Lokmat Sakhi >Parenting > पिझा-बर्गर-चमचमीतच हवं असा हट्ट मुलं करतात? ५ सवयी, मुलं आनंदाने खातील घरचे पदार्थ...

पिझा-बर्गर-चमचमीतच हवं असा हट्ट मुलं करतात? ५ सवयी, मुलं आनंदाने खातील घरचे पदार्थ...

5 Tips To Avoid Kids From Unhealthy Junk Food : मुलांना हेल्दी फूड लावण्याची सवय कशी लावायची? पाहा ५ गोष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2023 08:52 PM2023-07-31T20:52:53+5:302023-07-31T21:06:45+5:30

5 Tips To Avoid Kids From Unhealthy Junk Food : मुलांना हेल्दी फूड लावण्याची सवय कशी लावायची? पाहा ५ गोष्ट

Parents, 5 fool-proof ways to make your kids stay away from junk food. | पिझा-बर्गर-चमचमीतच हवं असा हट्ट मुलं करतात? ५ सवयी, मुलं आनंदाने खातील घरचे पदार्थ...

पिझा-बर्गर-चमचमीतच हवं असा हट्ट मुलं करतात? ५ सवयी, मुलं आनंदाने खातील घरचे पदार्थ...

पिझ्झा - बर्गर, सँडविच, कोल्ड्रिंक्स यांसारखे जंक फूड म्हणजे लहान मुलांसाठी स्वर्गसुखचं म्हणावे लागेल. लहान मुलंच काय इथे मोठ्यांना सुद्धा जंक फूड खाण्याचा मोह आवरला जात नाही. जंक फूड चवीला भन्नाट व बजेट फ्रेंडली असतात. जंक फूडचे विविध पदार्थ रस्त्याच्या कडेला छोटे - छोटे ठेले लावून विकले जातात. मुलं जेव्हा घराबाहेर पडतात तेव्हा असे जंक फूड खाण्याचा हट्ट धरतात. एकदा का त्यांना अशा जंक फूडची चटक लागली की तो सोडवणे पालकांसाठी खूप मुश्किल काम होऊन जाते. 

प्रत्येक आई-वडिलांना असं वाटतं असतं की आपल्या मुलांना छान सकस आहार द्यावा जेणेकरून त्यांची चांगली वाढ होईल पण ऐकतील तर ती मुलं थोडीच. मुलं सहसा त्यांना जे आवडतं, मनाला जे रुचत तेच खातात. जर का मुलांना एकदा जंक फूडची सवय लागली तर ते घरातील पौष्टिक खाण्याकडे दुर्लक्ष करु लागतात. अशी सवय त्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. अशा स्थितीत मुलांच्या शरीरात पौष्टिकतेची कमतरता निर्माण होऊ शकते. बहुतेक सगळ्याच मुलांना जंक फूड खायला आवडते. मुलांना घरातील पौष्टिक व रुचकर अन्न नकोसे वाटते. अशा परिस्थितीत पालकांनी त्यांच्यासमोर कितीहीवेळा पौष्टिक पदार्थ खाण्याचे महत्व समजावून सांगितले तरीही त्यांच्या हट्टापुढे पालकांचे काहीच चालत नाही. मुलांची जंक फूडची ही सवय सोडायची असेल तर, काही टिप्स फॉलो करून पाहा. या ट्रिकमुळे मुलांची ही सवय नक्कीच सुटेल(Parents, 5 fool-proof ways to make your kids stay away from junk food).

मुलांची जंक फूड खाण्याची सवय मोडण्यासाठी नेमके काय करावे ? 

१. मुलांची आवडती डिश तयार करा :- मुलांची जंक फूड खाण्याची सवय मोडायची असेल तर, आपल्याला त्यांच्या आवडीचे पदार्थ करावे लागतील. हो, आपल्या पाल्यांना काय आवडतं, काय नाही. हे जाणून घेऊन ते पदार्थ करणे आवश्यक आहे. रोज - रोज तेच पदार्थ खाऊन मुलांसह घरातील इतर सदस्यांना देखील कंटाळा येतोच. म्हणून ते बाहेरचं जंक फूड खाण्यास प्राधान्य देतात. आपण देखील घरी बर्गर, पिझ्झा या पदार्थात भाज्या व पौष्टीक पदार्थांचा वापर करून करू शकता. जे मुलं आवडीने खातील.

"आई, मला काहीतरी गोड खायला दे !" असा धोशा मुलं सतत तुमच्यामागे लावतात ? ५ सोप्या टिप्स...

२. पटकन सवयी बदलण्यास सुरुवात करा :- मुलांच्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये जितक्या लवकर बदल करायला सुरुवात कराल तितकाच फायदा होईल, नाहीतर काही काळानंतर मुलांना त्यांच्या सवयी बदलता येणार नाहीत. आपण मुलांच्या या वाईट सवयी बदलण्यासाठी जितका उशीर कराल तितक्याच त्यांच्या सवयी अधिक रुजू लागतील. अशा परिस्थितीत जेव्हा जेव्हा मुलांच्या आहारात बदल केला जातो तेव्हा त्यांना त्याचे फायदे समजावून सांगा आणि योग्य वेळी ते सुरू करा.

आई झाल्यावर करिअर संपते का? मग तुम्ही काय निवडाल? - समीरा रेड्डीचा सवाल...

 ३. मुलांसमोर डिश त्यांना आवडेल अशी सजवा :- मुलांना चवीपेक्षा प्रेझेंटेशन पाहून बाहेरच्या गोष्टी खायला आवडतात. त्यामुळे जेवणासाठी जे काही बनवता ते चांगले सजवून त्यांच्यासमोर मांडणे महत्त्वाचे आहे. यासाठी लहान मुलांचे जेवणाचे ताट आकर्षक पदार्थांचा वापर करून सजवा. चपाती बनवताना साधी नसून, त्यात भाज्यांच्या रसांचा वापर करा. यामुळे, मुले हळूहळू रंगीबेरंगी गोष्टींकडे आकर्षित होऊ लागतील व हे नेहमीचेच पदार्थ चवीने खातील.

४. हेल्दी पदार्थ खायला शिकवा :- मुलांना जंक फूड खाण्याची सवय लागू नये म्हणून, मुलांच्या आहाराचा दिनक्रम निश्चित करा. त्यांना वेळोवेळी काहीतरी आरोग्यदायी खायला देत राहा. अशा प्रकारे त्यांचे पोट भरलेले राहील व भूक लागल्यावर ते जंक फूड खाण्याचा आग्रह धरणार नाहीत.

मला काही सिध्द करायचं नाही, नको कसलं प्रमाणपत्र! अनुष्का शर्माचा लेकीसाठी मोठा निर्णय...

५. मुलांचा आहार प्रथिनयुक्त असावा :- आपण मुलांना जे काही खाऊ घालत आहात, त्यात प्रथिनांचे प्रमाण पुरेसे असावे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. यामुळे मुलांना वारंवार भूक न लागता त्यांचे पोट कायमचे भरलेले राहते आणि ते अतिरिक्त जंकफूड खाण्यापासून वाचतात. एवढेच नाही तर त्यांची जंक फूड खाण्याची इच्छाही कमी होते. सकाळच्या नाश्त्यात दूध, तृणधान्ये, सोयाबीन यांसारख्या प्रथिनयुक्त गोष्टी मुलांना द्या.

Web Title: Parents, 5 fool-proof ways to make your kids stay away from junk food.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.