Lokmat Sakhi >Parenting > लेक १२ वर्षांची होताच प्रत्येक आईबाबांनी शिकवायला हव्यात ५ गोष्टी; मुलगी होईल यशस्वी-खंबीर

लेक १२ वर्षांची होताच प्रत्येक आईबाबांनी शिकवायला हव्यात ५ गोष्टी; मुलगी होईल यशस्वी-खंबीर

Parenting Tips : तुमची मुलगी १२ वर्षांची झाल्यानंतर तिला ५ गोष्टी नक्की शिकवा जेणेकरून भविष्यात ती चांगली प्रगती करेल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 03:52 PM2024-09-17T15:52:45+5:302024-09-17T15:55:57+5:30

Parenting Tips : तुमची मुलगी १२ वर्षांची झाल्यानंतर तिला ५ गोष्टी नक्की शिकवा जेणेकरून भविष्यात ती चांगली प्रगती करेल

Parenting Tips What To Teach Your 12 Years Old Daughter Things Should Tell 12 Years Old Daughter | लेक १२ वर्षांची होताच प्रत्येक आईबाबांनी शिकवायला हव्यात ५ गोष्टी; मुलगी होईल यशस्वी-खंबीर

लेक १२ वर्षांची होताच प्रत्येक आईबाबांनी शिकवायला हव्यात ५ गोष्टी; मुलगी होईल यशस्वी-खंबीर

पालक होणं (Parents) ही एक मोठी जबाबदारी असते आई वडिलांनी मुलांना काही सांगताना किंवा शिकवताना सावध राहायला हवं. कारण मुलांच्या पालनपोषणात थोडाजरी निष्काळजीपणा झाला तर भविष्यावर याचा चुकीचा परिणाम होऊ शकतो. खासकरून मुलीच्या आई वडिलांनी सर्तकता ठेवणं गरजेचं आहे.  तुमची मुलगी १२ वर्षांची झाल्यानंतर तिला ५ गोष्टी नक्की शिकवा जेणेकरून भविष्यात ती चांगली प्रगती करेल आणि तिला व्यवहार ज्ञानही अवगत होईल. (Parenting Tips What To Teach Your 12 Years Old Daughter Things Should Tell 12 Years Old Daughter)

भाव-भावनांबद्दल सांगा

जर तुमची लेक १२ वर्षांची झाली असेल तर तिला तिच्याशी भावभावनांबद्दल मोकळेपणानं बोला. यामुळे लेक तुमच्याशी सगळ्या गोष्टी शेअर करेल. काही पालक असे करत नाहीत ज्यामुळे पुढे जाऊन संवाद कमी होतो. आणि मुली आपल्या भावभावना दाबून ठेवणं सुरू करतात. ज्यामुळे त्यांच्या  मानसिक आरोग्यावर चुकीचा परिणाम होतो. 

दातांवर चिकट-पिवळा थर आला? रोज हे १ पान चावून खा; मोत्यासारखे चमकतील दात-दुर्गंधही येणार नाही

विश्वास ठेवण्याची कला

आपल्या मोठ्या होत असलेल्या लेकीला कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर नाही ते समजावून सांगा.  ज्यामुळे ती चुकीच्या  संगतीत अडकणार नाही. मुलींना नेहमी चांगले मित्र कोण ते कसे ओळखायचे ते समजवा.  

सहानुभूती

 इतरांना मदत करत,  लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांचा आदर करणं,  सुखदु:खात मित्रमैत्रिणींची साथ देणं किती महत्वाचे ते शिकवा. ज्यामुळे ती उत्तम व्यक्ती बनेल.

वडीलांबरोबर संध्याकाळीच जेवून घेते लेक वामिका; अनुष्का शर्मानं सांगितल्या खास पेरेंटींग टिप्स

खरं समजून घेणं गरजेचं

 याव्यतिरिक्त खरं जाणून घेणंही तितकंच मह्त्वाचे आहे की नेहमीच सत्याची साथ द्यायला हवी. जर तुमची मुलगी मोठी होत असेल तर तिला चूक बरोबर यातील फरक समजून घेता यायला हवा.

वेळेचे महत्व

 वेळ हा सर्वांसाठीच महत्वाचा असतो. जे लोक वेळेला महत्व देतात ते सफलतेची शिडी चढतात. ही गोष्टी तुमच्या १२ वर्षांच्या मुलीला नक्की शिकवा. टाईम मॅनेजमेंट करता  यायला हवी. तर मुलीचे भविष्य उत्तम घडू शकेल.

Web Title: Parenting Tips What To Teach Your 12 Years Old Daughter Things Should Tell 12 Years Old Daughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.