Join us  

जे करु नका असं आईबाबा सांगतात तेच नेमकं मुलं करतात, असं का होतं? वाचा तज्ज्ञ काय सांगतात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2024 3:27 PM

Parenting Tips: मुलांना ज्या गोष्टी करण्यापासून आपण थांबवतो, नेमक्या त्याच गोष्टी मुलं करत असतात. बहुसंख्य पालकांना हा अनुभव येतोच, कारण...(Why kids do exactly opposite of what we say?)

ठळक मुद्देतुमच्याही मुलांच्या बाबतीत हाच अनुभव येत असेल तर याबाबत पॅरेण्टिंग एक्सपर्ट काय सांगत आहेत ते एकदा वाचा...

लहान मुलांना वाढवणं, त्यांना सांभाळणं, नवनविन गोष्टी शिकवणं हे खरंच खूप अवघड काम आहे. हल्ली तर मुलं एवढी स्मार्ट आहेत की पालकांना त्यांना खूपच कौशल्याने सांभाळावं लागतं. कधी प्रेमाने तर कधी जरा दरडावूनच बोलावं लागतं. मुलांना वाढविताना येणारे अनुभव थोड्याफार फरकाने जवळपास सगळ्याच पालकांचे सारखेच आहेत. त्या काही अनुभवांपैकी एक अनुभव म्हणजे मुलांना आपण एखादी गाेष्ट करण्यापासून रोखलं तर मुलं हटकून तीच गोष्ट करतात (why kids do exactly opposite of what we say). अजिबात ऐकत नाहीत. तुमच्याही मुलांच्या बाबतीत हाच अनुभव येत असेल तर याबाबत पॅरेण्टिंग एक्सपर्ट काय सांगत आहेत ते एकदा वाचा...(how to stop kids from doing wrong things?)

 

मुलं तुमचं म्हणणं अजिबात ऐकत नाहीत?

मुलांना जी गोष्ट करण्यासाठी आपण मनाई करतो, तीच गोष्ट मुलं करत असतील तर अशावेळी पालकांनी नेमकं काय करावं, याविषयी खूप छान माहिती सांगणारा व्हिडिओ पॅरेण्टिंग कन्सल्टंटने vishruti_joyes_parenting या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.

ऐश्वर्या नारकरांनी दिवाळीसाठी सजवलं घर! बघा घरातल्या छोट्याशा कोपऱ्याला कसा दिला मस्त लूक...

यामध्ये त्या सांगतात की या परिस्थितीत ना मुलांची चूक आहे ना पालकांची. जर काही चुकत असेल तर ते पालकांनी वापरलेले शब्द. उदा. मुलं जर सोफ्यावर उड्या मारत असतील तर पालक त्यांना सोफ्यावर उड्या मारू नकाे, असं करू नको, अशा सूचना करतात. पण मुलांना तर उड्या मारायच्याच असतात आणि त्यांना त्यासाठी सोफ्याचा पर्यायच उत्तम वाटत असतो.

 

म्हणूनच अशावेळी पालकांनी मुलांना असं सुचवावं की सोफ्यावर उड्या मारू नको. यामुळे तुला लागू शकतं, सोफ्याचं नुकसान होऊ शकतं. पण जर तुला उड्या मारायच्याच असतील तर तु ट्रॅम्पोलिनवर जा.

उगाच नाही मोड आलेल्या मेथ्यांना सुपरफूड म्हणत, डॉक्टर म्हणतात कडवट लागलं तरी खा, कारण....

किंवा अन्य कोणती जागा त्यांना उड्या मारण्यासाठी सोयीची आहे, हे त्यांना दाखवा. जेणेकरून त्यांना दुसरा पर्याय मिळेल आणि ते कोणतीही तक्रार न करता तुमचं म्हणणं ऐकतील.. कधी तरी एकदा नकारात्मक सूचना देण्यापेक्षा त्यांना त्याच कृतीसाठी दुसरा एखादा पर्याय सुचवून पाहा. कदाचित ते खूप पटकन ऐकतील. तुम्हाला त्यांना रागविण्याची गरजही पडणार नाही. 

 

टॅग्स :पालकत्वलहान मुलं