लहान मुलांना चांगलं वळणं लावणं काही सोपं काम नाही. कारण प्रत्येकवेळी प्रेमानं सांगून किंवा मार-झोड करूनच मुलाना समजतं असं नाही. त्यांच्या कलानं घेऊन वेगवेगळ्या उदाहरणातून त्यांना गोष्टी समजावाव्या लागतात. काही पालकांना मुलांना मारण्याची फार भीती वाटते कारण मारण्या किंवा ओरड्याचा चुकीचा अर्थ घेऊन मुलं नको ती कृत्य करतात. अशा अनेक घटना आजूबाजूला तुम्ही पाहिल्या असतील.
एकेकाळी प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी तनुजा आपल्या मुलीच्या जडण घडणीत बरीच कडक शिस्त दाखवताना पाहायला मिळाली. काजोलनं स्वतः याबाबत खुलासा करत सांगितले की, चूक झाल्यानंतर तिची आई तिला भांडी तर बॅडमिंटन रॅकेट फेकून मारायची. लहान मुलांना मारलं नाही तर मुलं बिघडतात असं तनुजा यांचं मत होतं.
काजोलनं एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, ''माझ्यावर माझ्या घरच्यांनी प्रेम केले पण या प्रेमामुळे मला बिघडू दिले नाही. माझी आई खूप कडक शिस्तीची होती. कधी बॅडमिंटन रॅकेट तर कधी भांड्यांनी मला मारायची. अनेकदा तिनं रागाच्या भरात माझ्यावर वस्तू उचलून फेकल्या होत्या.''
काजोल म्हणाली की, ''माझ्या १३ व्या वाढदिवसाला आईनं सांगितलं होतं की ती कधीच हात उचलणार नाही. पण गरज वाटली तर ती असं करू शकते. त्या दिवसापासून मी माझ्या जबाबदाऱ्या समजू लागले.'' त्याचवेळी काजोल आई- वडीलांच्या वेगळं होण्यावरही बोलली. त्यांनी काजोलला सांगितले की, ती लवकर मोठी झाली असती तर आम्ही खूप आधीच वेगळे झालो असतो.
काजलच्या म्हणण्यानुसार ते दोघं खूप वेगळे होते. ती कोणा एकाची बाजू घेऊ शकत नव्हती. दोघांनी मिळून कठोर निर्णय घेतला. तिच्या आईला शिस्तीनं जगण आवडायचं. याऊलट तिच्या वडीलांनी कधीही आईच्या निर्णयांवर आक्षेप घेतला नाही. आई नेहमी तिच्या सोबत राहायची आणि तिला म्हणायची की, ''आई जे सांगते ते तुमच्यासाठी चांगलं ठरतं तू तेच करायला हवं.''
काजोलनं आपल्या बोर्डिंग शाळेतील आठवणींनाही यावेळी उजाळा दिला. काजोलनं सांगितले की, ''मी जेव्हा बोर्डिंग स्कूलमध्ये गेले नव्हते तेव्हा तिथं जावसं खूप वाटायचं आणि जेव्हा प्रत्यक्षात बोर्डिंगमध्ये गेले तेव्हा घरची आठवण खूप यायला लागली. एकदा बोर्डिंगमधून पळून जाण्याचा प्रयत्नही मी केला होता. पण मला बस स्वर पकडलं आणि पुन्हा बोर्डिंग शाळेत आणलं.'' अलिकडेच काजोल त्रिभंगामध्ये दिसून आली. नेटफ्लिक्सवरील या फिल्मचे बरेच कौतुक केलं जात आहे.