचौघात शहाण्यासारखं वागावं तर...

मुलांना चांगल्या सवयी लावण्याच्या ४ सोप्या टिप्स; उलट बोलू नये, चारचौघात शहाण्यासारखं वागावं तर...

Parenting Tips What to do if we want our child with good habits : मुलांना चांगल्या सवयी लावण्यासाठी पालक म्हणून आपण नेमकं काय करायला हवं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2023 02:32 PM2023-06-20T14:32:01+5:302023-06-20T14:36:12+5:30

Parenting Tips What to do if we want our child with good habits : मुलांना चांगल्या सवयी लावण्यासाठी पालक म्हणून आपण नेमकं काय करायला हवं...

Parenting Tips What to do if we want our child with good habits : 4 easy tips to get kids into good habits; Don't say the opposite, if you act like a wise man... | मुलांना चांगल्या सवयी लावण्याच्या ४ सोप्या टिप्स; उलट बोलू नये, चारचौघात शहाण्यासारखं वागावं तर...

मुलांना चांगल्या सवयी लावण्याच्या ४ सोप्या टिप्स; उलट बोलू नये, चारचौघात शहाण्यासारखं वागावं तर...

मुलांनी कायम चांगलं वागावं अशी पालक म्हणून आपली इच्छा असते. सगळ्यांशी नीट बोलावं, सोबतच्या मुलांशी शहाण्यासारखं वागावं, बाहेर गेलो की हट्टीपणा करु नये असं आपल्याला वाटत असतं. पण मुलं नेमकं याच्या उलट करतात आणि मग आपण एकतर त्यांच्यावर ओरडत राहतो किंवा चारचौघात त्यांना अपमान वाटेल असं बोलतो, प्रसंगी हातही उचलतो. यामुळे मुलं दुखावली जातात, चिडता. त्यामुळे ते शहाण्यासारखं वागायचं सोडून जास्त हट्टीपणा करतात आणि त्रास देतात (Parenting Tips What to do if we want our child with good habits). 

मुलांनी हळू आवाजात, चांगल्या भाषेत आदराने बोलावे, पसारा न करता नीट खेळावे, इतरांशी चांगले वागावे, आपले आपण हाताने खावे, खेळणी उचलून ठेवावीत अशा आपल्या किमान अपेक्षा असतात. अनेकदा मुलं हे सगळं करतातही, पण काहीवेळा त्यांचं बिनसलं की मग ते कोणाचंच ऐकत नाहीत. हे सगळे चक्र कायम असेच सुरू राहते. त्यामुळे आपली होणारी चिडचिड, त्यांच्यावर आणि घरातल्या इतर व्यक्तींवर निघणारा राग हे सगळे अनेक घरांत पाहायला मिळते. मात्र असे होऊ नये यासाठी नेमकं काय करायचं ते आपल्याला माहित नसतं. प्रसिद्ध समुपदेशक प्रिती याविषयी काही महत्त्वाच्या टिप्स देतात.

१. मूल जन्माला येते तेव्हा ते कोरी पाटी असते. त्यामुळे त्यांना कोणतीही सवय लावायची असेल तर त्यांना त्याचे योग्य पद्धतीने ट्रेनिंग देणे गरजेचे असते.  

२. कोणत्याही सवयी लावण्यासाठी आपण जितका उशीर करतो तितकं एखादी गोष्ट शिकवणं अवघड होऊन बसतं. त्यामुळे शक्य तितक्या लहान वयात मुलांना चांगल्या सवयी लावणं केव्हाही जास्त चांगलं. त्यामुळे या सवयी त्यांच्यात चांगल्या पद्धतीने मुरतात. 

३. लहान आहे त्यामुळे नंतर करु, नंतर शिकेल, थोडा वेळ जाऊदे असं आपण लहान मुलांच्या बाबतीत म्हणत राहतो. असं केलं तर चांगल्या सवयी लावायचं राहून जातं आणि मुलं मोठी होत जातात. मोठं झाल्यावर मुलांना कोणतीही सवय लावणं अवघड होऊन जातं. 

४. मुलांनी कोणतीही गोष्ट शिकावी, त्यांना चांगली सवय लागावी यासाठी रागवून, ओरडून उपयोग नाही तर मजा, मस्ती करत एखादी गोष्ट मुलांनी शिकवायला हवी. त्यामुळे नकळत ते जे हवं ते शिकतात आणि त्यांचं बालपणही अतिशय आनंददायी होते. त्यामुळे समजा मुलांना तुम्ही वाचनाची सवय लावत असाल तर ते आनंदानी कसं होईल हे पाहायला हवं. 

 

Web Title: Parenting Tips What to do if we want our child with good habits : 4 easy tips to get kids into good habits; Don't say the opposite, if you act like a wise man...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.