आजी- आजोबा, मोठी भावंड, शिक्षक, इतर नातेवाईक यांच्याकडे बघून मुलं हमखास काही गोष्टी शिकतातच. पण त्यांच्यावर सगळ्यात जास्त परिणाम होत असतो तो त्यांच्या पालकांचा. मुलं सर्वाधिक अनुकरण करतात त्यांच्या पालकांचंच (behaviour of parents in front of their kids) करत असतात. त्यांचं वागणं बघून मुलांच्या मनावर परिणाम होत जातो आणि त्यातूनच त्यांचं व्यक्तिमत्व घडत जातं. त्यामुळे मुलं जेव्हा समोर असतील, तेव्हा पालकांनी एकमेकांशी बोलताना किंवा वागताना काही गोष्टींचं भान ठेवलंच पाहिजे. या गोष्टी नेमक्या कोणत्या याची माहिती इन्स्टाग्रामच्या vaanyatyagi या पेजवर शेअर करण्यात आली आहे. (how should parents behave in front of their kids?)
मुलांसमोर वागताना पालकांनी या चुका मुळीच करू नयेत...
१. आज बहुतांश पालक मुलांच्या अतिमोबाईल बघण्याने वैतागले आहेत. पण कळत नकळत अनेक पालकही हेच करतात. मुलं त्यांच्या घरात असं चित्र कित्येकदा पाहतात की आई किंवा वडील यांच्यापैकी एक जण दुसऱ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलण्याचा प्रयत्न करत आहे. पण त्यावेळी दुसऱ्या पालकाचं संपूर्ण लक्ष मात्र मोबाईलमध्येच आहे. असं करणं टाळा. मुलांसमोर आपल्या पार्टनरचा मान ठेवा. मोबाईल थोडावेळ बाजूला ठेवून तो काय सांगतोय ते ऐका.
२. मुलं समोर असतील तर पालकांनी एकमेकांशी मुळीच उलटून किंवा मोठ्या आवाजात बोलू नये. मुलांसमोर एकमेकांचा अपमान करू नये. यामुळे मुलंही दाेन्ही पालकांचा समान सन्मान करायला शिकतात.
३. आपल्या आई-वडिलांना नेहमी एकत्र आणि आनंदात बघणाऱ्या मुलांना कायम अधिक सुरक्षित वाटत असतं. त्यामुळे मुलांसमोर एकमेकांशी प्रेमाने वागा. तुमचं घट्ट नातं तुमचं बॉण्डिंग मुलांनाही दिसू द्या, त्यातून त्यांच्यावर निश्चितच सकारात्मक परिणाम होतो.
४. मी करतोय किंवा करतेय, माझ्यामुळे सगळं व्यवस्थित होतंय, असा एकेरी सुर मुलांपुढे कधीच लावू नका. जे काही चांगलं तुमच्या घरात होतंय, ते सगळं आई- बाबांनी एकत्र मिळून प्रयत्न केल्यामुळे होतंय, असं त्यांना तुमच्या बोलण्यातून जाणवू द्या.
५. घरातली कामं एकच जण करतोय आणि दुसरा नुसता बसून आहे, हे चित्र मुलांसमोर कधीही येऊ देऊ नका. सगळी कामं दोघांनी मिळून करा.