Lokmat Sakhi >Parenting > Parenting Tips : 'मुलांभोवतीच फिरतं तुमचं जग, हे योग्य नव्हे, कारण..' सुधा मूर्तींचे पालकांसाठी ५ मोलाचे सल्ले....

Parenting Tips : 'मुलांभोवतीच फिरतं तुमचं जग, हे योग्य नव्हे, कारण..' सुधा मूर्तींचे पालकांसाठी ५ मोलाचे सल्ले....

Parenting Tips : मुलांसोबतचे आपले नाते अधिकाराचे नाही, तर मैत्रीचे आणि सोबतीचे हवे, प्रसिद्ध लेखिका तरुण पालकांना मार्गदर्शन करताना म्हणतात....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2022 04:52 PM2022-02-24T16:52:28+5:302022-02-24T17:53:07+5:30

Parenting Tips : मुलांसोबतचे आपले नाते अधिकाराचे नाही, तर मैत्रीचे आणि सोबतीचे हवे, प्रसिद्ध लेखिका तरुण पालकांना मार्गदर्शन करताना म्हणतात....

Parenting Tips: 'Your world revolves around children, this is not right, because ..' Sudha Murthy's 5 valuable tips for parents .... | Parenting Tips : 'मुलांभोवतीच फिरतं तुमचं जग, हे योग्य नव्हे, कारण..' सुधा मूर्तींचे पालकांसाठी ५ मोलाचे सल्ले....

Parenting Tips : 'मुलांभोवतीच फिरतं तुमचं जग, हे योग्य नव्हे, कारण..' सुधा मूर्तींचे पालकांसाठी ५ मोलाचे सल्ले....

Highlightsमुलांना वाढवताना आधुनिकता आणि पारंपरिकता यांचा मेळ साधता येणे ही अतिशय महत्त्वाची गोष्ट त्या नमूद करतात. मुलांवर लादू नका, तर त्यांना त्यांचे निर्णय, आवडी-निवडी याबाबत थोडे मोकळे सोडा.

इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्ष आणि ख्यातनाम लेखिका सुधा मूर्ती (Sudha Murthy) यांना तरुण आदर्श मानतात. त्यांचे फॅन फॉलोईंगही खूप मोठे आहे. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी या तत्वाने जगणाऱ्या सुधा मूर्ती तरुणांना कायम मार्गदर्शन करत असतात. कधी आपल्या भाषणातून तर कधी एखाद्या लेखाच्या माध्यमातून त्या तरुण पिढीशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात. तरुणांना विविध गोष्टींसाठी प्रेरणा देणाऱ्या सुधा मूर्ती पदाने किंवा वयाने मोठ्या असूनही तरुणांना त्या आपल्यातल्याच एक वाटतात. एखाद्या समस्येकडे बघण्याची दिशा त्यांच्या बोलण्यातून मिळत असल्याने त्यांचे म्हणणे तरुणांना अपील होते. नुकतीच त्यांनी पालकांना मुलांना वाढविताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी याबाबत काही टीप्स दिल्या. सुधा मूर्ती वयाने खूप मोठ्या असून त्यांची मुलेही आता बरीच मोठी आहेत. पण पालक म्हणून गाठीशी असलेला अनुभव आणि एकूणच पालकत्त्वाबद्दलचे त्यांचे असलेले म्हणणे तरुण पालकांना नक्कीच उपयुक्त ठरु शकते. मुलांना वाढवताना आधुनिकता आणि पारंपरिकता यांचा मेळ साधता येणे ही अतिशय महत्त्वाची गोष्ट त्या नमूद करतात. तर पालकत्त्वाची भूमिका निभावताना पालकांनी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी (Parenting Tips) , याबाबत सुधा मूर्ती काही मुद्दे आवर्जून सांगतात, ते खालीलप्रमाणे...    

(Image : Google)
(Image : Google)

१. मुलांना स्पेस द्या 

स्पेस ही सध्या प्रत्येकाच्याच आयुष्यातील एक महत्त्वाची गोष्ट झाली आहे. कोणत्याही नात्यात स्पेस असेल तर ते नाते अधिक चांगल्या रितीने फुलू शकते आणि बहरु शकते. त्याचप्रमाणे मुलं आणि पालक यांच्या नात्यातही स्पेस असायला हवी असं त्या आवर्जून नोंदवतात. दोन पिढ्यांचे विचार नक्कीच वेगवेगळे असतात. त्यामुळे दोघांच्या विचार आणि मतांमध्ये संघर्ष नसावा. आपले निर्णय किंवा म्हणणे मुलांवर लादू नका, तर त्यांना त्यांचे निर्णय, आवडी-निवडी याबाबत थोडे मोकळे सोडा. त्यातील फायदे-तोटे समजावून सांगणे पालक म्हणून नक्कीच आपले काम आहे, पण एखादी गोष्ट त्यांच्यावर लादणे चुकीचे आहे. 

२. निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य द्या

काही निर्णय मुलांचे मुलांना घेऊ देणे ही त्यांचा विकास होण्यासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट असते. पण ते लहान आहेत म्हणून आपण त्यांना निर्णय घेऊ द्यायला घाबरतो. मुलांना निर्णय घेऊ दिल्याने आणि त्या निर्णयाच्या परिणामांमुळे त्यांची विचारशक्ती वाढते आणि निर्णयक्षमता हळूहळू सुधारते. त्यांना निर्णय घेण्यात अडचण येत असेल तर अशावेळी तुम्ही त्यांना जरुर मार्गदर्शन करा. त्यांना विविध पर्याय द्या किंवा कोणत्या निर्णयात त्यांचा फायदा आहे तेही सांगा. पण त्यांच्याबाबतचे निर्णय आपण परस्पर घेऊन टाकल्यास त्यांचा विकास खुंटेल हे नक्की. 

३. मुलांसमोर उदाहरणे ठेवा

मुले निरीक्षणातून अनेक गोष्टी शिकत असतात. तेव्हा एखादी गोष्ट त्यांना कराच असे सांगून किंवा मागे लागून ती होत नाही. त्यासाठी आपल्यालाही त्यांच्यासमोर तसे वागावे लागते. उदाहरण समोर ठेवले तर मुलांना कोणतेही म्हणणे लवकर पटते. त्यामुळे अभ्यासाला मागे लागताना आधी तुम्ही हातात एखादे पुस्तक घ्या, तरच ते घेतील असे उदाहरणही सुधा मूर्ती देतात. 

(Image : Google)
(Image : Google)

४. साधं जगा

आपल्या जगण्यात साधेपणा असणं अतिशय महत्त्वाचं आहे हे सुधा मूर्ती स्वत:च्या उदाहरणातून सांगतात. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी याच्या त्या एक उत्तम उदाहरण आहेत. आपल्याकडे कितीही पैसा असला तरी आपली राहणी, घर, खाणे-पिणे हे कायम साधे असायला हवे असं त्यांचं म्हणणं असतं जे योग्यही आहे. त्यामुळे पालकांनो तुम्हीही साधे राहा आणि मुलांनाही तशाच सवयी लावा असे त्या आवर्जून सांगतात. 

५. मुलांना आयडीया शेअर करायला सांगा

मुलांची कल्पनाशक्ती डेव्हलप करायची असेल तर त्यांना त्यांच्या डोक्यात असलेल्या आयडीया शेअर करायला सांगा असे सुधा मूर्ती सांगतात. मुलांकडे अनेक भन्नाट आयडीया असतात हे सांगताना त्या आपल्या मुलांबाबतचे उदाहरणही देतात. त्यामुळे मुलांना आयडीया शेअर करायला सांगणे गरजेचे असल्याचे त्या म्हणतात. 

Web Title: Parenting Tips: 'Your world revolves around children, this is not right, because ..' Sudha Murthy's 5 valuable tips for parents ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.