Lokmat Sakhi >Parenting > कधी लहान मुलांसारखी रडतात तर कधी म्हणतात आम्ही मोठे? वयात येणाऱ्या मुलांशी आईबाबांनी वागायचं कसं?

कधी लहान मुलांसारखी रडतात तर कधी म्हणतात आम्ही मोठे? वयात येणाऱ्या मुलांशी आईबाबांनी वागायचं कसं?

आम्ही काही लहान आहोत का? म्हणून मोठ्यांवर तडकणारी मुलं छोट्या छोट्या गोष्टींवर रुसतात, रडतात. फुरगटून बसतात. मुलांच्या या वागण्याचा आई बाबांनी काय अर्थ लावावा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2024 08:00 AM2024-05-17T08:00:00+5:302024-05-17T08:00:02+5:30

आम्ही काही लहान आहोत का? म्हणून मोठ्यांवर तडकणारी मुलं छोट्या छोट्या गोष्टींवर रुसतात, रडतात. फुरगटून बसतात. मुलांच्या या वागण्याचा आई बाबांनी काय अर्थ लावावा?

parents and kids relation, children shows tantrums, teen age, sense of being adult, what should parents do? | कधी लहान मुलांसारखी रडतात तर कधी म्हणतात आम्ही मोठे? वयात येणाऱ्या मुलांशी आईबाबांनी वागायचं कसं?

कधी लहान मुलांसारखी रडतात तर कधी म्हणतात आम्ही मोठे? वयात येणाऱ्या मुलांशी आईबाबांनी वागायचं कसं?

Highlightsमुलांना स्वत:वर नियंत्रण ठेवण्याचं कौशल्य शिकवण्यासाठी पालकांनी पुढाकार घ्यावा.

शर्विलचं वागणंच असं की त्यामुळे सुलभाला कायम वैतागायला होतं. १० वर्षांचा शर्विल कधी मोठ्यांसारखा वागतो तर कधी लहान मुलांसारखा. सुलभाने जर शर्विलला अभ्यासाची आठवण करुन दिली किंवा खेळायला चाललेल्या शर्विलला तिने कधी येणार? कुठे चालला? असे प्रश्न विचारले की 'आई तू मला असे प्रश्न का विचारते? मी लहान आहे का आता?' असं म्हणत त्याची चिडचिड होते. शर्विलचं असं बोलणं सुलभाला उध्दट वाटतं. तर अनेकदा थोडंसं जरी मनाप्रमाणे झालं नाही तर डोळ्यातून पाणी काढून रडणे, मित्रांसोबत खेळताना भांडणं, खेळणाऱ्या मुलांना त्रास देणं अशा गोष्टीही शर्विल करतो. 
एक गोष्ट या मुलाला कितीदा सांगावी"असा प्रश्न सुलभाला पडतो. कधी शर्विल एकदम मोठ्यांसारखा तर कधी अगदी लहान मुलांसारखा वागतो. हे असं का होतं? हेच सुलभाला कळत नाही. आणि आपण मोठे होत असूनही आपल्याला लहान मुलांप्रमाणे वागवलं जातं हे शर्विलला पटत नाही. तर अनेकदा आई आपल्याला समजूनच घेत नाही अशी शर्विलची तक्रार असते.

शर्विलच्या अशा वागण्यानं सुलभाचं वैतागणं, चिडणं स्वाभाविक आहे. पण हे फक्त शर्विलच्याच बाबतीत घडतं असं अजिबात नाही. अनेक मुलांच्या बाबतीत मोठ्यांना असं गोंधळवून टाकणारं वर्तन होतं. 'ना धड मोठे ना धड छोटे ' अशा अवस्थेतल्या अनेक मुलांची वागण्याची हीच पध्दत असते.

मुलं अशी का वागतात?

१. इतर मुलांच्या तुलनेत आपलं मूल फारच बालिश वागतं असं जर पालकांना वाटत असेल तर आधी इतर मुलांच्या वयाकडे बघावं . कधी कधी मुलं एकाच वर्गात शिकत असली, सोबत खेळत असली तरी एखाद्या मुलाचं वय सोबतच्या मुलांपेक्षा कमी असतं. त्यामुळे त्याचं वर्तन इतर मुलांच्या तुलनेत बालिश वाटणारच.
२. काही मुलं अतिक्रियाशील म्हणजे हायपर ॲक्टिव्ह असतात. अशा मुलांच्या वागण्यात कधी मोठं कधी लहान अशी अदलाबदल सारखी पाहायला मिळते.
३. काही मुलं सतत गोंधळलेली असतात. एखादं सोप्प काम दहा वेळा सूचना देवूनही करताना मात्र चुकतात. यामागे त्यांचं लक्ष नसणं, लक्ष केंद्रित न होणं हे कारण असतं.
४. मुलांना शिकताना काही अडचणी येत असतील तर त्याचा परिणाम त्यांच्या वागण्यावरही होतो. विशेषत: वाचणे, लिहिणे, गणितं सोडवणं यात त्यांना अडचणी जाणवत असतील तर त्याचा परिणाम त्यांच्या वागण्यावर होतो.
५. मूल घाबरट/ शामळू असेल तर वागताना ती गोंधळतात. त्यांचं असं वागणं मोठ्यांना बालिश वाटू शकतं.
६. काही मुलांना बोलताना अडचणी येतात. विशिष्ट शब्द बोलता येत नाही. त्यामुळे कमीपणा वाटतो आणि वागताना गोंधळ उडतो.
७. अनेकदा मुलं वेळेवर झोपत नाही. सातत्याने सहा तासांपेक्षाही मूल कमी झोपत असेल तर वागताना अशी मुली हट्टी, रडी, चिडकी वाटू शकतात.

आई बाबा काय करु शकतात?

१. पालकांनी आपल्या मुलांचं, त्यांच्या वागण्याचं निरिक्षण करावं. त्यांचे वागण्याचे पॅटर्न्स ओळखावेत. केव्हा मूल लहान मुलांसारखं वागतं, केव्हा त्यांना राग येतो, केव्हा ते चिडचिड करतात याकडे लक्ष द्यावं. आपली निरिक्षणं नोंदवावीत. आणि त्याबद्दल मुलांचे शिक्षक, इतर पालक, जाणकार व्यक्ती यांच्याशी बोलावं.
२. मुलांना स्वत:वर नियंत्रण ठेवण्याचं कौशल्य शिकवण्यासाठी पालकांनी पुढाकार घ्यावा.

कधी लहान तर कधी मोठे असं का? वाचा..
https://urjaa.online/how-could-parents-should-help-their-kids-who-behave-sometime-younger-and-sometime-elder/

Web Title: parents and kids relation, children shows tantrums, teen age, sense of being adult, what should parents do?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.